तुळ्जा भवानी देवी जशी आगम आणि निर्गमन,
चंद्र आणि सुर्य नाडी, पुरुष आणि स्त्री तत्व यामधील समतोल साधणारी शक्ती आहे. त्याप्रमाणेच, विशालाक्षि देवी ही परा प्रकृती ( सोल कॉन्शिअसनेस, भगवान) आणि अपरा प्रकृती ( बॉडी कॉन्शिअसनेस, सैतान) यांना बॅलन्स करणारी मानली जाते. शीव तत्व आणि गणेश तत्व, विनाश आणि सृजन अशी दोन भिन्न प्रकृती सृष्टीमध्ये एकाचवेळी अस्तीत्वात राहण्यामागे विशालाक्षी देवीची शक्ती मानली जात असावी.
हा बॅलन्स अॅचीव्ह का करावा लागतो ? सृष्टीचे अस्तीत्व टिकविण्यासाठी ! मानवी शरीर असो की बाह्य जगातील सृष्टी शरीर असो. शारीरीक मानसिक संतुलन जसे मनुष्याला आरोग्यासाठी आवश्यक असते त्याचप्रमाणे बाह्यसृष्टी प्रकृतीत प्राकृतीक संतुलन असणे आवश्यक असते. नवनवीन बाळे जन्माला येतच राहतात आणि सृष्टीचक्र चालूच राहते. थोडक्यात काय तर सृष्टीतील हा इंटेलिजेन्स देवीच्या रुपाने पूजला जातो.
मलहार देव सृष्टी स्वच्छतेचे (नदीनाडी शोधन) कार्य पावसाळ्यात तुर्तास थांबवतात जेणेकरून सृष्टीला सृजन कार्यात अडथळा येणार नाही.
अशावेळी विशालाक्षी देवी कर्म सिद्धांतानुसार तिचे प्राकृतिक संरक्षण आणि संतुलनाचे कार्य करते.
सृष्टीच्या सृजनाच्या पावसाळ्याच्या ४ महिन्यामध्ये चातुर्मास पाळतात. आषाढी एकादशी करतात, श्रावणमास पाळतात. श्रावण सोमवार व्रत करतात. गणेश चतुर्थी करतात त्यानंतर पितृपंधरवाडा तर्पण करतात.
भाद्रपद ऋतूत पावसाळा भरपूर झाल्यावर सरस्वती जवळजवळ ब्लॉक झालेली असते. सरस्वति नाडी बंद झाल्यावर मंत्र शक्ती बंद होते. जपतप यांचा प्रभाव कमी व्हायला लागतो. पावसाळ्यात दक्षिणायन सुरु झालेले असते. सरस्वति बंद असल्याने दक्षिणायनात मेल्यास मुक्तीचा चान्स फारच कमी, न के बराबर असतो.
शिवकालीन इतिहासात, सिद्धी जोहरने पन्हाळ्यास पावसाळ्यातच वेढा घातला होता अशावेळी राजांना विशाळगडाकडे शिफ्ट व्हावे लागले होते.
मिलीटरी पावसाळ्यात शक्यतोवर युद्ध टाळते.
नवीन तह करार कॉन्ट्रॅक्ट पावसाळ्यात होतात.
मुंग्यांनी पावसाळ्याचे चार महिन्यांचा अंदाज घेऊन अन्नाचे नियोजन करून ठेवलेले असते. वर्षभर केलेले कर्मयज्ञपुण्य पावसाळ्यात पावसाच्या रुपाने बरसते. त्यामुळे पावसाळ्यात वाहन खरेदी जास्त होते.
योग कर्मसु कौशल्यं असे म्हटले जाते. अन्न इंधन शक्ती बुद्धीचा योग्य वेळी योग्यप्रकारे सूर्याची गती पाहून करणे शरीरधारी जिवात्म्यास फार आवश्यक आहे जेणेकरून योगभ्रष्ट होणार नाही आणि योगनिधी व्यर्थ ठिकाणी वायाही जाणार नाही. पावित्र्य नैतिकता ही जीवनातील कर्म सिद्धांतातील महत्वाची गोष्ट आहे. पण अर्धवट ज्ञान, भोळेपणा , इनोसन्स आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करतो. योगात योगीचे आरोग्य चांगले असेल तरच त्याला योग साधता येतो. कॉमन सेन्स आणि
आरोग्याचे ज्ञान पूर्णपणे करून घेणे आवश्यक ठरते. त्यासाठी विसडम डेव्हलप करावा लागतो. एक चांगला हेल्थ हॅपिनेस विसडम गुरु आयुष्यात असणे फार आवश्यक असते. प्रभु येशु, शंभुराजे यांनी विसडम गुरुंना डावलल्यामुळे त्यांना मुक्तीच्या मार्गात क्षोभ सहन करावा लागलेला आहे. हे आपण इतिहासातून लक्षात घ्यावे. बौद्ध विपश्यना टेकनिक, प्रकाशप्रार्थना, विठ्ठल भजन यासारख्या गोष्टी अशावेळी कामात येतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा