झुळू झुळू वाहतोय वारा
सांगतोय तो निजनिज बाळा
काळजी किती बाळा निसर्गाला तुझी
दिली छत्री तुला आभाळाची
पाखरे गातायेत अंगाई
वारा घालतायेत हि झाडे तुला
ऐक बाळा गोष्ट तुला सांगते छोटी
चंद्राच्या वाटीत आहे मेणाची पेटी
मेणाच्या पेटीत आहे रोटी मोठी
रोटी च्या घासाने तुझी भागेल भूक
तेव्हा तुझ्या ह्या आईला लाभेल सुख
लाभेल सुख सारा निसर्ग मूक
ढगांच्या डोळ्याला लागतील धारा
सांगतोय तो...........................................................................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा