नवी पिढी

 सोडा अंधश्रद्धा , सोडा जुन्या रूढी .......
तंत्र युगाची उभारून गुढी , चालली नवी पिढी ।।ध्रु ।।

ह्या राष्ट्राचा , ह्या देशाचा  एकच नारा ......
जय जवान , जय किसान , जय विज्ञान .......
गर्जू विसरुनी भेदभाव सारा ..........

समुद्रा खालून देखील धावती रेल्वेगाड्या ......
एका संगणकावर असती , साऱ्या देशाच्या नाड्या .....
विज्ञानाच्या किमयेपुढती , ठिसूळ पुराण पोथ्यांची शिडी  ।।१।।

नवा ध्यास , नवी कल्पना , नवी क्षितिजे ........
उपलब्ध आहे प्रत्येकास ...नवनवीन वाट .
कार्य शक्तीची  उफाळून आली लाट .
हरेक श्रमिकासाठी आहे ...उमेदीची नवी पहाट.
बुलेट ट्रेनच्या वेगापुढती , स्तंभित बैलगाडी  ।।२।।

भोन्दुबाबाची पुरे झाली नाटकबाजी ...
कोल्हा नेहमी असतो ...काकडीला राजी .
त्याच्यामागे लागणारे असतात पाजी
विवेक सोडून स्वतःचा ...करतात हाजी हाजी ...
एक अनुयायी , दुसऱ्या अनुयायीचे पाय ओढी   ।।३।।
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ओ पियापिया, तुने क्यों गोविंद भुला दिया ?

ज्यांची अज्ञातपणे, अज्ञानवशात, किंवा अजाणतेपणे, किंवा हतबलतेमुळे, किंवा कर्मवशात, सुशुमनासरस्वती नाडी ब्लॉक झाली आहे. अशा लोकांना नामजपाचा व...

एकूण पृष्ठदृश्ये :