रिलिजिअस प्रॅक्टीसेसमध्ये अनेक मंत्र ( स्पेल ) असतात , स्क्रिप्टस् असतात !
हे सर्व महाअवताराच्या शरीराच्या वेगवेगळ्या शरीर संस्थेला चालवणारी आणि मेंन्टेन ठेवणारी बॉटस् चे प्रोग्रामस् आहेत !
जे रेग्युलर रन केल्याने आपल्या शरीराबरोबर महाअवतार शरीराचे देखील पोषण होते.
ज्या सिस्टीम मध्ये आपले स्थान राजमान्य होते , त्या सिस्टीमचे बॉटस् आपल्याला ( सिस्टीम हिरारची आणि सिस्टीम प्रोटोकॉल्स् पाळून ) रन करावे लागतात.
जेव्हा आपल्याकडे सिस्टीम असाईन झालेली नसते त्या वेळी महाअवताराच्या ह्युमन रिसोर्स कडून आपल्याला सिस्टीम असाईन होणे आवश्यक असते.
ही महाअवताराचे ह्युमन रिसोर्स कुलदेवतेकडून आपली माहीती गोळा करतात व कुलदेवतेच्या आदेशानुसार आपणांस योग्य ती जबाबदारी उत्पन्नाच्या हमीसोबत दिली जाते.
कुलदेवतेची माहीती आपल्याला जन्म देणाऱ्या कुळ कुटुंबातील प्रमुखाकडून मिळत असते. कुळदेवतेची प्रेमपुर्वक भक्ती केल्याने आरोग्य आणि उत्पन्नाची हमी आपणांस प्राप्त होते.
कोणत्याही इतर देवीदेवतेची सेवा करण्यासाठी जाण्यापूर्वी आपल्या कुळदेवतेची परवानगी घ्यावी लागते.
यावरून कुळ आणि मूळ माहीत असणे बाह्य जगात प्रतिष्ठीत जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे.
हे सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट आहे.
मूळाला पाणी घातले की संपूर्ण वडवृक्षाला पाणी मिळते त्याचप्रमाणे कुलदेवतेचा जप केल्याने संपूर्ण महाअवतार शरीरातील सर्व वेगवेगळ्या संस्थेच्या मंत्राचे पुर्चरण केल्याचे पुण्य मिळते. म्हणून म्हणतात " एक साधा सब साधे, सब साधे न मिले कोय ! "
दुसरी महत्वाची बाब ही आहे की, सुखाचे मरण येण्यासाठी सुद्धा कुळदेवतेची आराधना क्षमापना कामी येते.
आयुष्यभर कर्म क्रिया करतांना चुका होऊ नये म्हणून आपली कुळदेवता आपल्याला पवित्र शुद्ध सात्वीक तात्वीक निती मार्गापासून भटकू देत नाही. त्याचप्रमाणे आहे त्या स्थिती परिस्थितीत पुण्य कर्म साधण्यास कुळदेवता खूप खूप मदत करीत असते अशाप्रकारे मोक्षाचा मार्ग सुखरूपपणे कुळदेवता आपणांस उघडा करून देते.
कर्मशुद्धी, पवित्र बुद्धी ही केवळ कुळदेवतेचीच आशीर्वादाचा परिणाम आहे. ईश्वर कोपला तरी गुरु सांभाळून घेतो आणि गुरुला कसे सांभाळायचे हे कुळदेवता आपल्याला शिकवते.
आपल्या कुळदेवतेला आपल्या कुटुंबात मानसन्मान देऊन कुटुंबातील लोक आपल्या घराच्या लोकांसाठी स्वर्गाचे व्दार उघडत असतात.
याउलट अतीव पैश्याच्या लोभापायी किंवा अहंकार आदि विकारांच्या नादी लागून कुळदेवता मार्गापासून भ्रष्ट झालेले लोक आपल्या जन्म मरणाच्या फेर्या वाढवित असतात.
नंतर अशा लोकांना सत्वमूळ कुळदेवतेचे नावाचे विस्मरण झाल्याने मिळेल त्या देवीला पुजत सुटतात व एक भ्रष्ट आयुष्य जगतात.
जे लोक भाऊ बंदकीमध्ये व्देष करतात, सुडभावना ठेवतात व एकमेकांचा कुळधर्म नासवतात ते खरोखर किव करण्याइतके महा मूर्ख असतात.
परस्पर विरोधी मुल्य तसेच विरोधाभास, गिलेशिकवे बाजूला सारून कुळदेवतेच्या आरतीला एकत्र येणारे कुटुंब संसारात राहून सुद्धा मुक्ती भोगतात. मागील व पुढील पिढ्यांचे आशीर्वाद प्राप्त करतात. त्यामूळे स्वर्गस्थ देवता अशा कुटुंबांना सतत मदत करीत असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा