आपल्या गावाचे नदी नाले आपण का साफ केले पाहिजे ?


चालाखीने आपण कोणत्याही राजधानीतील राजवाड्यावरील
कोणत्याही महाराजांचे चालाख चेले जरी झाले तरी आपले 
अंग धुवायला आपल्याला आपल्या घरीच यावे लागते !

 त्याचप्रमाणे आपल्या जिवनाची कारकिर्द स्वित्झरलँड आणि फिनलँडवर करून आल्यावर जेव्हा आपण मरू तेव्हा आपले प्रेत जाळायला आपल्या गावीच आणले जाईल ! आणि अंत्यसंस्कार करण्यासाठी आपल्या गावाचेच पाणी वापरले जाईल !

आपली अस्थीरक्षा वाहत वाहत चीरशांती देणाऱ्या प्रशांत महासागरापर्यंत तेव्हाच पोहोचेल, जेव्हा आपल्या गावच्या नदया नाले स्वच्छ असतील !

हे सनातन सत्य आपण लक्षात ठेवावे.

लोकांचे पाणी आणि कागद वापरून किती दिवस स्वतःचे अंग पुसणार ?

बोलायला सगळेच बोलतात की, संस्कार केले तर संस्कृती टिकेल ! 

पण आपण हा विचार केलात का कधी की, संस्कार कधी टिकतील ?

रहायला जमिन आणि धुवायला पाणी असेल तरच !

कृष्णाने यमुनेतला काळा नाग साफ केला !
आपण निदान आपण आपल्या शरीरातला जत तरी साफ करावा ! 

आपल्या घराच्या गटारीतील बाटल्या तरी साफ कराव्या ! आपल्या घरच्या नाल्या तरी साफ ठेवाव्या. त्या रस्त्यावर सोडू नये ! 

आगीत बसुन रामनाम घेणारी आई सितामाता ! आगीत बसुन हरिनाम घेणारे प्रल्हाद महाराज ! हे खरे नामदानी ! प्रॅक्टीकली प्रुव्हन भक्त ! हे खरे अन्नदाते ! सन्मानास पात्र आहेत ! नाल्याच्या काठी खुर्चीत बसून बत्ताश्या वाटणारे नव्हेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

आजकाल 'आत्मनिर्भरपणे पैसे सांभाळायचे आणि कमावयाचे ज्ञान ' युनिव्हसिटीत मिळत नसावे की काय म्हणून केवळ सुशिक्षित म्हणवणारे आपण ! उच्चभ्रु लोक ! 

इंधन, संपत्ती, अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गोष्टी वाढवण्यासाठी योग्य काय करावे हे माहित असून देखील, आपण केवळ मार्केटच्या पैश्यावर डल्ला मारणार्या, पैसे काढघाल काढघाल करणार्‍यांची संघटना स्ट्रॉंग करून ठेवल्यामुळे पैशाचीपोते रूपी प्रेत उचलणे, हालवणे आणि सांभाळून ठेवणे, यातच आपली जिंदगी जाते !

 त्यामुळे आपण लोकांकडे दिखाव्यासाठी पैसे सोने जमले तर आहे पण  आपल्याला ऑक्सिजन देणारी एक साधी घरची तुळशी जगवता येत नाही. 

आपल्या स्वतःच्या गावात नदी नाले चोंबलेले दिसतात ! आरोग्याचे तीन तेरा वाजलेले दिसतात. ही वस्तुस्थिती आपण का डावलतो?

Disclaimer: कृपया सदर विषय हा प्रत्येक वाचकाने व्यक्तिगत आत्मपरिक्षण म्हणून हाताळावा !

Clear water

# Clean soil

# Being conscious on planet earth 



1 टिप्पणी:

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ओ पियापिया, तुने क्यों गोविंद भुला दिया ?

ज्यांची अज्ञातपणे, अज्ञानवशात, किंवा अजाणतेपणे, किंवा हतबलतेमुळे, किंवा कर्मवशात, सुशुमनासरस्वती नाडी ब्लॉक झाली आहे. अशा लोकांना नामजपाचा व...

एकूण पृष्ठदृश्ये :