जीवनाचा वृक्ष म्हणजे, आपले स्वतःचे पंचभौतिक, पंचतात्विक, पंचकोषीक शरीर होय. जे देवाने बनवलेले आहे.
मी बनविलेल्या सृष्टीतील, सर्व फळझाडे, फुलझाडे, भाजीपाला, पाळीव पशुपक्षी यांचा अन्न म्हणून उपभोग घ्या.
परंतु 'जीवन वृक्षाची फळे ' खावू नका. जो या जीवनवृक्षाची फळे खाईल, त्याला बुरी मौत येईल असे देवाने म्हटले होते.
' मानवी मरण ' ही मानवाच्या शक्तीशाली आणि बुद्धीमान शरीराची ' सर्वात निर्बल अवस्था ' आहे. जी अटळ आहे. हे सर्व देहधारी मानवांनी लक्षात घ्यायला हवे.
जीवनाच्या वृक्षाच्या झाडाची फळे म्हणजे, आपले डोळे, हात, पाय, गुप्तांगे, बोटे, कान, नाक, हृदय, फुफ्फुस अशा सर्व प्रकारच्या इंद्रिय संस्था ! इत्यादी. इत्यादी.
त्यातल्या त्यात, महत्वाचे म्हणजे, आपल्या जीवनाच्या वृक्षाचे बीज, आपल्या कमरेत असते. जेथे प्रजनन क्षमतेचे आणि सृजनात्मक क्षमतेचे स्रोत आहे.
ही सर्व जीवनाच्या वृक्षाची ' फळे आणि बिजे ' आहेत. त्यांना जर आपण खाऊन टाकले, तर मनुष्याची सुर्जनात्मक क्षमता नष्ट होईल. मनुष्याची सृजनात्मक क्षमता जर नष्ट झाली, तर मनुष्य शिकारी बनेल. देवाने शरीर दिलेले आहे, त्याचा उपयोग योग्यप्रकारे करणे, देवाला अपेक्षित आहे. आपण जर आपल्या शरीरिक क्षमतेचा गैरवापर करत असू, तर ते चुकीचे आहे.
आपण आपली अधिकार क्षमता वापरून, कोणाचा डोळा मारला, कोणाची गांड मारली, असे करू नये. अशी नोकरी देखील सोडून द्यावी. रोजीरोटी उत्पन्न कमावयासाठी, ताकद आणि उत्पन्नवाढीसाठी, जर आपले सरकार, मालक, आई-वडील, बायको-पोरे, सासरे-मेव्हणे, भाऊ-बहीण, पती-पत्नी, मित्र-मैत्रिणी, बॉस- गुरु, क्लायंट किंवा पुढे होणारे नातेवाईक आपल्याला, आपल्या स्वतःच्या, किंवा इतरांच्या, जीवनवृक्षाची फळे खाण्यास प्रेरीत करत असतील, तर त्यांचा व त्यांच्या संस्थेचा त्याग करावा. आपण आपल्या देहाचा शारीरीक, मानसिक, बौद्धिक संतुलन बिघडवणारा वापर करू लागलो, तर ते आपल्याला ताबडतोब लक्षात आले पाहिजे. एकमेकांच्या लक्षात आणून दिले गेले पाहिजे. आपण या जीवनवृक्षाच्या फळांना न खाता, म्हणजेच, शरीर निरोगी ठेवून, कार्य केले पाहिजे.
ज म्हणजे, जन्माला घालणे, सृजन करणे !
अ म्हणजे, अत्यंत पवित्र !
ल म्हणजे, आशीर्वाद देणारे !
जल म्हणजे, पवित्र निर्मळ पाणी !
पाण्याशिवाय भुमीवर सृजन होणे शक्य नाही.
पाण्याला जीवन म्हटलेले आहे. मानवी शरीरात जवळजवळ ऐशीं टक्के पाणी असते. पाणी खराब झाले की, ऐंशी टक्के शरीर खराब होते. आपले स्वतःचे असो, वा इतरांचे असो, शरीर बिघडवणे हे पाप आहे ! कारण, मानवी शरीर हे ' जीवन वृक्ष ' आहे.
अहिंसात्मक आणि शांततामय पद्धतीने कार्य करण्याचे अनेक साधने उपलब्ध असतांना, जर तुम्ही शरीराचा थोडासुद्धा गैरवापर करत असाल. तर तुम्ही सतर्क होणे गरजेचे असते.
त्याचप्रमाणे, आपल्या आसपडोसच्या लोकांना देखील सतर्क करायला हवे. जेणेकरून सामाजिक आरोग्य सुदृढ बनून, मनुष्याला जीवन जगण्यास योग्य वातावरण उपलब्ध होईल.
खेळ, शारीरीक क्षमतेसोबत, आपली बुद्धी वाढविणारे असावेत. नाहीतर गंमत म्हणून, सिंहगडावर छोटीशी घसरगुंडी खेळायला गेलो आणि डायरेक्ट खोल दरीत पडलो असे होते. व्यसने करणे किंवा व्यसने लावणे, विकार पाळणे, विकार लावणे, बळजबरीने खावू घालणे. हे सर्व जीवनवृक्षाच्या फळांना खाऊन बरबाद करण्याच्या गोष्टी आहेत. आपल्या देहाची अशी काळजी घेतली गेली पाहिजे, जणू ते आपल्याला भाड्याने मिळालेले आहे. किंवा कर्जाने मिळालेले आहे. व जर आपण त्याचा दुरुपयोग केला, तर चक्रवाढ व्याजाने, आपल्याला परतफेड करण्याची वेळ येऊ शकते. हा तो सारासार विचार, सतत लक्षात ठेवून, कार्याची दिशा आणि दशा ठरवणे, मानवी कर्तव्य आहे.
प्रत्येक व्यक्तीला इतिहास असतो. आणि तो दुरुस्त करायला व्यक्ती परत परत जन्म घेतो. त्यामुळे ईतर लोक किंवा नातेवाईक किंवा मित्र काय करत आहेत ? हे बघून त्यांचे अनुकरण न करता, स्वतःची अक्कल लावून, सात्वीक गुरुछत्र शोधुन, किंवा बनवून स्वतःचे ध्यान करणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा