गोविंद भगवान परमेश्वर जे स्वतः आनंदाचा सागर आहेत आपल्याला सांगत आहेत की, आनंद स्वरूप होण्यासाठी तुम्ही सतत माझ्या आनंद स्वरूपाचे चिंतन / विचार करा.
इतर कोणत्याही मनुष्य प्राण्याचे ( मग तो आपला अत्यंत जवळ्चा आप्त असो किंवा दुरचा व्यक्ती असो) ( मग तो कितीही श्रीमंत किंवा कितीही गरीब असो) चिंतन करू नका. आसक्त होऊ नका. आकर्षित किंवा प्रतिकर्षित होऊ नका.
शीव भगवान ईश्वर जे स्वतः कल्याणकारी आहेत. आपल्याला सांगत आहेत की सतत कल्याणकारी विचार करा. इतर कोणत्याही मनुष्य प्राण्याचे ( मग तो आपला अत्यंत जवळ्चा आप्त असो किंवा दुरचा व्यक्ती असो) ( मग तो कितीही श्रीमंत किंवा कितीही गरीब असो) कल्याण करण्यासाठी आपण त्याच्या पासून मनाने दूर ( अनासक्त) राहूनच खरे कल्याण करू शकतो.
परमेश्वराला आणि ईश्वराला ज्यांनी आपल्या प्रेमाने आणि शुभकर्माने जोडून घेतले आहेत,
जे आपल्या मनाचे आणि (पवित्र जीवआत्म्याचे निवास असलेल्या) शरीराचे संरक्षण , संगोपन आणि तिरोधान करू शकतात.
अशा श्री शुभगणेशरुपी श्रीपद्मश्रीकांत असलेल्या सत्वप्रेम दया स्वरूप गुरुदेव प्रभुंना अनुसरण करीत जगण्यात खरे सार्थक आहे.
सत् स्वरूपाचे ज्ञान - देणारे ब्रम्ह तत्व श्री श्री गुरुदेव प्रभु ,
चित् स्वरूपाचे कल्याण - करणारे शिव तत्व श्री श्री गुरुदेव प्रभु ,
आनंद स्वरूपाचे बीज - गोविंद तत्व श्री श्री गुरुदेव प्रभु .
आणि या सर्व तत्वांची ओळख अनुसंधान करून देणारे श्री श्री गुरुदेव प्रभु .
संपुर्ण जगाला चैतन्य स्वरूपाने तेजाळून जीवन जगण्याची कला शिकवणारे पण श्रीश्री गुरुदेव प्रभु.
बस्स. ध्यास असावा तर फक्त त्यांचा , त्यांच्या शिकवणूकीचा! सात्विकतेचा, पवित्रतेचा, नितीमत्तेचा, आरोग्याचा!
बाकी सर्व त्याज्य . अशीव. कॉमनसेन्सने हॅन्डल करावयाच्या गोष्टी!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा