चिंता का चिता की आधीनता !


थोडा इतिहास आणि वर्तमानाचा आभ्यास केला तर, लक्षात येते की, मानवाचा पुत्र ( तसेच, पुत्री / सुन / शिष्य / एम्प्लॉयी, सहकारी, मित्र, किंवा नातेवाईक, इ. इ.), मुख्यत्वे तीन किंवा चार प्रकारचा असू शकतो. मॅड पुत्र, हाफमॅड पुत्र, किंवा रोगी पुत्र, रोग लावणारा पुत्र, किंवा गुपचुपपणे भांडणे लावणारा पुत्र, किंवा प्रॉब्लेम सोल्व्ह न करता, सोल्युशन न देता, केस वाढवून ठेवून, प्रॉब्लेम बनवणारा पुत्र, बदला काढणारा पुत्र, नॉन टेकनिकल म्हणजे, स्किलसेट नसलेला पुत्र, उदासीन पुत्र, पराधीन पुत्र, आणि ग्रहाधीन पुत्र.

या पुत्रांच्या प्रकारांपैकी, उदासीन पुत्र चांगला मानला पाहिजे. कारण, पराधीन पुत्र हा, जर ध्यान करत नसेल, अभ्यास करत नसेल, आणि बाह्यसृष्टीला ओरबाडून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल. तर त्याला ज्ञान देण्यामध्ये, शिकवण्यामध्ये, पित्याची खूप मोठी ऊर्जा खर्च होते. 

जो पुत्र ग्रहाधीन आहे, म्हणजे, तो विविध ग्रह बनवून ठेवतो. आणि विविध प्रकारचे मायाजाळ बनवण्यामध्ये, आणि त्याच्यामधील ग्रहांशी खेळण्यांमध्ये, जर त्याला इंटरेस्ट आहे. तर असा पुत्र तोपर्यंतच पित्याला चांगला वाटतो, जोपर्यंत तो, आपल्या पित्याला काहीतरी देत असतो. पैसा, सुख, अन्न, पाणी, निवारा, आशीर्वाद, ज्ञान इत्यादी. इत्यादी. त्यावेळी, तो पुत्र पित्यासाठी आनंददायक पुत्र ठरतो. 

परंतु, जर ग्रहांशी खेळणाऱ्या पुत्राचे, स्वतःचेच ग्रह जर फिरले. तर त्यानेच बनवलेली माया, त्याच्यावर उलटते. आणि मग तो अशावेळी, मायाजाळामधील मायाधीन बापाकडेच त्यातून सोडवण्यासाठी हात पसरू लागतो. आणि योग्य ती मदत मिळाली नाही, तर फ्रस्टेट होऊन डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे, ग्रहाधीनपुत्र हा उदासीनपुत्रापेक्षा निम्नश्रेणीचा मानला जात असावा.

उदासीन पुत्र हा जास्त बाह्यसृष्टीमध्ये आणि बाह्यमांयामध्ये रमत नसेल, आणि आत्मनिर्भर बनुन नियमितपणे ध्यानसाधना अभ्यास करत असेल, तसेच तो शांतीमय वर्तन करत कॉमनसेन्सने आणि विस्डमने जीवन जगत असेल, तर तो श्रेष्ठप्रतीचा उदासीन पुत्र आहे. 

परंतु, जर बापच ग्रहाधीन असेल, किंवा बाप पराधीन असेल, आणि बापच जर उदासीन पुत्राकडून अपेक्षा करून जीवन जगत असेल. तर मात्र, तशा प्रकारच्या बापाला, उदासीन पुत्र आवडत नाही. व त्यामुळे तो, एखाद्या नवीन ग्रहाधीन पुत्राच्या शोधात वाटचाल करू लागतो. 

कारण, सगळेच पिता-पुत्र, हे काही माधव-पांडुरंगासारखे, किंवा पांडुरंग-विठ्ठलासारखे एकमेकांना ध्यान शिकवणारे, एकमेकांना ज्ञान देणारे, आणि एकमेकांचे काम करणारे विश्वातील विश्वात्मे नसतात. त्यामुळे, असे पितापुत्र एकमेकांना, सुखाने, आनंदाने, सुरक्षीत समाधीसुद्धा देऊ शकत नाही. 

थोडक्यात, पिता आणि पुत्र दोन्हीही जर आत्मनिर्भर आणि स्वानंदी असतील, तर ते एकमेकांशी अपेक्षा न ठेवता, एकमेकांना सहकार्य करू शकतात. 

परंतु, अशी आदर्श स्थिती, प्रत्येकाच्या नशिबात असेलच, याची खात्री नसते. किंवा तशी आदर्श स्थिती बनवण्याचा प्रयत्न, सर्वच करतील, याबाबत, कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे, एकमेकांचे छळ करणारे, एकमेकांना धोका देणारे, ऐकमेकांना भ्रमीत करणारे, एकमेकांचे बदले काढणारे पितापुत्र, मॅड किंवा रोगी पितापुत्र, रोग लावणारे पितापुत्र, एकमेकांना विकार-वासना-व्यसन-शिकारीचा छंद लावणारे पितापुत्र, एकमेकांचा हिसाबकिताब करणारे पितापुत्र, तसेच, एकमेकांना अस्वस्थ करणारे पिता-पुत्र / पुत्री ( किंवा  माता-पुत्र/ पुत्री ) जन्माला येतात.

घरातील आई-बहीण, ही पितापुत्रांमध्ये, संस्कार करणारी आहे, की भांडणे लावून, केस तयार करणारी आहे ? घरातील आई- बहिणी, नियमितपणे ध्यानयोग स्वाध्याय करतात का ? कोणत्या प्रकारच्या गुरु, आचार्य, शिक्षक आणि प्रशिक्षक असलेल्या शाळेमध्ये, विद्यापिठामध्ये, क्लायंट लोकांमध्ये, संघटनामध्ये, क्लबमध्ये, व्यवसायामध्ये, नेटवर्कमध्ये, नातेवाईकमध्ये, सोसायटीमध्ये, कॉलनीमध्ये, गल्लीमध्ये, कंपनीमध्ये, गावमध्ये, देशमध्ये, कोणत्या लोकांच्या संगतीत राहतात ? यावर देखील, घर टिकणे किंवा न टिकणे अवलंबून असते. 

आपल्या सिनियर लोकांचा, तसेच आपल्या सहचारिणीचा, वैयक्तिक, आत्मिक आणि आध्यात्मिक दर्जा काय आहे ? हे लवकर लक्षात येणे कठीण असते. त्यामुळे, आपणच, आपल्या स्वतःसाठी, निर्णय घेत, जगावे लागते व त्या निर्णयाची जबाबदारीपण स्वतःच घ्यावी लागते.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

चिंता का चिता की आधीनता !

थोडा इतिहास आणि वर्तमानाचा आभ्यास केला तर, लक्षात येते की,  मानवाचा पुत्र ( तसेच, पुत्री / सुन / शिष्य / एम्प्लॉयी, सहकारी, मित्र, किंवा नात...

एकूण पृष्ठदृश्ये :