कोव्हीडचा पाऊस आणि उडती कलाबाजी
कोव्हीड च्या पावसानंतर सर्वच मुंग्यांना पंख फुटतील.
जे टिकतील, त्यांना उडती कला ज्ञात झालेली असेल.
हत्ती, घोडे, उंट उंचंच उंच उडायला लागतील.
मगरी, गॉडझिला, मासे सर्व आकाशात उडायला लागतील. अमेरीकेचा डायनोसॉरस, चीनचा ड्रॅगन सारखे जड प्राणी पंख फुटुन उडू लागतील.
कोणी कावळे , कोणी डोमकावळे बनतील,
कोणी बगळे , कोणी करकोचे बनतील,
कोणी गरूड तर कोणी हंस बनतील.
लसीचे पंख सगळ्यांना मिळणार आहेत !
पंख मिळाल्यानंतर बदक, कावळा, चिमणी, कोंबडा, कोंबडी, वटवाघळ, घुबड बनायचे की हंस हंसिनी बनून विश्व कवेत घ्यायचे. शेवटी आपले आपणच ठरवायचे.
आपले आपणच ठरवायचे!
(Note: this is a artistic fantacy writing work and don't have any practical connections.)
(टीपः हे एक कलात्मक कल्पनारम्य लेखन कार्य आहे आणि याचा कोणताही व्यावहारिक संबंध नाही.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा