गोटी सोडा, गोटी सोडा ! राम धरा, बोटी सोडा !
गोटी सोडा, गोटी सोडा ! राम धरा, बोटी सोडा ! ॥ धृ ॥
वय झाले, चाळीशीचे !
बंधु आहेत, आळिशीचे !
आवड आहे, बळशीचे,
श्राद्धाचा, मठ्ठा पिऊन !
थोडी ढेकर, कमी काढा !
भाऊसाहेब, मसाला सोडा !
गोटी सोडा ! गोटी सोडा !
राम धरा ! बोटी सोडा ! ॥ १ ॥
वय झाले, पन्नाशीचे,
भगीनी आहे, माळशीचे,
आवड आहे, कळशीचे,
ताटाभोवती, पाणी फेरा !
नैवेद्यावर, तुळशी ठेवून !
खुशाल आमटी, तुम्ही झोडा !
माईसाहेब, साधा सोडा !
गोटी सोडा ! गोटी सोडा !
राम धरा ! बोटी सोडा ! ॥ २ ॥
वय झाले, साठीचे !
मणके दुखते, पाठीचे !
बोकडया, हाडांचे सुप पिवून,
डकार तुम्ही कमी सोडा !
दादासाहेब, जलजीरा सोडा !
गोटी सोडा ! गोटी सोडा !
राम धरा ! बोटी सोडा ! ॥ ३ ॥
वय झाले, सत्तरीचे !
देव आठवा, उत्तरीचे !
नाद सोडा कुत्तरीचे,
नानासाहेब, लिंबु सोडा !
गोटी सोडा ! गोटी सोडा !
राम धरा ! बोटी सोडा ! ॥ ४ ॥
वय झाले, ऐशीचे !
दात नाही, बत्तीसीचे !
पीळ देऊन मिशीचे,
बोला आम्ही तिशीचे,
बाबासाहेब, हनी सोडा !
गोटी सोडा ! गोटी सोडा !
राम धरा ! बोटी सोडा ! ॥ ५ ॥
वय झाले, नव्वदीचे !
नातवंडांचा, पडला वेढा !
हनुमानासमोर, नारळ फोडा !
डोळ्याची रोव्हर रेंज गेली !
आजोबा, ऑरेंज सोडा !
गोटी सोडा ! गोटी सोडा !
राम धरा ! बोटी सोडा ! ॥ ६ ॥
वय झाले, शंभरीचे,
काम करू एक नंबरीचे,
सुपाच्य पाचक पिवून सोडा !
अपानास लावा घोडा !
दत्ताला, चढवा पेढा !
आजीबाई, खारामिठा सोडा !
गोटी सोडा ! गोटी सोडा !
राम धरा ! बोटी सोडा ! ॥ ७ ॥
तबेल्यात, अस्वस्थ आहे, घोडीघोडा !
त्यांना चरायला, मोकळे सोडा !
चला आपण प्यायला बाहेर जाऊ,
दाजीसाहेब, कालाखट्टा सोडा !
गोटी सोडा ! गोटी सोडा !
राम धरा ! बोटी सोडा ! ॥ ८ ॥
गोटी सोडा, गोटी सोडा ! राम धरा, बोटी सोडा !
गोटी सोडा, गोटी सोडा ! राम धरा, बोटी सोडा ! ॥ धृ ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा