अश्रू

देवाचेही अश्रू असतात
ज्यावर झाडे - फुले फळतात।
विरहिणीचेही अश्रू असतात
जे प्रियकरासाठी गळतात ।
बालकाचेही अश्रू असतात
जे केवळ आईला कळतात।
वृद्धांचेही अश्रू असतात
जे समवयस्कांसोबत वाटले जातात ।
आजही शहाजहाँचे डोळे 'ताज'समोर रडतात
तुषारांबरोबर वर जावून , पुन्हा पुन्हा खाली पडतात ।
मगरिचेही अश्रू असतात
ज्यांना काहीही भावना नसतात ।
काहीलोक सहजतेने आपले अश्रू मोकळे करतात
काही दुःखाश्रू
रोखून .........सहज , रम्य , गुढ़ हसतात।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ओ पियापिया, तुने क्यों गोविंद भुला दिया ?

ज्यांची अज्ञातपणे, अज्ञानवशात, किंवा अजाणतेपणे, किंवा हतबलतेमुळे, किंवा कर्मवशात, सुशुमनासरस्वती नाडी ब्लॉक झाली आहे. अशा लोकांना नामजपाचा व...

एकूण पृष्ठदृश्ये :