कलीयुगातील पुण्यकर्मयोग
कलीयुग आणि संगमयुग मध्ये पैसे, रुपये किंवा कोणतिही करंन्सी किंवा कमोडिटी दान करणे म्हणजे पाप वाढवणे होय!
कारण आपण दिलेल्या करंसीतून सदर व्यक्तीने केलेल्या पापाचे फळ आपल्याला म्हणजे करंसी देणाऱ्याला भोगावे लागते.
कलीयुगात हॉस्पीटलदान, वृक्षारोपण, वृक्ष संगोपन, रक्तदान , अन्नदान, पूर्वप्राथमिक शिक्षण जसे वाचन लेखन शिकवणे, ब्रम्हज्ञानदान, श्रमदान व हलाल दुःखी-पिडित-अपंगांना दुरुनच साकाश देणे याव्यतिरिक्त पुण्य वाढवण्यासाठी कोणतिही तजवीज नाही.
कलीयुगातील हे पुण्य कर्मे करण्यासाठी भूमी ( किंवा क्षेत्र ) , तसेच दान घेणारे, हेसुद्धा ओळखीचे व आपल्या कंन्ट्रोल मधले पाहिजे . जसे की आपला समाज, परिवार, ऑफिस, सोसायटीतील कायम रहिवासी विनम्र गरजूव्यक्ती!
सामुहीक ध्यान, भजन , किर्तन, क्रियायोग, सत्संग, नामजप इ. लेव्हलची भक्तीयोग आपापल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींकडून करून घेणे म्हणजे कुटुंबामध्ये सकारात्मक भक्ती शक्ती वाढवणे होय!
ह्याच कारणामुळे " आपले कुटुंब आपली जबाबदारी आणि आपला परिवार आपली जबाबदारी " हा कन्सेप्ट मुळ धरू लागला आहे!
आपल्या परिवारातील व्यक्तींना योग्य ज्ञान दिशा व वृद्धी संमृद्धीच्या मार्गाची ओळख करूनदेणे तसेच परिवारात एकमेकांना सजग करत राहणे, नॉलेज ट्रान्स्फर करत राहणे अत्यावश्यक आहे. व त्यासाठी सर्वांनी समजुतदार बनणे व जीवन जगण्याची कला अवगत करणे अत्यंत आवश्यक आहे!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा