माचोबाबा

माचोबाबाला अन्न, पैसा आणि वर्गणी मागायला आणि घ्यायला बिलकुल लाज वाटत नाही. हे माचोबाबाचे सर्वात पहिले लक्षण आहे.

माचोबाबाचे दुसरे लक्षण म्हणजे, तुम्ही त्याच्याशी मीटिंग करा, त्याचे तुम्ही ऐकून घेण्याचा प्रयत्न करा, आणि आपले म्हणणे सांगण्याचा प्रयत्न करा, तरीही माचोबाबा आपल्याला आपल्या प्रश्नांचे उत्तर देत नाही. हे झाले माचोबाबाचे दुसरे लक्षण ! 

१०वीच्या बोर्डच्या सायन्सच्या पेपरमधील हमखास येणारा प्रश्न म्हणजे, क्युपोलाची आकृती ! कोळसाचा क्युपोला जसा केवळ खाण्याचे आणि जाळून पचवायचे काम करतो त्याप्रमाणे, बऱ्याच लोकांचे निर्ढावलेली पोटं असतात. अशा कसल्याही लोकांमध्ये माचोबाबा सहज मिक्सअप होतो. त्याला अन्नाची, कपड्यांची काहीही स्वतःची चॉईस नसते. हे माचोबाबाचे तिसरे लक्षण आहे. 

हो हो म्हणणे, पण काहीच न करणे हे माचोबाबाचे चौथे महत्त्वाचे लक्षण आहे. म्हणजे, माचोबाबा आपल्याकडून पैसे घेतो. परंतु, आपले काम करतच नाही. त्याला जे पटेल तेच तो करत राहतो. आपण पैसे देऊन सुद्धा, तो आपल्या मनाप्रमाणे करणार नाही, जाब विचारल्यास मौन राहणे, हे चौथे महत्त्वाचे लक्षण माचोबाबाचे आहे. 

पाचवे महत्त्वाचे लक्षण म्हणजे, माचोबाबा माहिती गोळा करण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारतो. त्या माहितीचे तो ऍनालिसिस करतो. त्याच्या माचोबाबा गॅंगमध्ये तो त्या माहितीचे अनालिसिस सतत करत असतो व त्याच्या माचोबाबा गॅंगमध्ये तो सतत फोनद्वारे कनेक्टेड असतो. लोकांच्या मनात आपल्याच लोकांविषयी शंका, असुरक्षितता, अज्ञानाची काजळी पसविणे, खऱ्या ज्ञानावर व सत्यज्ञान देणाऱ्यावर टोपली झाकणे हे उदयोग करण्यात पटाईत असतो. हे पाचवे महत्त्वाचे लक्षण माचोबाबाचे आहे

माचोबाबा त्याच्या मनात काय आहे ? 
हे कधीच आपल्याला सांगत नाही व आपल्या मनातले मागचेपुढचे सर्व काही विचारून घेतो, किंवा ऐकून घेतो, आणि त्याचा डाटाबेस बनवतो. लोकांचे व लोकांच्या प्रॉपर्टीचे फोटो काढणे, लोकांचे बोलणे रेकॉर्ड करणे, लोकांच्या शारीरीक मानसिक आणि बौद्धिक कमजोरींची लिस्ट बनवून ठेवणे. हे माचोबाबाचे सहावे लक्षण आहे. 

माचोबाबाचे सातवे लक्षण म्हणजे, आपल्याकडून पैसे घेऊन, आपल्याकडून सहकार्य घेऊन सुद्धा, माचोबाबा आपल्याला उपयोगात पडत नाही. केवळ आपला टाईम खातो, आपला पैसा खातो, आपले अन्न खातो, आणि बांडगुळासारखा वाढत राहतो. आपण हरामी आहोत, त्यामुळे आपल्याला कधीच मुक्ती मिळणार नाही, हे त्याला पुरेपुर ठावूक असल्याने इतर साधकांना हि साधनेच्या वेळी डिस्टर्ब करणे, त्यांच्या मुक्तीच्या मार्गात अडथळा आणणे, त्याला आवडते.

निर्लज्ज असणे, आणि त्या निर्लज्जपणाला निराकार स्वरूप मानणे, किंवा स्वतःच्या अस्वच्छतेला आणि किळसवाण्या शरीराला धार्मिक मानणे, स्पिरिच्युअल मानणे, देवाच्या कार्यक्रमाच्या नावाखाली लोक जमवून कांड घडवून आणणे. हे माचोबाबाचे आठवे लक्षण आहे. 

आपल्याकडे कोणी दुसऱ्यांदा जाब विचारायला आला, प्रश्न विचारायला आला, अडचण घेवून आला, तर सर्वप्रथम त्याला आपली पाठ किंवा कुल्ले दाखवून उभे राहणे, इंद्रियांना खाजवणे, फोनवर आपण खूपच एंगेज बीझी आहोत असे भासवणे हे मायोबाबाचे नववे लक्षण आहे.

माचोबाबाचे मेजॉरिटी कस्टमर कॉमन पीपल टारगेट असल्याने कॉमनसेन्सला जास्त प्राधान्य आणि सिक्स्थ सेन्सला मिटींगमध्ये नेहमी डावलणे, माचोबाबा आवश्यक समजतो. लोकांना खावू घालून गप्प करणे, तसा गप्प नसेल होत, तर भांडणे लावून, रोग लावून अस्वस्थ करणे, जास्त प्रश्न विचारणाऱ्या शिष्याला रिक्षात बसवून विश्वरूप दर्शन द्यायला घेवून जाणे. हे माचोबाबाचे दहावे लक्षण आहे.

माचोबाबा आणि झोंबीबाबा यांच्यामधील फरक पहिले लक्षात घेणे आवश्यक आहे.
झोंबीबाबा, तुम्हाला त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीवरून आणि शरीरावरून लक्षात येऊ शकतो. परंतु माचोबाबा सहजासहजी काय ? जनरली लक्षातच येत नाही. कारण तो आपल्यासमोर सतत मौन राहतो. 
झोंबीबाबा इतर लोकांना त्याच्यासारखेच झोंबी बनवतो. त्याप्रमाणे माचोबाबा इतर लोकांना त्याच्या सारखेच माचो बनवतो. झोंबीला ओळखून पळून जाता येते. माचोबाबा लवकर ओळखू येत नाही. ओळखू आला तरी त्याच्यापासून पळून जाता येत नाही. सूर्याला, त्याला ताप देणारा सापडलेला नाही आणि चंद्राला, त्याला डाग देणारा सापडलेला नाही. त्यामुळे, सूर्य आणि चंद्र देखील माचोबाबाला शोधत फिरत असतात. 
ज्याने माचोबाबाला पकडले व त्याचे डिसेक्शन केले, त्याला १२वीच्या सायन्स प्रॅक्टीकलमध्ये बेडकाचे डिसेक्शन केल्यावर घाणपाणी आणि घाणवास याशिवाय काहीच हाती लागत नाही, त्याप्रमाणे काहीच हाती लागत नाही. आपली क्रिएटीव्हीटी आणि बुद्धी लावून बनविलेली, सर्व गडकिल्ले झाडेझुडूपे नष्ट होतील, मात्र आपल्या स्वतःच्या बुद्धीला बाजुला ठेवून, जे शेवाळ माचोबाबाला फॉलो करते, ते पृथ्वीवर टीकते. हे ज्ञान, वाळूचे किल्ले बनविणाऱ्या मानवी बुद्धीला समजले, तरी पचत नाही. माचोबाबाने ते ज्ञान पचविलेले असते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

नीचेवाला भी उपर देख रहा है !

उपर देखके नाम देवे डॅडा ! उपर देखके बजे नगाडा ! उपर देखके भाव बनें !  उपर देखके भाडा ! उपर देखके बनें रास्ता, और राह मोडे रनगाडा ! उपर दे...

एकूण पृष्ठदृश्ये :