अशी ही विकासाची ( उत्क्रांतिची ) प्रक्रिया आहे ! त्यामध्ये आपल्याला पडणे भाग आहे. शारीरीक, मानसिक, आध्यात्मिक आणि बाह्य जगतात एकाचवेळी बदल घडत जातील !
पूर्वी 'दृश्य स्वरूपात दिसणारा धुर ' निघणारी वाहने होती ! त्यानंतर 'अदृश्य स्वरूपात धूर ' निघणारी वाहने प्रचलित झाली.
त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटीवर चालणारी वाहने सुरू झालीत. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि इलेक्ट्रॉनिक्सवर आधारित आणि इंटरनेटवर आधारित वाहने सुरू झाली !
त्याच्यानंतर व्याक्युम आणि अॅन्टीग्रॅव्हिटी तत्त्वावर चालणारी वाहनाची असणार आहेत !
आता मुद्दा असा आहे की , आपल्याला दोन्ही गोष्टी करायचे आहेत !
एक म्हणजे ह्या बदलामुळे आपल्या शरीरावर बदल होतील ! हे बदल आपले शरीर सहन करू शकणार नाही ! त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक नाही तर अनेक प्रकारच्या शिल्डींग डेव्हलप कराव्या लागतील !
आणि त्या शिल्डींग डेव्हलप करताना आपल्या बुद्धीचा भाग कमी व्हायला नको ! किंवा आपल्या शारीरिक स्नायूंची क्षमता कमी व्हायला नको ! त्याचप्रमाणे आपली पोटेन्शियल सृजनक्षमता कमी व्हायला नको !
अशा एक ना अनेक चॅलेंजेस आव्हाने मानव जातीच्या आणि प्रत्येक कुटुंबाच्या प्रधान प्रमुखावर वर आहेत.
दुसरी गोष्ट करावी लागणार ती ही आहे की डोळे मिटून बसूनपण चालणार नाही आणि उत्क्रांतिला विरोध करूनपण चालणार नाही! त्यामुळे जास्तीत जास्त तंत्र कमीत कमी वेळात शरीरात योगा प्राणायाम आहार विहार व्यायाम ज्ञान ध्यान करून डेव्हलप करायची आहेत!
कारण प्रत्येकजण जेव्हा हे करेल तेव्हा आपला देश विकसित देशांच्या यादीत सामिल होईल पण हा तर याचा साईड ईफेक्ट आहे मुख्य फायदा तर हा आहे की सरव्हायव्हल म्हणजे आपण जिवंत राहू हा आहे ! पूर्वी औषध म्हणजे ड्रग्स् खावून शरीराला बधीर करून काम चालून जायचे पण प्रकाश उर्जेवर चालणारी वाहने आल्यापासून याचा उपयोग सरव्हायव्हलसाठी होणार नाही
हे लक्षात घेणे गरजेचे आहे! ही गोष्ट जोक समजून इग्नोर करण्यासारखी नाही.
जे लोक योग्य ती पाऊले उचलणार नाहीत ते स्वतःच एक इंधन म्हणून या उत्क्रांतिच्या वेगात वापरली जाण्याची दाट शक्यता आहे.
जे लोक गव्हर्मेंटच्या अध्यादेशाची किंवा कायद्याची वाट बघत राहतील ते लोक मूर्ख आहेत कारण भारत हा विकसित देश नाही.
भारतीय गव्हर्मेंटमध्ये उच्चशिक्षित लोकांची कमतरता असल्यामुळे भारतीय गव्हर्मेंट कडून अध्यादेश निघण्याची वाट पाहणे म्हणजे स्वतावर आणि स्वतःच्या कुटुंबावर कुऱ्हाड मारून घेऊन विकलांग अवस्थेत जीवन जगण्याची पाळी येऊ शकते म्हणून शहाण्या आणि उच्चशिक्षित घरांनी या गोष्टीचे महत्त्व जाणून योग्य ती अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू केलेली आहे !
या काही अशा सूक्ष्म गोष्टी आहेत , की ज्या केवळ कौटुंबिक आणि पारिवारिक स्तरावर बोलल्या जात आहेत ! बाहेर आपल्याला मौनच ठेवावे लागणार आहे !
आपला इतर कोणाशीही क्लॅश होणार नाही . भांडण बोलचाल वादविवाद होणार नाही याची संपूर्ण काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण यानेच घसरगुंडी आणि खोखो टळणार आहे ! त्यामुळे बाहेर मौन ठेवणे हाच अत्यंत सुंदर उपाय यावर आहे .
विघातक शक्ती अर्थचक्र चालू करण्यासाठी आणि उर्जा उत्पन्न करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आणि सूक्ष्म पद्धतीने भांडणे लावायचा प्रयत्न करतील ! त्यामुळे आपल्याला अत्यंत उच्च स्तरावर , उच्च प्लेनवर राहून कोणत्याही चक्रात भटकायचे नाही ! कोणत्याही भांडणात पडायचे नाही ! ही मुख्य खबरदारी आहे आणि आपल्या स्वाध्यायात प्रमाद करायचा नाही !
आपली दैनंदिनी बनवून त्याप्रमाणे योग्य आरोग्यदायी दिनचर्या कुटुंबातील प्रत्येकाने फॉलो करणे हे आता कोणालाही सांगावे लागण्याची गरज पडायला नको.
जे काही डिस्कशन होणार आहे . ते आपल्या कुटुंबात आणि परिवारातच होईल ! चार चौघात बोलताना राहतांना आपल्याला अत्यंत कुशलपणे व्यावहारिक दृष्ट्या कॉमनसेन्स वापरून आणि चतुराईने राहायचे आहे ! जेणेकरून कोणीही दुखावले जाणार नाही ! कारण की आता ज्ञानाचा शॉक सुद्धा सहन करण्याची मानसिक तयारी बाहेरील लोकांमध्ये नाही ! त्यामुळे केवळ स्माईल द्या ! जय गुरुदेव ओम शांती म्हणा!
परिवारासाठी ही वेळ आपापसात समजूतदारपणा मिटींग्स डिस्कशन अंडरस्टँडिंग कॉम्प्रमाईजसिंग या गोष्टी करण्याची आहे ! कोणत्याही प्रकारचे सूक्ष्म स्वरूपात सुद्धा वाद घालण्याची ही वेळ नाही !
जय मल्हार ||🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा