लहान मूल जसे भूक लागले की, आईकडे आई-आई करते. आणि पैसा पाहिजे असेल किंवा संरक्षण पाहिजे असेल, तर बाबा-बाबा करते. त्याप्रमाणे वयाची 50 वर्ष झालेले लोकसुद्धा आई-आई आणि बाबा-बाबा करतात. जर आई बाबा मेलेले वारलेले असतील, तरी देखील त्यांच्या मुर्त्या उभारून, किंवा आई-बाबांच्या देवतांची रोज आठवण काढतात ! अशा लोकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, आईना-बाईंना मेडिटेशन उपयोगी येऊ शकते.
या मेडिटेशनची थीम आहे की, मीच माझी आई आहे आणि मीच माझा बाप आहे. माझ्याबाहेर कोणीच माझी आई नाही. आणि माझ्याबाहेर कोणीच माझा बाबा किंवा बाप नाही. हे याचे गृहीतक आहे.
जर हे गृहीतक, तुम्ही आपल्या मनाशी बिंबवले, तर तुमचे मन, बाह्यजगात भरकटणे बंद होते. व तुम्ही स्वतःकडे, स्वतःच्या देहाकडे, स्वतःच्या आत्म्याकडे आकर्षित होऊ लागतात. आणि तुमचे विकेंद्रीकरण झालेले, मन आणि बुद्धी, स्थिर आणि केंद्रित होऊ लागते. जेणेकरून तुम्ही सर्वबाबतीत आत्मनिर्भर खंबीर होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागतात.
' सोहम ' हा जो श्वासमंत्र आहे, त्याचा अर्थ जेव्हा काढला जातो, तेव्हा, मीच तो आहे. मीच माझा बाप आहे. मीच माझी आई आहे. मीच माझी बायको आहे. मीच माझा मुलगा आहे. मीच माझा आजोबा आहे. मीच माझी आजी आहे. मीच माझा पणतू आहे. मीच माझा नवरा आहे. मीच माझा बॉस आणि मीच माझा गुरु आहे.
अशाप्रकारे, जेव्हा तुम्ही केंद्रित होऊन जातात. तेव्हा तुम्हाला, स्वतःच्या जबाबदारीची जाणीव निर्माण होते. आणि युगोनियुगे तुमची इतरांवर असलेली डिपेंडन्सी नष्ट होते. व त्याबरोबर रिलेशनमध्ये येणारी दुःखे क्लेश देखील नष्ट होतात. तुम्ही जेव्हा आत्मनिर्भर होतात, तेव्हा तुमचे बंधने सुटतात.

आत्मनिर्भर व्यक्तीकडेच लोक नोकऱ्या मागण्यासाठी येतात. आत्मनिर्भर व्यक्तीकडेच लोक देणग्या मागण्यासाठी येतात. पाया पडण्यासाठी येतात. मानसन्मान शाल-श्रीफळ देण्यासाठी येतात. आत्मनिर्भर व्यक्तीकडे लोक कार्यकर्ते बनतात. आत्मनिर्भर व्यक्तीकडे नेतेमंडळी सुद्धा सर्वात पहिले वोट मागायला येतात. आत्मनिर्भर व्यक्तिच्या बोलण्याला वजन असते. आत्मनिर्भर व्यक्तीला त्याच्या घरात मान असतो. आत्मनिर्भर व्यक्तीला समाजात मान असतो. आत्मनिर्भर व्यक्तीला देशात आणि विश्वात मान असतो. आत्मनिर्भर व्यक्तीला कोणी मर्यादा घालू शकत नाही. त्याच्यावर बंधने आणू शकत नाही.
तळटीप : स्वतःमध्ये ' खुद्दारी ' विकसीत करण्यासाठी, म्हणजे, ' सेल्फ डिसिप्लीन आणि सेल्फ ईस्टीम ' डेव्हलप करण्यासाठी हे ध्यानतंत्र उपयोगी आहे. काही लोकांच्या मते हे आणिबाणि ध्यानतंत्र आहे. ज्यावेळी कोणीच आपल्याला मदत करू शकत नाही तेव्हा आपल्याला स्वतःच स्वतःची मदत करावी लागते.
अविकसीत मागासलेल्या विचार सरणीच्या लोकांमध्ये मानसिक रोग निर्माण झाल्यास त्यांना आत्मविश्वास जागविणारे, ' सेल्फ हिपनॉटीझम ' सारखे हे ' सेल्फ परसनॅलीटी क्युअर तंत्र ' आहे.
हे तंत्र एक ' ध्यानऔषध ' आहे. औषध आपण नियमित कॉन्टॅक्ट असणाऱ्या बोनाफाईड वैद्याकडून घेतो. तसेच, औषध घेण्याची वेळ आणि औषधाच्या डोसाचे प्रमाण विचारूनच घेतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा