अनघ म्हणजे जो पाप रहित व घात अपघात रहित आहे असा पवित्र आत्मा! अनघ आत्म्यांची सेवा ही शीव( कल्याण कारक पवित्र) सेवा, सती( आत्मसमर्पण व त्याग) सेवा, अध्ययन सेवा, भक्ती सेवा ह्या माध्यमातून केली जाते.
अच्युत म्हणजे अचुक, न चुकणारा, कोणत्याही भोगाचे आकर्षण नसलेला, कार्यातून व्हॅल्यू क्रिएट करणारा, लोकांची व वस्तुची पारख असणारा!
अच्युत आत्म्यांची सेवा ही 'श्री सेवा' म्हणजे बुद्धी देणाऱ्या तत्वांची जप करून केलेली सेवा, 'अव्दैत सेवा' म्हणजे एकमेवा अव्दीतीय अश्या ज्ञानी ,दानी ,संरक्षक, प्रकाशमय, सद् चिद् आनंदमय परमात्म्याची प्रार्थना व ध्यानाने केलेली सेवा. अच्युत आत्म्यांची सेवा शं ( शाम ) मंत्राची व शन्नैच्चराची समजून उमजून केलेली सेवा.
अनंत म्हणजे रुलींग ॲण्ड टॅक्सींग किंग इलेमेंट!
अनंताची सेवा श्रीप्रभु रामचंद्रांचा मनातल्या मनात जप करून त्याच बरोबर सतत आनंदी प्रसन्न राहून केली जाते.
गोविंद म्हणजे परमात्म्याचे अप्रकाशित ज्ञान जाणून असलेले सिद्ध आत्मे!
गोविंदाची सेवा म्हणजेच सर्वाकर्षक श्रीकृष्णांची सेवा! त्यांना नैवेदय देवून, भेट देवून ,मानपान सन्मान देवून व त्यांच्या कोणत्याही गोष्टीला विरोध न करून, आनंदी व चतुर चोख व्यवहार करून, चैतन्यमय राहून जगणे व सर्व जप गोविंदाय स्वाहाः करणे. दिलारामाची सेवा करणे म्हणजे हृदयात आनंद निर्माण होईल असे कर्म करणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा