विद्या व अविद्या विवेक
शरीर व समाज व बायोलॉजिकल पर्यावरण यावर जी विपरीत प्रभाव करत नाही ती खरी विद्या होय हिच ती विद्या जी माणसाला विमुक्त होण्यास सहाय्यभुत ठरते. विद्येला सुसंगत अशी कर्मे करून मिळवलेला पैसा हा श्रेष्ठ सुख व दिर्घकाळ तसेच दुरगामी चांगले परिणाम घडवून आणतो.
याउलट आपल्या शरीर, समाज व बायलॉजिकल पर्यावरण यावर जी विघ्ने आणते , रोग पिडा आणते, ती अविद्या होय. सदर अविद्येने कमावलेला पैसा हा जरी कमी श्रमात जास्त श्रेय तसेच साधने देणारा असला तरीही तो माणसाला बद्ध करण्यास व आत्मघात करण्यास प्रवृत्त करतो व दिर्घकाळासाठी नुकसानदायक ठरतो.
अविद्येमुळे शुद्रत्व प्राप्त होवून माणूस खचतो असे महात्मा ज्योतिबा फुलेनी याच कारणाने म्हणून ठेवलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा