श्रद्धा सबुरीच्या दोन लाईन !


साईबाबांनी जीवन जगण्याचे दोन मुख्य रस्ते सांगितलेले आहेत. त्यापैकी एक आहे, ' श्रद्धा ' आणि दुसरी आहे, ' सबुरी ' !

ज्यावेळेला तुम्ही साईबाबांचे श्रद्धाच्या लेनमधून दर्शन घेतात, त्यावेळेला तुम्हाला साईबाबांच्या चरणाचे दर्शन होते आणि ज्या वेळेला तुम्ही साईबाबांच्या सबुरीच्या लाईनमधुन जाऊन दर्शन घेतात, त्यावेळेला तुम्हाला साईबाबांच्या टाचेचे दर्शन होते.

' श्रद्धा ' हा एक जीवनाचा जीवन जगण्याचा मार्ग आहे. शरीर धरून ठेवणे आणि शरीराला जन्म देणे किंवा शरीराला जन्म घेण्यास मदत करणे, स्वतःचे शरीर टिकवणे व इतरांचेही शरीर टिकवणे किंवा इतरांना जन्म घेण्यासाठी मदत करणे. म्हणजे शरीर देणे आणि शरीर धरणे, ही श्रद्धा आहे !

श्राद्धविधी हा श्रद्धेचा मार्ग आहे. ' श्राद्ध ' म्हणजे, त्यात अनेक कर्मकांड येतात. कर्म प्रक्रिया येतात. कर्मयोग हा श्राद्धाचा भाग आहे.

मंगल करणे, म्हणजे पुनर स्थापित करणे, सृष्टी पुनर स्थापित करणे. सर्व प्रकारच्या मंगल गोष्टी ह्या श्राद्धाचा भाग आहे आणि अनेक लोक या श्राद्ध प्रक्रियेमध्ये पटाईत असतात. त्यांचे त्यात कौशल्य आणि नैपुण्य प्राप्त झालेले असते. त्याच्यामुळे त्याच्यात सीनियरिटीची वर्गवारी झालेली असते. जोपर्यंत देह आहे किंवा देहाला धारण करायचे आहे, तोपर्यंत श्राद्ध विधीचे महत्व कायम आहे. अनेक प्रकारच्या कर्म पद्धती ह्या शेवटी समाप्त केल्या, तर तुम्हाला लक्षात येतील की, या सर्व श्राद्धविधीच होत्या ! सर्व धंदे, बिजनेस या श्राद्धविधीशीच निगडित असतात.

' सबुरी ' म्हणजे, पेशन्स आहे ! सबुरी म्हणजे संयम आहे. ' सबुरी ' म्हणजे, तुम्हाला ध्यानयोग, समाधीयोग, अष्टांगयोग सारख्या क्रियाप्रक्रिया यांचे अनुसरण करावे लागते !
कर्मयोगापेक्षा क्रियायोगाला, सबुरी अवस्थेमध्ये जास्त महत्व आहे.
सहजध्यान याला, हाज म्हणजे, तीर्थ यात्रेपेक्षा जास्त महत्त्व आहे. साधनेला जास्त महत्त्व आहे
ब्रह्मचर्य सारख्या तपाचे पालन करणे, हनुमंतासारखे जीवन जगणे, याला ' सबुरी ' अवस्थेमध्ये महत्त्व आहे.
मौन साधना तसेच बुद्धी कौशल्याने जीवन प्रणाली हॅण्डल आणि मॅनेज करणे, सबुरी मार्गात महत्वाचे असते.

श्रीतत्व हे ' श्राद्ध प्रक्रिया ' म्हणजे, श्रद्धेने केले जाणारे कर्मकांड यांना मार्गदर्शक तत्त्व आहे.
' श्रीश्रीतत्व ' हे सबुरीने केल्या जाणाऱ्या ध्यान आणि योगा पद्धतीला सपोर्ट करणारे तत्त्व आहे.
साईबाबांचे दर्शन घेण्याच्या ह्या दोन भिन्न चॅनल आहेत. आपल्या नशिबात जी चैनल आली, ती चैनल आपण नियमबद्ध पद्धतीने फॉलो करणे अपरिहार्य ठरते.

अहंकार, अभिमान आणि अधिकार व त्यांच्या मागे शेपटी सारखे येणारे वादविवाद, विकार तसेच, अन्नसाखळीतील चतुरपणाने चालू असलेल्या हारजीत सारख्या गोष्टी गौण मानल्या जातात व मार्ग फॉलो करत राहणे जास्त महत्त्वाचे ठरते. 

तेल आणि तुप दोन्हीही शेवटी दिवा पेटविण्याच्या कामात येतात तसे,  रामायण-महाभारत हे एक मोठ्या लेव्हलचे श्राद्ध कर्म आहे. श्राद्ध घडवून आणणे, श्राद्ध करणे म्हणजे, अडलेली कामे मार्गास लावणे. एंटरटेनमेंट इंडस्ट्री ही सुद्धा श्राद्धकार्याला सपोर्ट करत असते ! चित्रपट, टिव्ही, सोशल मेडीया ही जरी आपण मनोरंजनाची साधने म्हणत असलो, तरी ती वेगवेगळ्या प्रकारे मनाला चालना देणारी आणि श्राद्ध म्हणजे शरीर देणे, शरीर घेणे, शरीर धरणे सारख्या अनेक प्रकारच्या कर्माला इनडायरेक्ट पद्धतीने  चालना देणारी, अप्रत्यक्षरीत्या मनाला आणि शरीराच्या कर्माला चालना देणाऱ्या गोष्टी त्यात आढळून येतात.

जीवनात सेवा आणि कर्म करतांना, माणूस खूप जास्त मेहनत करू लागतो, तरीही त्याला जेव्हा ईपसित साध्य झाल्याचे समाधान मिळत नाही, तेव्हा तो डिप्रेशन मध्ये जातो. अशावेळी त्याला या श्रद्धेच्या मार्गात जेव्हा, साईचे चिन्मय रूपाचे आणि साईंच्या चरण पादुका यांचे दर्शन होते, तेव्हा त्याला, इतर लोकांविषयी जो द्वेष, सूडबुद्धी, राग, संचित झालेला असतो, तो ड्रॉप करावासा वाटू लागतो. आनंदाने जीवन जगण्याची कला शिकण्याची प्रेरणा होते.

सबुरीच्या मार्गाने चालणारे लोक, योगध्यान, अभ्यासात प्राविण्य प्राप्त करून, मोठमोठे अधिकार प्राप्त करतात. पण तरीदेखील जेव्हा त्यांना, शरीराचे व मनबुद्धीचे लिमिटेशन उमजू लागते, तेव्हा साईच्या चीनमयरूपाबरोबर, साईने त्यांच्या चतुरपणावर घातलेले झाकण देखील त्यांना लक्षात येऊ लागते. व केवळ चतुरपणा किंवा केवळ आध्यात्मिक साधना यांचा अतिरेक करून, कारुण्यरहीत जीवन जगणे निरस होते, हे त्यांना लक्षात येऊ लागते. लोकांवर मर्सी करून, दया करून, लोकांना मदत करण्यासाठी काहीतरी करावे असे वाटू लागते, त्यांना आनंदाने जीवन जगण्याची कला व सहकार्य भावना समाजाला शिकविण्याची प्रेरणा होते. 

मरण्याचे मार्ग देखील दोन आहेत. कर्मयोग करत श्रद्धेने देहत्याग करणे. ध्यानयोग करत सबुरीने देहत्याग करणे.

ह्या जगात सतत नवनवीन जीव उत्पन्न होतच राहतात. त्यावर आपण कंट्रोल करू शकत नाही. व नवनवीन जीवांना, जुन्या जीवांना खाऊन किंवा त्यांची जागा आणि अधिकार स्वतः प्राप्त करून, त्यांच्या जागी स्वतःला बसण्याची, तसेच त्यांची कॉपी करून, स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व उभे करण्याची आकांक्षा असते. 

आपण कोणाच्या घेण्यादेण्यात नसू , तरीदेखील आपले अस्तित्व, इतर जीवांना किंवा देवांना किंवा राक्षसांना किंवा प्राण्यांना किंवा कोणालाही खटकू शकते. त्यामुळे मरण हे अटळ आहे ! मग ते तुम्ही स्वतःहून मरा, किंवा इतर कोणाकडून मारले जा !

' अमर होणे ' याचा अर्थ, आत्म्याने अमर होणे असा आहे ! शरीराने नव्हे ! शरीराला मारावेच लागते ! सुखरूपपणे मरण्याचा मार्ग म्हणजे, ध्यान समाधी होय ! 

ध्यानगुरूकडून आपल्याला सुखरूपपणे देहत्याग करण्याची प्रक्रिया शिकून घेणे आवश्यक असते. हळूहळू समाजातून आणि घर परिवारातून आपला सहभाग कमी करत करत बंद करावा लागतो. एकांतात स्वतंत्रपणे राहण्याची क्षमता, स्वतःमध्ये डेव्हलप करावी लागते, व ध्यान समाधीची सतत प्रॅक्टिस करावी लागते, म्हणजे देहत्याग सुलभ होतो.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

आँख कहे !

पुजारीन की आँख कहे, पुजा खतम हो गई ! अब आप जाईए ! कंपाउंडर की आँख कहे, मिटींग खतम हो गई ! बिमार होके वापस आईए ! टिटुभैय्या की आँख कहे,...

एकूण पृष्ठदृश्ये :