मुक्तछंद

तू त्याच्या सारखा यशश्वी होवू शकला नाहीस , याचे कारण शोधू नकोस .....
कारण ......
जेवढ्या गोष्टी आपण करू शकतो , आपण केलेल्या असतात
देवासमोर नारळ फोडून सुद्धा लोक फसतात ।
पृथ्वीचा गाभारा एकवेळ सापडेल , परन्तु ..........
मनाचा गाभारा आपण शोधू शकत नाही
तुम्ही कितीही फिरलात , उन्हाची सहन करीत लाही ।
ज्या गोष्टी आपल्या नसतात , त्या आपल्याला मिळत नाही ।
तुमच्यात आहे जे चांगले , त्याचीच पेरणी करा ।
कारण जे तुमच्यात आहे , ते इतरात नाही
आणि जे इतरांचे आहे , ते तुम्हाला मिळणार नाही ।
आनंद लुटा आणि आनंद वाटा
आळस,काळजी, चिन्तेला दिल्यावर फाटा
बघा छोट्या छोट्या गोष्टीत देखिल आनंद मिळतो मोठा ।
हे जीवन म्हणजे
भर्ती ओहोटी च्या लाटा किंवा वरखाली हलणारा वजन काटा।
सारे काही आहेत ह्या अदृश्य मनाचे खेल
गोल पाळण्यात जर कधी बसलात तर
तो तुम्हाला शिखरावर जरुर नेइल
एक वेळ
जेव्हा मन बुद्धिचा छान बसेल मेळ।
एकदा का हवेवर झालात सवार
मित्राच्या विनंतीला देवू नका नकार
कारण पाळण्यालाही शेवटी जमिनीचा
असतो आधार ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ओ पियापिया, तुने क्यों गोविंद भुला दिया ?

ज्यांची अज्ञातपणे, अज्ञानवशात, किंवा अजाणतेपणे, किंवा हतबलतेमुळे, किंवा कर्मवशात, सुशुमनासरस्वती नाडी ब्लॉक झाली आहे. अशा लोकांना नामजपाचा व...

एकूण पृष्ठदृश्ये :