' रामरक्षा स्तोत्र ' तसेच ' श्री स्वामी समर्थ सारामृत ' यामध्ये " अजानुबाहू " हा शब्द वापरलेला आढळतो .
आज आपण या शब्दाविषयी थोडे विचारमंथन करूयात !
जीवन जगतांना आपण एकमेकांकडे बघत एकमेकांची जेलसी करत जातो, तर कधी एकमेकांचे अनुकरण करीत जातो, एकमेकांशी स्पर्धा करू लागतो तर कधी एकमेकांची सेवा करू लागतो. एकमेकांची कुरघोडी काढु लागतो तर कधी एकमेकांना शीव्याशाप तळतळाट देऊ लागतो. ह्या सर्व गोष्टी या चक्रव्युहात नेहमीच्या आहेत.
सिद्धी, समृद्धी, ज्ञान, सन्मान आदि गोष्टींचा अभिमान वाढत जावून मूळचा मुक्त पवित्र असलेला जीवात्मा बाह्य दृष्टीच्या देखाव्यात आणि देहरूपी चक्रव्युहात अभिमन्युसारखा फसत जातो आणि नंतर इतरांनाही फसवत जातो ! स्वतःला गोंजारत इतरांनाही गोंजारत जातो आणि नंतर स्वतःला खाजवण्याबरोबर इतरांनाही खाजवत जातो !
रामायणात प्रभु रामचंद्रानी देहरूपी चक्रात ( लंकेत ) प्रवेश करणे आणि त्यातून सहीसलामत बाहेर पडणे ही गोष्ट सिम्युलेट करून दाखविली आहे.
कधीही न संपणारे हे चक्र आहे त्यामुळे याला परपेच्चुअल मोशन मशीन असेही म्हणतात.
माया चक्र चालक भगवान श्रीकृष्ण , चक्र मुक्ती दाता श्रीहनुमंत, चक्र ज्ञान दाता श्रीगणेशगुरु यांची श्रद्धा सबुरीने केलेली सेवा, भक्ती , त्यांनी दिलेल्या साधनेचे तसेच शिकविलेल्या सनातन कायद्याचे शिस्तीने केलेले अनुसरण ह्या गोष्टी जीवात्म्याला चक्रव्युहातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी सहाय्यभुत ठरतात.
चक्रपूजेमध्ये चक्र मांडलेले असते. आणि त्या चक्राच्या मध्यभागी जे बळी ठेवलेले असते, त्याला ' अज ' असेही म्हणतात.
सर्वांत सुक्ष्म चक्र जे आपणास माहित आहे, ते म्हणजे अणुची संरचना ! ज्यात केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. केंद्रकाची गुरुत्वशक्ती प्रचंड असते. त्या अणु केंद्रकाला आपण अज म्हणूयात. व केंद्रकाच्या गुरुत्वशक्तीच्या ' इंडक्शन लाईन्स ' जरी दिसत नसल्या तरीही त्या कार्यरत असतात. त्या इंडक्शन लाईन्सला आपण ' बाहू ' म्हणूयात.
तर अशा प्रकारे ' अज + अणु + बाहु ' = ' अजानुबाहु ' हा शब्द तयार होतो.
सुर्यमालाची संरचना देखील अणु सारखी आहे. सुर्याच्या प्रभावाने पृथ्वीवरील जीवनचक्र चालते.
त्याचप्रमाणे आपल्या मिल्कीवे गॅलेक्सीच्या केंद्राचा प्रभाव असतो. गॅलॅक्सी ची संरचना देखील अणु सारखी आहे. सर्व गॅलॅक्सी ज्या केंद्रकाभोवती गुरुत्वाकर्षीत आहेत ते त्यांचे 'अज ' आहे.
' अज ' हया शब्दाचा उल्लेख विष्णु सहस्त्रनाम मध्येही आहे. त्यात अज ह्या शब्दाचा अर्थ ' ज्याचा कधीही जन्म झालेला नाही ' किंवा ' अतिशय पवित्र ' किंवा ' दिव्य ' असाही होतो.
आपल्या शरीररूपी बॉडीस्टारमध्येही केंद्र असतात जे तेथील ' अज ' स्थाने असतात.
आपल्या बॉडीस्टारच्या सर्वांत वरच्या भागाला ज्याला आपण डोके म्हणतो, त्याच्या भ्रुकुटी मध्यावरील स्थान हे डोक्याचे ' अज ' क्षेत्र किंवा ' अज ' स्थान आहे.
जर तुम्हाला योगी लोकांच्या मुर्त्या बघीतल्या तर सुरुवातीला तुम्हाला असे वाटू शकते की ते तुमच्याकडे पाहत आहेत.
पण प्रत्यक्षात ते त्यांच्या डोळ्यांच्या भुवयांच्या मध्यभागी पाहत असतात.
कपाळावरील शरीराचे हे स्थान अनेक नावांनी ओळखले जाते किंवा परिभाषित केले जाते जसे; त्रिवेणी क्षेत्र, सूक्ष्म शक्तीचे केंद्र, वेदी शक्तीचे केंद्र, संगम क्षेत्र, कालभैरव क्षेत्र, विश्वनाथ क्षेत्र, काशी क्षेत्र, मोझेसचा डोंगर, प्रयाग क्षेत्र, अज क्षेत्र इ.
विठ्ठलाचे त्याच्या कपाळावरील क्षेत्रावरच सतत ध्यान चालू असते. विठ्ठलाच्या आरतित विठ्ठलाला ' अनुक्षेत्रपाळा ' किंवा ' अणुक्षेत्रपाळा ' असे संबोधीलेले आहे.
स्वतःच्या कपाळावरील आत्मनिर्भरतेचे मुंबई अर्थक्षेत्र ज्या विठोबाला कळले त्याच्या डोळ्याची सिता इतर कोणालाच भाव देत नाही.
हे विश्व परस्पर विरोधी तत्वांनी बनलेले आहे. ज्ञान आणि अज्ञान या दोनही पासून बनलेले आहे. ज्याप्रमाणे,
गुढ हा शब्द ' ग ' म्हणजे ' सनातन ज्ञान ' आणि ' ढ ' म्हणजे ' अविद्या किंवा अज्ञान ' या परस्पर विरोधी अक्षरांपासून बनलेला आहे !
युद्धात सरेंडर करतांना गुढग्यावर बसून झुकतात तसेच नमाज पढतांना देखील गुढग्यावर वाकून बसतात.
शंकर महाराजांनी आपले दोन्ही गुढगे दोन्ही हातांनी स्वत: जवळ घेतलेले दिसतात. त्यांचा गुढ गोष्टीत हातखंडा आहे याचे ते निदर्शक असावे.
श्रीहरिचे ज्ञान गुढ गम्य आहे ! असा उल्लेख ज्ञानदेव हरिपाठ अभंग नंबर १७ मध्ये येतो.
ज्ञान गुढगम्य ज्ञानदेवा लाधले । निवृत्तीने दिधले माझे हाती ॥
रामरक्षेत " ध्यायेदाजानुबाहुम् " असे म्हणूनच बुधकौशीक ऋषी श्रीरामांचे वर्णनास प्रारंभ करतात.
श्रीरामाचे हात लांब असून ते त्यांच्या गुढग्यापर्यंत पोहोचलेले आहेत असे वर्णन आढळते.
श्रीस्वामी समर्थांचे हात देखील गुढग्यापर्यंत असतात.
ज्या लोकांचे हात लांब असून गुढग्यापर्यंत पोचलेले असतात त्यांना अजानुबाहू म्हणतात.
अशाप्रकारे ' अजानुबाहु ' या शब्दाचा ' लांब हात असलेला ' असा अर्थही घेतला जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा