वोटींग गीत गऱ्हाणे !

घरकुटुंब सांभाळायचे काम, करतील मतदार !
घराबाहेरील देश सांभाळा तुम्ही, उमेदवार !!

ना संगीत, ना मेजवान्या, ना जतरा !
पहिले रस्त्यावरून, उचला हो तो कचरा !!

नको पिक्चर, नको तमाशा, नको गाणी !
पहिले नळाला पाहिजे, स्वच्छ निर्मळ पाणी !!

शिस्तीत जगायचे आहे, नाही बनायचेय किंग !
बाजारमंडईत हवी, प्रत्येकास वाहन पार्किंग !!

नकोच पोंगा पंडीत, नको भोंगा भंडीत ! 
ताजा सेंद्रीय भाजीपाला असावा, भाजीमंडीत !! 

नको टपऱ्या, नको खड्डी आणि लोटगाडी !
रस्त्याच्या दुतर्फा हवी, फुटपाथ आणि झाडी !!

ना दिखावा, ना मिरवणूक, ना ढोलतुतारी !
रस्तोरस्ती असावी, सर्वांसाठी मुतारी !!

कोरडा हवा पदपथ, पायी मारता यावी फेरी !
वास यावा फुलांचा, उघड्यावर नको गटारी !!
 
नकोच नुसत्या चर्चा, गरम करणाऱ्या खुर्च्या ! 
काम का अडले, जाब विचारायला हवा सर्वात वरचा !! 

आमच्या कामाच्या रस्त्यावर, ताकदवान-हिजडे, डोळेमार--हत्ती, पाकीटमार-भिकारी, लंबुटांग-बुच्चन कोणी उभे केलेत ?.... 
सुरक्षीतपणे-आत्मविश्वासाने कामधंद्याला आणि मतदानाला कसा जावू ?

स्वतःच्या कामाला नम्रपणे, पत कधी देवू ? स्वतःच्या शेताला, मेहनतीने खत कधी देवू ??
लोकशाहीच्या मंदिरात निर्भीडपणे नत कसा होवू ? आणि, तुम्हाला निर्विवादपणे मत कसे देवू ??

वरात-कागद-पेन-शाई तुमचीच, निवडणूक झालीय भकास ! 
घरात एक लोकशाही, ॲडमीट  आहे खाटेवर, दुसरीच्या कडेवर हसतोय विकास !!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

बोलाईच मटन !

कन्सेप्ट: बोलाईचं मटन !  धर्मशास्त्रात, आत्मज्ञान सांगण्याऱ्या गुरुला ' देव ' तर,  त्याच्या शरीराला ' देवी ' असे म्हटले गेल...

एकूण पृष्ठदृश्ये :