सुरवातीला फक्त पाण्याचा समुद्र होता. त्यावर प्रकाश तळपत होता. आणि एक शब्द होता. मग परमेश्वराला सृष्टी निर्माण करावी अशी इच्छा झाली.
तो पाण्याचा समुद्र " सी " म्हणजेच जीवनाचा सागर !
पाण्यावरील मूळ प्रकाश म्हणजेच रां !
मूळ शब्द म्हणजेच " अ "
परमेश्वराची इच्छा " उम " म्हणजे कुलदेवता !
अशाप्रकारे " अ " आणि " उम " संयोगापासून " ॐ " तयार होतो.
कुलदेवतेच्या इच्छेनुसार प्रकाशाची तीव्रता समुद्रात लाटा आणि वायूच्या वाफा निर्माण करतात. आणि सगळेच्या सगळे कामाला लागतात.
समुद्रातील विविध विचार विविध मंत्र तंत्र यंत्र म्हणजे समुद्रातील विविध लाटा होत !
पण यातील पडद्यामागील सुत्रधार निर्वात पोकळीतील कृष्ण चैतन्य तत्व सहजासहजी लक्षात येत नाही.
कृष्ण चैतन्याचा प्रादुर्भाव सुप्त अवस्थेत लीन असलेल्या अदृश्य शीव शक्तीत होतो.
पंचतत्वे शीव शक्तीतून निर्माण होतात. ती गणपतीची बोटे !
प्रकाशाच्या तडाख्याने तयार झालेल्या वायूने वारे वाहू लागतात. जोरदार वार्यामुळे ती बोटे जीवनाच्या समुद्रात कार्यरत होतात.
समुद्रात जश्या अनेक लाटा येतात..............
, कधी चाटा मारून ................................
तर कधी खाटा उभ्या करून .....................
.........निघून जातात. .............................
...............................पण पाणी तेच राहते.
..................त्याचप्रकारे .........................
.............वेगवेगळ्या नावाची साम्राज्ये येतात
.........................................आणि जातात
, ...तरीदेखील .... जीवनावर......................
....अखंड साम्राज्य.................................
................. परमेश्वराच्या इच्छेचेच राहते....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा