मला समजलेले वेद

जळ, अग्नी, वायू, भूमी, पर्यावरण, आकाश, मानवी शरीर, आणि मन यांचे शुद्धीकरण कसे राखावे  आणि रोगराई महामारी तसेच प्रकृतीचा ( निसर्गाचा ) कोप यापासून कसा बचाव करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन वेदात केले आहे . चारी वेदांचे आपण नियमित अभ्यास करून जीवनात पावित्रता तसेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारी पुरुषार्थ मिळवू शकतो. सुखी व समृद्ध आयूष्य व्यतित करू शकतो. यू ट्यूबवर चारी वेदांचे हिंदीत भाषांतर मोफत उपलब्ध आहे. कृपया आपण सर्वांनी याचा वैज्ञानिक दृष्टीकोणातून स्वतः आभ्यास करावा. आणि स्वतःचे तसेच समाजाचे त्याबरोबर पर्यावरणाचेही आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करावा . ही नम्र विनंती.
ज्यांना स्वतः आभ्यास करण्याचा आळस आहे किंवा समजण्याची बुद्धी विकसीत झालेली नाही त्यांच्यासाठी विविध आध्यात्मीक संस्था , सामाजिक व पर्यावरणप्रेमी संघटना  यांचे webinar, online courses उपलब्ध आहेत. जे हे वैदीक ज्ञान विविध प्रकारच्या सत्संग, योगा, प्राणायाम, ध्यानाच्या माध्यमातून शिकवत आहेत. आपण त्याचाही फायदा घेवू शकता व आपल्या प्रकृतीला दूषीत तसेच भ्रष्ट करण्याच्या सवयीवर विजय मिळवून स्वतःवर तसेच समाजावर अनंत उपकार करू शकतात. मी आपल्या सर्वाना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा देतो.
- प्रशांत दिलीप मोरे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

' एक ' म्हणजे नक्की काय ?

साईबाबांनी ' सबका मालिक एक ' असे म्हटले आहे. तर हा ' एक ' म्हणजे नक्की काय ? याबाबत आपण विचार करायला हवा. ' एक ' ह...

एकूण पृष्ठदृश्ये :