जी प्रत्येक जीवात्म्याची अंतिम ईच्छा आहे !
समजा की, तुम्ही तृप्त होवून, ज्ञानी होऊन, संयमी समाधानी होऊन तुमचा देह त्याग केला आहे !
किंवा,
डिप मेडिटेशनमध्ये तुम्ही आता गेलेला आहात !
तुमचे मन विशुद्धी चक्र ( ह ) आणि मूलाधार चक्र ( ल ) यातच आयुष्यभर गोते खात होते ............................
..........................आता तुम्ही त्याचा त्याग ( म ) करून,
तुम्ही तुमच्या देहाबाहेर आलेले आहात !
...........................
..........................
म-ह-ल बाहेर आलेला आहात !
तुम्ही तुमची बाह्यजिवनशक्ती (रा) संपवली (म) आहे !
आणि आपल्या ध्यानदृष्टीने (सि) आपल्याच स्वरूपाकडे तुम्ही बघत आहात.
तुम्ही राम स्वरूप आहात आणि तुमच्या समोर तुमचे सिता स्वरूप आहे ! या दोन्ही स्वरूपामध्ये लाल रक्ताचा दरवाजा आहे !
या लाल दरवाजावरील ' ध्यान बैठकीचे सिम्बॉल ' आणि ' विशुद्धीचक्राचे सिम्बॉल ' दाखविलेले आहे !
ते सिम्बॉल म्हणजे तो दरवाजा ( म्हणजे ध्यानसमाधि ) चालू किंवा बंद करण्याचे प्रतिक स्वरूप दर्शविलेले आहे.
तुमचे मनस्वरूप स्वतःचेच प्रतिबिंब पाण्यातील आरशात बघून जीवन जगत होते !
ह्या जीवनाच्या पाण्याच्या आरशाला अनेक अशोक वृक्षांनी दोन्ही बाजूने संरक्षित ठेवले होते !
तुमच्या तमस्वरूप शरीराबाहेर, चारी दिशेला तुमचे मन होते ! ते चार मनाचे मनोरे, तुम्हीच बांधून ठेवले आहेत !
तुमच्या तमस्वरूप शरीराबाहेर, चारी दिशेला तुमचे मन होते ! ते चार मनाचे मनोरे, तुम्हीच बांधून ठेवले आहेत !
चौरस आणि चौकस आहे !
पण जसे जसे तुम्ही मनाच्या अंतरंगात शिरू लागतात
......... तुम्ही अष्टकोनी होत जातात !
तुमचे अंतरंग गोविंद स्वरूप गोल घुमटाकार आहे ! त्याला कोणताही कोन नाही.
# Architecture for Meditation !
तुमचे अंतरंग गोविंद स्वरूप गोल घुमटाकार आहे ! त्याला कोणताही कोन नाही.
तुमच्या अंतरंगाचे चारही बाजूने संरक्षण करणाऱ्या चार अष्टकोनी छत्र्या आहेत !
गोविंद स्वरूपातून सरळ वर उंच उत्सर्जित झालेली.....
दिव्य ( अल ) नामरूपी ' आह ' ......
राम ' चंद्रकलश ' स्वरूपात दिसत आहे !
तर.....
हे असे होते तुमचे दिलाराम ..........आत्मस्वरूप !!!!
जे तुम्ही आता वाचिक ध्यानातून बघीतले.
मग ??
ताज महल ध्यान करून, स्वतःचे अंतरंग, दिव्य स्वरूप बघून कसे वाटले ?
अशाच प्रकारे तुम्ही पंचकोष ध्यान, ज्योतिबिंदू ध्यान, उगवता सूर्य किंवा पौर्णिमेचा चंद्र बघुन ध्यान करू शकतात.
नियमित ध्यान केल्याने आपली प्रकृती सुधारते !
मन प्रसन्न बनते !
जिवनाविषयी पॉझिटिव्ह दृष्टीकोण राहतो !
केवळ ध्यान हीच साधना आहे असेही नाही. ध्यानाला सेवेची आणि सतवृत्तीची जोड असावीच लागते. म्हणजे ध्यान योगासाठी आवश्यक असलेले आपले आरोग्य रूप कुळ यांचे रक्षण होते.
Disclaimer( टिप ) :
१) कृपया ध्यान कसे करावे?
हे बोनाफाईड गुरुच्या मार्गदर्शनाखाली
प्रथम शिकून घ्यावे !
२) ध्यान आपल्याला सोईस्कर असेल अशा संरक्षित जागीच करावे !
३) तसेच, ध्यान ...............तन मन
प्रसन्न व पवित्र केल्यावरच करावे !
# Architecture for Meditation !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा