आशा

नवजीवन मिळाविण्याच्या आशेने , आज मी रक्त जाळत आहे ।
आराम मिळाविण्यांसांठी , आज मी घाम गाळत आहे ।।

सुखाची निद्रा घेण्यासाठी , आज मी धावत पळत आहे ।
थोर होण्याच्या आशेने , थोरांच्या मनाप्रमाने वळत आहे ।।

पुढे सडेतोड उत्तर देण्यासाठी , आज मी मौन पाळत आहे ।
धट्टा कट्टा होण्याची इच्छा आहे , आज मात्र शरीराने वाळत आहे ।।

उदया रुपसुंदर होण्यासाठी , आज मातीत मळत आहे ।
परिपुर्णतेचे हास्य फुलाविण्यासाठी , सध्या अश्रू ढाळत आहे ।।

परत तिला भेटण्यासाठीच , आज मी तिला टाळत आहे ।
स्वातंत्र्य मिळविण्यासाठी , आज मी बंधने पाळत आहे ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ओ पियापिया, तुने क्यों गोविंद भुला दिया ?

ज्यांची अज्ञातपणे, अज्ञानवशात, किंवा अजाणतेपणे, किंवा हतबलतेमुळे, किंवा कर्मवशात, सुशुमनासरस्वती नाडी ब्लॉक झाली आहे. अशा लोकांना नामजपाचा व...

एकूण पृष्ठदृश्ये :