साईबाबांनी ' सबका मालिक एक ' असे म्हटले आहे. तर हा ' एक ' म्हणजे नक्की काय ? याबाबत आपण विचार करायला हवा.
' एक ' हा शब्द, ए आणि क या दोन अक्षरांपासून बनलेला आहे.
' ए ' म्हणजे, सरस्वती. आणि ' क ' म्हणजे, शीवसृष्टी.
ए हे अक्षर, अ आणि इ ह्या दोन अक्षरांच्या युतीपासून बनलेले आहे. अशाप्रकारे जर विचार केला तर, अ, इ आणि क ह्या तीन अक्षरांपासून ' एक ' हा शब्द बनलेला आहे.
अ म्हणजे, अल्लाह, इ म्हणजे, इलाही आणि क म्हणजे, शीव असे जर आपण समजले. तर अल्लाह, इलाही आणि शीव हे तीन आपले मालक आहेत !
अल्लाह, म्हणजे, पवित्रता जी कधी जन्म घेत नाही किंवा मरत नाही. तीचे केवळ अस्तीत्व जाणवते. आपल्याला आपली पवित्रता केवळ ॲक्टीव्हेट आणि डिॲक्टिव्हेट करता येते.
ईलाही, म्हणजे, उर्जा किंवा शक्ती जी कधी नष्ट होत नाही. केवळ शरीरे, धातु, वस्तु, आकार इ. इ. बदलते. आणि शीव, संपूर्ण देहसृष्टी आणि जीवनरूपाने सर्वासोबत कायम उपस्थित आहे.
क म्हणजे, शीवसृष्टी !
रू म्हणजे, जीवन प्राप्त करण्यासाठी उत्सुक असलेला देहरहीत आत्मा !
ष म्हणजे, उर्जा संप्पत्ती !
ण म्हणजे, वर्तमान काळ !
' क ' ला ' रू ' खावून जाते. ' ष ' ला ' ण ' खावून जातो. हे देहधारी सत्य आपण बघीतलेले आणि अनुभवलेले आहे. प्रजनन प्रक्रियेत हे कृष्णसत्य काम करते. प्रजनन प्रक्रियेत आत्म्याला, देहरूपी जेलची शिक्षा प्राप्त होते.
देहधारी सर्व ' सब ' आहेत. त्यांचा मालिक ' एक ' आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा