डोळेझाक करून चालणार नाही मित्रांनो!


घरात जर कुकिंग गॅस लिक झाला तर त्याचा घाणवास घरभर पसरतो त्याच प्रमाणे एका ठिकाणाहून जरी व्हायरस आला तरी सगळ्या जगात पसरतो हे आता सदर महामारीने सिद्ध केले आहे.
घरात जर एखादा आजारी असेल तर आपण सगळे त्या व्यक्तीची बरे होण्यासाठी प्रयत्न करतो मनापासून दूवा आणि दवा करतो. क्लिनिंग करतो त्याच्या शरीराची आणि मनाची. तसेच आता सगळ्या जगात करावे लागणार आहे. इथे तिथे उडून पळापळ कराणारा पक्षी असेल तरी त्याच्या साठी बर्डफ्लू आहे. ज्याला वर बघता येत नाही अश्या पीग साठी स्वाईन फ्लू आहे. सत्तालोलूप लायन किंग साठी आता कोव्हीड आहे. त्यामुळे मस्ती उतरवण्यासाठी निसर्ग देवतेने पूरेपूर इंतजाम करून ठेवला आहे. त्यामुळे प्रत्येकाला लहान मोठ्याला पर्यावरणाविषयीची जागरूकता प्रचंड प्रमाणात असणे अत्यावश्यक आहे. आता इंटरनेटमुळे हे विश्वच आपले घर झाले आहे त्याचा उपयोग सर्वांना सजग करण्यासाठी करावा. पंचशीलाचे अनुसरण करण्याचे शिकवणाऱ्यांनी सर्वप्रथम पंचतत्वाचे शुद्धीकरण करणे शिकवावे त्यानंतरच लोक पंचशीलाचे योग्य पद्धतीने पालन करू शकतील हे सर्वांनी नीट ध्यानात घ्यावे. पंचतत्वांची माहीती सर्वांना असणे आवश्यक आहे व त्यांची शुद्धी सतत करत राहणे ही प्रत्येक शरीरधारी जीवाची जबाबदारी आहे केवळ पर्टीक्युलर समाज किंवा क्लास वर्गाची नाही. भेद बाजुला ठेवून सर्वांनी एकमेकांना सजग करत राहणे, ( जागतिक आणि स्थानिक) परिस्थिती विषयी बिलकूल डोळेझाक न करणे हेच यावर उपाय आहेत.फंगस म्हणा किंवा व्हायरस म्हणा , जगात पसरू न देणे , त्याकडे अजिबात दूर्लक्ष न करणे, व त्वरीत जनजागृती व उपाययोजना करणे. पर्यावरणाची काळजी घेणे. 
बेजबाबदार स्वार्थी मानवाला निसर्गाने दिलेला हा इशारा आहे. जबाबदारी सोडून बेताल वागणे आता तोंडघशी आलेले दिसत आहे. ॐ शांतिः||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

बोलाईच मटन !

कन्सेप्ट: बोलाईचं मटन !  धर्मशास्त्रात, आत्मज्ञान सांगण्याऱ्या गुरुला ' देव ' तर,  त्याच्या शरीराला ' देवी ' असे म्हटले गेल...

एकूण पृष्ठदृश्ये :