गुटका किंग

 दारूचा घेत घुटका  ।   तोंडात चघळतो  गुटका  ।
आयुष्याला देतो चटका  ।  गुटका किंग  ।।

दीड दोन घटका  ।  रस्त्यावर खेळतो मटका  ।
संसार करतो फुटका  ।  गुटका किंग  ।।

चहाचा घेतो फुरका  ।  सिगरेटचा घेतो झुरका  ।
रिकामा फिरतो सारखा  ।  गुटका किंग  ।।

आयुष्याची करतो माती  ।  लोकांची खातो दाती  ।
 मानत नाही नातीगोती  ।   गुटका किंग  ।।

सांगतो हा अभंग  ।  करू नको गुटख्याचा संग  ।
जीवनाचा बिघडवू  नको रंग  ।  मोरे म्हणे  ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ओ पियापिया, तुने क्यों गोविंद भुला दिया ?

ज्यांची अज्ञातपणे, अज्ञानवशात, किंवा अजाणतेपणे, किंवा हतबलतेमुळे, किंवा कर्मवशात, सुशुमनासरस्वती नाडी ब्लॉक झाली आहे. अशा लोकांना नामजपाचा व...

एकूण पृष्ठदृश्ये :