आर्ट ऑफ लिव्हींगच्या ' हॅपिनेस प्रोग्राम 'च्या इंन्ट्रो मध्ये एक मुसलमान डॉक्टर आलेला होता ! तो उपरोधाने म्हणाला, " अब हमें साँस कैसे लेना वो भी सिखना होगा क्या ? "
लगेच माझ्या डोळ्यासमोर कोरोना महामारीत श्वास घुटमळून मरणारी माणसे दिसू लागली. त्यांनी काय गुन्हा केला की त्यांना अशाप्रकारचे मरण यावे ? माझ्या मनात विचार येऊ लागले . अनेक उच्च पदस्थ उच्च शिक्षित महापंडीत ज्ञानी विव्दान लोक जे विदेशात जाऊन उपदेश करायचे असे लोक सुद्धा अश्याप्रकारे मरावेत ? काय बरे चुकले ? कोठे घोडे अडले ?
गुरुदेवांचे वाक्य आठवले ! की ज्याप्रमाणे शरीराचा आणि मनाचा परस्पर संबंध असतो.
त्याचप्रमाणे मनाचा आणि श्वासांचा परस्पर संबंध असतो.
लहानपणी पुरीच्या जगन्नाथाच्या रथयात्रेचे टिव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण व्हायचे. आमच्या गावालापण बालाजीची रथयात्रा मोठ्या उत्साहात व्हायची.
त्यावेळी बालाजीचा रथ ओढायला मिळावा म्हणून भक्तांची चढाओढ मी बघीतली आहे. ज्यां भक्तांना बालाजीचा रथ ओढण्याची संधी मिळणे गर्दीमुळे दुरापास्त असायचे असे भक्त इमारतीच्या छतावरून रथावर केळी फेकायचे.
केळी हे जर आपल्या शरीराचे प्रतिक मानले तर भक्त आपले शरीर भगवंताच्या कारणी लागावे म्हणून जणू काही अर्पण करीत आहेत असा भाव भक्तांमध्ये दिसून यायचा.
मल्हारि घोड्यावर बसून जसे भूमिवरील घाण करणाऱ्या शक्ती नष्ट करीत असतात किंवा सूर्यनारायण जसे घोड्याच्या रथावर बसून प्रकाशदान करून सृष्टीचे पालन करतात.
त्याचप्रकारे संपूर्ण सृष्टी संचालन करणाऱ्या जगाच्या नाथाच्या रथाला आपलाही हातभार लागावा अशी मनिषा भक्त करत असतांना मला दिसले.
आपले शरीर मरेपर्यंत आपल्या श्वासांचे घोडे सतत पळत असतात !
असतात का नाही ?
शरीररूपी भूमीची स्वच्छता करीत असतात की नाही ?
माझे मन माझ्याशी सद्सद्विवेक बुद्धी जागृत करून बोलू लागले होते.
आता ज्याला ह्या श्वासांच्या घोड्यांवर कसे आरूढ व्हायचे ? श्वासांचे घोडे कसे पळवायचे ? हे माहीत नसेल त्याला शरीररूपी रथ ओढायची संधी मिळेल का ?
विचार करण्यासारखी गोष्ट होती.
परमेश्वरी संकेताने माझ्या प्रश्नाचे उत्तर मला दिलेले होते.
सुरेख
उत्तर द्याहटवा