' अमर ' म्हणजे, न मरणारे ! म्हणजेच, जे चालूच राहते !
' अमरावती ' म्हणजे, येणे चालूच राहणार !
म्हणजेच,
' मी पुन्हा येणार ! '
' मी पुन्हा येणार ! '
' मी पुन्हा येणार ! '
' अमरावती ' ह्या शब्दाचा समानार्थी शब्द ' स्वर्ग ' हा आहे.
स्वर्गाचा राजा देव ' इंद्र ' असतो.
बृहस्पतीच्या ( गुरुदेवांच्या ) सांगण्यावरून नाथविदया शिकण्यासाठी इंद्राने सोमयाग केला. सोमयागानंतर १२ वर्षे सह्याद्रीवर तपश्चर्या करून इंद्र अमरावतीस परत गेले.
संदर्भ - नवनाथ भक्तिसार ग्रंथ ( शेवटचा अध्याय ४० )
काम मातला की राम येतो, त्याला रामायण म्हणतात.
क्रोध मातला की कृष्ण येतो, त्याला कृष्णायन म्हणतात. कृष्णाचे महाभारत म्हणतात.
अहंकार वाढला की हरी येतो. त्याला हरीविजयलीला अमृत म्हणतात. आणि,
जेव्हा सगळे कोरडे पडतात, माता देखील कोरडी पडते, तेव्हा पाऊस पाडायला इंद्र येतो. त्याला इंद्रायण म्हणतात.
आणि ह्या गोष्टी सृष्टीत परत परत होत असतात. त्यामुळे हे सर्व परत परत येणारच असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा