नाना का मॅट्रीक्स !


मायाजाळाची व्याख्या करणे शक्य आहे का ? 

कधीही पूर्णपणे ताब्यात न येणारे, कधीही पूर्णपणे न संपणारे, ' मायाजाळ ' हे लोकांना सतत नित्यनुतन वाटणारी, लोकांच्या आशानिराशा-भावभावना चेतवणारी शक्ती आहे. 

ना म्हणजे , शरीराची माया !
नाना म्हणजे, बाह्यसृष्टीतील शरीरांची माया !

पापाचा पाया बाह्यदृष्टीत आहे. कारण, माणूस एकदा का बाहेर बघायला लागला की, त्याला स्वतःचा विसर पडतो. कारण बाह्यमाया त्याच्या मनाला आणि डोळ्यांना आकर्षीत करून घेते आणि त्याला समाधी लागू देत नाही.  गुरुच्या संरक्षणाशिवाय ध्यानसमाधी लागणे, ही देखील फार कठीण गोष्ट आहे. ध्यानसमाधीशिवाय स्वतःची देहधारणा आणि बाहयसृष्टीची देहधारणा हे मॅट्रीक्सचा एक अविभाज्य भाग बनुन जातात. 

बाह्यसृष्टीतील शरीरांशी प्रेमळपणे, गोडपणे, विसडम वापरून, कॉमनसेन्स वापरून, अक्कल हुशारी वापरून, व्यवहारी राहून वागा. असे सर्व संत सांगत आलेले आहेत. कारण की, बाह्यसृष्टीची माया जशी आपल्याला ऊर्जा पुरवते, तशी आपल्याकडून ऊर्जा काढून देखील घेऊ शकते ! त्यामुळे, आपण सजगपणे बाहेर सृष्टीशी डील केली पाहिजे. कारण हे एक मॅट्रिक्स आहे. श्रीकृष्णाचे मायाजाळ आहे. श्रीकृष्णाची अहैतूक कृपा झाल्याशिवाय, या मायाजाळातून मुक्त होणे कठीण असते. कोळ्याच्या जाळ्यात अटकलेली माशी, जेवढी धडपड करते, तेवढी ती कोळ्याच्या जाळ्यात अधिकाधिक अटकत जाते. असे हे मॅट्रिक्स आहे. कधी न संपणाऱ्या ट्रिक्स यात आहेत. ज्या गोष्टीशी लढून उपयोग नाही तिच्याशी माणूस सख्य करून घेतो. भगवंताची शक्ती असलेल्या मायाजाळातून सुटण्यासाठी स्वतः माया मदत करेल, असा विचार करून बरेच लोक मायेची भक्ती करतात. 


राई म्हणजे काय ? 

राई आणि वनराई यातील फरक समजणे गरजेचे आहे.

म्हणजे, मन !
म्हणजे, शरीर !
रा म्हणजे, बाह्य जिवन शक्ती !
म्हणजे, उर्जा !

' वन किंवा वनराई ' म्हणजे, लोकांची मने आणि लोकांची शरीरे असलेली ' बाह्यसृष्टी किंवा बाह्यमाया ' !

' वन ' आणि त्याची शक्ती ' वानी ' ही जेव्हा प्रकट होते तेव्हा तिला ' भवानी ' असं म्हणतात. 

परंतु, आपण जेव्हा केवळ ' राई ' असे म्हणतो. आणि त्यातून ' वन ' हे दोन अक्षरे वगळतो, त्यावेळेला आपण अशा ऊर्जेचा उल्लेख करत असतो की, ज्यात मन आणि शरीर यांचा काडीमात्र देखील संबंध नाही. अशी ही बाह्यसृष्टीतील ऊर्जा म्हणजे, ' राई !' 

जीवनीशक्ती देणाऱ्या जननी बद्दल, रामाची शक्ती असलेल्या जानकीबद्दल, म्हणजेच, ह्या ' राई ' बाबत आपण बोलत असतो, जी तुम्हाला ' वन ' देऊ शकते. म्हणजे, ' मन असलेले मानवी शरीर ' देण्याची क्षमता या राईमध्ये आहे. परंतु, तिला स्वतःला मन आणि शरीर नाही. हे सर्वप्रथम आपण समजून घेतले पाहिजे.

राईतुन ' वन आणि वानी ' निर्माण झाली आहे. त्यातुनच पुढे भवानी प्रकट होते. 

मुळप्रकृती असलेल्या या ' राईबद्दल किंवा जगदंब शक्तिबाबत ' संपूर्ण आयुष्यभर सर्वांना कुतुहल राहते ! 


विठ्ठल म्हणजे काय ?

राईचा वल्लभ ' विठ्ठल ' आहे. कारण की, तो राईला खूप माईंडफुल, इंटेलिजंट पद्धतीने हॅण्डल करण्याची क्षमता बाळगतो ! बृहद शरीरप्रकृती आणि अफाट सामर्थ्य तसेच, प्रचंड मनशक्ती ' विठ्ठल ' यास शब्दाने संबोधित केली जाते. तो ह्या राई म्हणजे, सर्व मानवी शरीरांच्या ' माँ ' शिवाय राहूच शकत नाही. म्हणजे तो तिचा कायमचा सोबती म्हणजे, ऊली आहे. म्हणून, त्याला ' माऊली ' असे देखील म्हणतात. विठ्ठल हा, जो कधी जन्मलाच नाही, अश्या ध्यानसमाधी स्वरूप परमात्मा रामाचा भक्त आहे. रामाचे वर्णन करतांना बुद्धकौशिक ऋषी रामरक्षा स्तोत्रामध्ये म्हणतात, ' माता रामो , मत्पिता रामचंद्र: ' ! याचा एक अर्थ असा होतो की, एकाच रामापासूनच माता आणि पिता दोन्ही बनलेले आहेत ! रामतत्व हेच माता व पिता दोन्ही आहेत. माता आणि पिता या दोन्हींना ऍक्टिव्हेट करणारा ' राम ' हा एकमेव अद्वितीय असे परब्रम्ह आहे. एवढेच समजते. कारण, सत्य रामस्वरूप हे आपल्या इंटेलिजन्स आणि माईंड याच्या पलीकडची गोष्ट आहे. रामनाम हे श्रद्धा, सबुरी आणि भक्तीने जपण्याची गोष्ट आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

नाना का मॅट्रीक्स !

मायाजाळाची व्याख्या करणे शक्य आहे का ?  कधीही पूर्णपणे ताब्यात न येणारे, कधीही पूर्णपणे न संपणारे, ' मायाजाळ ' हे लोकांना सतत नित्यन...

एकूण पृष्ठदृश्ये :