ॐ नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा अर्थ
जो व्यावहारीक अर्थ आहे की, शीव म्हणजे, कल्याणकारक !
आपले विचार, कर्म, हे सगळे शिव म्हणजे, कल्याणकारक पाहिजे. म्हणजेच, कर्माने, काया-वाचा-मनाने, व्हॅल्यू ॲडीशन झाली पाहिजे. कोणाची झाली पाहीजे ? तर जे आपले शेअरहोल्डर आहेत. कोणकोण ? मग त्यात आपले आईवडील, कुटुंब स्नेही, मित्रमंडळी, आणि विशेष म्हणजे, जे आपले पालन पोषण करतात, मग ते तुम्ही स्वामी माना, किंवा मालक माना, किंवा जॉब देणारे माना. प्रत्येकाला त्याच्या पद्धतीने सद्निर्मिती, सद् संचालन आणि दूरीत नाशासाठी सहाय्यक बनले पाहिजे.
स्वामी समर्थांनी सांगितलेले वटवृक्षाचे मूळ ते हेच.
साईबाबानी सांगितलेला जात्याचा दांडा तो हाच.
सर्वं खल्विदं ब्रम्ह, सबका मालिक एक तो हाच.
देवांचा देव महादेव तो हाच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा