शरीराचा आणि मेंदूचा थकवा घालवण्याचा आहार
ज्याप्रमाणे शरीरातील इतर अवयवांना अन्नातील पोषक घटकांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे पोषक घटकांची आवश्यकता आपल्या मेंदूलाही असते.
शरीरातील सर्व प्रमुख क्रिया नियंत्रित करणारा असा हा अवयव असल्याने याचे आरोग्यही महात्वाचे आहे. त्यामुळे या दहा पदार्थांचा आहारात समावेश करा.
१) आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने विसरण्याचा त्रास कमी होतो.
२) दररोज अक्रोडचे सेवन करा .
३) आठवड्यातून एकदा भोपळ्याची भाजी खा. त्यामुळे स्मरणशक्ती तल्लख होण्यास मदत होते.
४) नेहमी जेवणाआधी सफरचंद साल न काढता सेवन केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.
५) दररोज मधाचा वापर केल्याने बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.
६) २ कप बीटरूटच्या रसाचे सेवन करा.
७) रोज रात्री झोपताना एक चमचा पाण्यात उगाळलेलं वेखंड घ्या.
८) रात्री बदाम पाण्यात भिजवून सकाळी साल काढून खा.
९) गुलकंदाचे सेवन नियमित केल्यानेही बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.
१०) दररोज हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा.
११) अंजीर किंवा ओले खजुर बीया काढून दुधात भिजत घाला व फ्रिजमध्ये ठेवा, काही वेळाने खा. यामुळे तुमचा अशक्तपणा जातो.
सदर आहारा बरोबर एक पथ्य पाळा ते म्हणजे कोणाशीही जास्त बोलू नका, कामापुरते शिस्तीत पायरी ठेवून बोला, वाद टाळा , कारण लक्षात ठेवा, कितीही सुंदर कांतिवान सतेज माणूस दिसत असला तरी त्याला किंवा तिला परफेक्ट संपूर्ण ज्ञान असेलच असे नाही. बहुतेक वेळेस ती माणसे दिसत असली तरी ते (देसी
किंवा विदेसी) बाबा किंवा बाबीचे बोटे असतात.
प्रसंग टाळण्यासाठी नवीन नवीन कामे करत रहा जेणेकरून तुम्ही प्रसन्न रहाल. मायाजाळाला व त्यातील लोकांना सुधरण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा प्रोटोकॉल पाळत रहा, व आपली जबाबदारी चोखपणे बजवा. गुरुदेवांचे गाईडेड मेडिटेशन अटेंड करत राहिल्याने बरेच आजार टळतात आणि क्लीनींग होत असते. आपल्याला
कितीही ज्ञान दयायची उबळ असली व समोरचा व्यक्ती कितीही सज्जन शिष्य असली तरीही शब्दांनी संपूर्ण ज्ञान देता येत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा