कर्मकांडातून जीवशिक्षण


कर्मकांडात सांगितलेली जीवगती-प्रगती-मोक्षमुक्ती-विकास प्रक्रिया : 

नारायण-नागबळी, मातृ-गया पिंडदान, प्रयाग-तटे श्राद्ध, नदीसंगमे-महाकुंभमेळ्यात श्राद्ध-तर्पण केले जातात. ह्या प्रक्रियेमध्ये तीळ, दुध, जल, तांदुळ -भात मुख्यत्वाने वापरला जातो.

' तीळ ' ही त्रिकोणी ' रामकृष्णहरि ' या स्निग्धसाधनेचे ज्ञानयोगाचे प्रतिक आहे.

' तांदुळभात ' हे ' राम आणि कृष्ण ' यांच्या कर्मयोगाचे आणि बलीदानाचे प्रतिक आहे.

' जलपाणी ' हे ' ॐ नमः शिवाय ' या ध्यानयोगाचे ध्यानसाधनेचे प्रतिक आहे. त्याला गंगाजल म्हणजे, ज्ञानयुक्त ध्यान म्हटलेले आहे.

दुध हे ' गोविंद ' जपाचे भक्तियोगाचे प्रतिक आहे.

श्राद्ध - तर्पण केल्यानंतर, दिवे लावून, प्रकाश- धुप - दिप - अगबत्तीने सुगंधी-प्रसन्न वातावरण निर्माण करून, तसेच सत्यनारायण पुजा-प्रसाद करून, श्राद्धकर्म सांगता करतात.

' सत्यनारायण ' हा विश्वसृष्टीचा सत्यदेह असून, तो श्राद्ध तर्पणानंतर तयार झालेला देह आहे. त्याच्याबरोबर सर्वग्रहदेखील देहस्वरूप निर्माण झाले आहेत व त्यांना आपण आदरयुक्त सादर नमस्कार करून, गोडबोलून आणि जलपान-भोजन देवून, त्यांची तृष्णा तृप्त करून, त्यांच्यापासून आपल्याला आशीर्वाद आणि हिलींग मिळविण्याची विनंती (मनोमन प्रार्थना) केली जाते.

जेव्हा तुमच्या हातून श्राद्ध - तर्पण - सत्यनारायण - होमहवन यासारख्या पुजा केल्या जातात, तेव्हा ती तुम्हाला शिकवून दिलेली जिवन जगण्याची एक शिक्षण प्रक्रिया असते. याला तुमच्या हातून कर्मकांड करवून तुम्हाला डमी मॉडेल दाखवून अप्रत्यक्षरित्या शिक्षण देणे म्हणतात.

ही पुजा ही केवळ एक कर्म-शिक्षण आहे. म्हणजे, पुजा संपली, तेव्हा तुमच्या आयुष्यात जीवनाची खरी पुजापरिक्षा आणि जीवगती-प्रगती-मोक्षमुक्ती-विकास प्रक्रियेची खरी वाटचाल तुम्हाला स्वतः प्रयत्न करत सुरू करावी लागते. तुमच्याकडून पुजा करून घेणाऱ्याने, तुम्हाला त्यासाठी ईनिशिएट करून दिलेले असते. 

ज्यांच्या ध्यानयोगातून, ' जल किंवा परिसर पवित्र करणारी ज्ञानगंगा ' उत्पन्न होत नाही. ज्यांच्या कर्मयोगातून, ' चौरस पोषण देणारे अन्न ' तयार होत नाही. ज्यांच्या भक्तियोगातून, ' पान्ह्याला दुधाचा पाझर ' फुटत नाही. ज्यांच्या सांख्ययोगातून, ' स्वच्छता - निटनेटकेपणा आणि रोजगार ' निर्माण होत नाही. ते सर्व लोक बांडगुळे, ड्रामा करणारे, चोर असतात. त्यांच्याकडून कर्मकांड करवून घेवून किंवा त्यांना योग शिकवून फायदा नसतो. कारण त्यांना मेहनत घेण्याची तयारी नसते. श्रद्धेने शिकण्याची तयारी नसते. स्वतः मेहनत करून योगदान देण्याची दानत नसते. अशी लोक केवळ आपल्या ' पैश्याची आणि प्रॉपर्टीची तिजोरी ' म्हणून कामाला येऊ शकतात. ' डाटा आणि नॉलेज कॅरियर पाईप - लाईन ' म्हणून कामाला येऊ शकतात. अशी लोक केवळ विसडम, चमचागिरी, बुच्चनगिरी आणि चतुरपणा शिकतात. व रेडिमेड आयत्यावर कोयता मारून, मालक - बॉस - सत्ताधिश - बाप - गुरु बनतात. किंवा त्यांचे चमचे बनतात. हेरगीरी करून डाका टाकणारे डाकू बनतात. चिमटे घेवून किंवा चोच मारून सत्वपरिक्षा घेणारे व बुच्चन लावणारे यम बनतात. ड्रामा करणारे बहुरूपे, नाटकमंडळी, तमाशामंडळी, मॅजिशियन, सेलेब्रीटी कलाकार बनतात. कळप करून राहणारे हे ' सामाजिक प्राणी ', सामुहीकरित्या, सेवेच्या नावाखाली एकत्र येऊन, भल्या माणसाचे कांड घडवून आणतात. हे सर्व ढुंगणे एकत्र येवून, ढेकणासारखे भल्या माणसाचे रक्त शोषायचे कामे करतात. त्यामुळे, खरे अनुभवी व ज्ञानीलोक ग्रुप सायकोलॉजी असलेले नसतात. ते समुहापासून अलिप्तपणा आणि सामाजिक संन्यास स्विकारतात. 

शक्यतोवर, जोपर्यंत असाध्य शारीरीक व मानसिक पिडा, रोग, अडचणी आयुष्यात येत नाही, तोपर्यंत सामान्यलोक ह्या कर्मकांडाकडे वळत नाहीत. जीवन आनंद घेतांना, मोक्षमुक्ती मिळविण्याचा विचार देखील त्यांच्या मनात येत नसतो. परंतु, शहाण्या माणसाने आपले हातपाय मन आणि शरीर धडधाकट असतांनाच ह्या कर्मकांडातून जे जीवन जगण्याचे सार शिक्षण दिलेले आहे, ते समजून घ्यावे. 

ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग, भक्तियोगासह, आपल्या जीवनाचा सांख्ययोग सुदृढ निरोगी प्रसन्न ठेवावा. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

नीचेवाला भी उपर देख रहा है !

उपर देखके नाम देवे डॅडा ! उपर देखके बजे नगाडा ! उपर देखके भाव बनें !  उपर देखके भाडा ! उपर देखके बनें रास्ता, और राह मोडे रनगाडा ! उपर दे...

एकूण पृष्ठदृश्ये :