शरीरमनाचे आरोग्य आणि चांदी यांचा निकटतम संबंध आहे. स्त्रियांना ही गोष्ट माहीत असल्याने चांदीची लक्ष्मी , चांदीचा गणपती, चांदीचे फुल, चांदीचा घोडा, चांदीचे भांडे अशा वस्तु घरात गोळा करून ठेवतात. पुर्वीच्या राण्या देखील आपल्या राजाकडे चांदीचा घोडा भेटवस्तु म्हणून मागायच्या.
मराठी स्त्रीया पायात चांदीचा तोडा घालतात. तर आदिवासी स्त्रिया हातात चांदीच्या बांगडया आणि पायात चांदीचे वाळे घालतात. महाराष्ट्रात काही घरांमध्ये आजही चांदीच्या ताटात जेवण करतात. ते श्रीमंतीच्या दिखाव्यासाठी करत नसून औषधगोळ्यां इन्जेक्शनचा खर्च वाचविण्यासाठी करत असतात. मालक असो वा नोकर असो, बिझीनेसमन असो वा कर्मचारी असो, आजारी पडला तर देशाचे वेळ व पैश्याचे नुकसान होते.
आपल्या शरीराच्या आत, एक पुर म्हणजे, नगरी असते. त्याला पुर + अंदर = पुरंदर म्हणजे इंद्रीयांचा समुच्चय असे म्हणतात. त्यात आपली प्रजा असते. ' आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी ' असे म्हटले आहे. ही पुरंदर नगरी गोळ्या घालून, दारू पिवून, ॲसीड पिवून, तंबाखू खावून ही धुतली जात नाही. तसेच अत्तर मारून, पान खावून ही नगरी पवित्र होत नाही. त्यासाठी यौगिक लाईक जगावे लागते. नाहीतर प्रजा बंड करून उठते व शरीराला रोग लागतात.
देशाच्या राणीच्या शरीरात संपूर्ण देश सामावलेला असतो. आणि संपूर्ण देशाचे आरोग्य, केवळ राणीच्या दागिन्यांनी किंवा खेळण्यांनी सुधारू शकत नाही. त्यासाठी राणीला आपल्या शरीराची आणि मनाची पवित्रता, आरोग्य आणि स्वच्छता ठेवणे तितकेच महत्त्वाचे असते. व त्याची सोय करून देणे राजाचे कर्तव्य आहे. मुमताज राणीच्या आंघोळीसाठी भलामोठा ताजमहल बांधणारा राजा या भुमीवर होवून गेला. राणीला स्वच्छ हवा खावू घालण्यासाठी हवामहल बांधणारा राजा या भुमीवर होवून गेला. आज घरोघरी राणीला योगा शिकविणारा राजा सुद्धा उपलब्ध आहे. ज्या राणीने आपले कर्तव्य विसरून, स्वतःचे खाणे, झोपणे, ड्रामा आणि मनोरंजनच चालू ठेवले. विकारांना कवटाळले, त्या राणीला राजाने तिच्या पुरीनगरी परत पाठवून, तेथील स्वच्छता प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने करावयास भाग पाडले, असे इतिहासात दाखले आहेत.
रणजीत देसाई यांच्या ' श्रीमान योगी ' या कादंबरीत राणी सईबाईने शिवाजी महाराजांकडे चांदीच्या घोड्याची भेट मागितली होती. असा उल्लेख आहे.
राजा शिवाजीने सईबाईला चांदीचा घोडा आणून देखील दिला होता. तरीही तिची तब्येत सुधारली नाही व ती लवकर देवाघरी गेली.
ॲक्च्युअली चांदीचा घोडा हे केवळ एक प्रतिक आहे. सईबाईला सांगायचे असावे की, राज्यातील आरोग्य व्यवस्था व स्वच्छता यावर राजाने अधीक भर द्यावा. सईबाईने चांदीचा घोडा मागणे, याचा हा खरा अर्थ होता. आरोग्य व्यवस्थेवर जो राजा भर देतो, त्याला कमी लढाया लढाव्या लागतात. त्याचे श्रम वाचतात. महाराष्ट्रात त्याकाळचे यवन लोक सत्ता हस्तगत करून, घाण फार करत व प्रजेला आपले शरीर मानत नसत. म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना ठार मारले. जातधर्मपंथ याचा या सफाईमध्ये काडीमात्र संबंध नव्हता.
आजही मराठी लोक घोड्यावर स्वार असलेल्या मल्हारी देवाचा चांदीचा टाक देवघरात ठेवतात. व त्याला कुलदैवत मानतात. कारण,
मल्हारी म्हणजे, राज्यात आरोग्य निर्माण करणारा ! मल व रोग नष्ट करणारा राजा ! बाकी प्रांतात या मल्हारीदेवाला घोडयावर बसलेला रामदेव बाबा म्हणून देखील पुजतात.
आरोग्याशिवाय प्रजा प्रेतवत असते. आणि, स्वच्छतेशिवाय नगरी उकिरडा असते. उकिरड्यावर माणसाला मनस्ताप देणारे ज्ञान उपजू शकते, पण आरोग्य नाही. केवळ ज्ञानाने आरोग्य उभे राहत नाही. ज्ञानाला स्वच्छता आणि पवित्रतेची जोड असावी लागते. पूर्वीच्या काळी हे ज्ञान केवळ राजा, राणी आणि राजपुत्र यांना राजऋषी देत असत. व त्याकाळी राजे आपल्या प्रजेची आपल्या स्वतःच्या शरीरासारखी काळजी घेत असत. आजकाल हे ज्ञान सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे आजकाल देशातील प्रत्येक नागरिकांवर स्वच्छता, पवित्रता आणि आरोग्य रक्षणाची जबाबदारी आहे.
आपल्या शरीराचे, घराचे आणि परिसराचे वाडयात रूपांतर करायचे की, पेठेत किंवा कोठीत रूपांतर करायचे. हे आज प्रत्येकाचा व्यक्तीगत निर्णय बनलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा