प्रत्येकाचे शरीर ' देवी ' आहे !


आपले ज्ञान, आणि आपली पवित्रता टिकवून ठेवण्यासाठी, आपल्याला केवळ, आणि केवळ, शक्तीचीच गरज असते. शक्ती असल्याशिवाय, आपण स्वतःचे संरक्षण, आणि स्वतःच्या पावित्र्याचे, आणि स्वतःच्या ज्ञानाचे, आणि स्वतःच्या मनाचे, आणि स्वतःच्या शरीराचे, आणि स्वतःच्या बुद्धीचे संरक्षण करू शकत नाही. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जो अत्यंत गोपनीय ठेवला जातो. प्रायव्हेट ठेवला जातो.

ज्याप्रमाणे घरात देखील, लोक, एकमेकांचा बँक बॅलन्स एकमेकांना सांगत नसतात. त्याप्रमाणे, आपल्या शक्तीबद्दल लोक लपवून ठेवत असतात. कारण की, याच शक्तीमुळे इतर जाती-जमातीतच नव्हे, तर घरात देखील इतर लोकांवर डोमिनन्स बनवता येतो. इतरांना आपल्यापेक्षा डॉमिनंट करून घेणे, कोणालाच आवडत नाही. त्यामुळे, जो तो गुपचूपपणे या शक्ति साधना करत असतो. मग तो कोणत्याही धर्माचा का असेना, कोणताही पंथीय का असेना, कोणत्याही लिंगाचा का असेना ! एकमेकांचा गुरुशिष्य, आईबाप, बेटाबेटी का असेना !

प्रवाहीशक्ती बॅलन्स करता येत नाही. तिला केवळ हार्मोनाईज करता येते.  प्रवाहीशक्ती हे गतीजऊर्जेचे एक रूप आहे. कायनेटीक उर्जा म्हणजे, गतीज ऊर्जा नेहमी प्रवाही असते.

जिवंत शरीरातील ऊर्जा ही, प्रवाही ऊर्जा असते. प्रवाह निर्माण होण्यासाठी, बॅलन्स बिघडावा लागतो. यावरून आपल्याला लक्षात येईल की, शरीरातील प्रवाही ऊर्जा, ही बॅलन्स करता येत नाही. तर केवळ प्रवाहात ठेवावी लागते. म्हणजे, ती आपोआप हार्मोनाईझ होते.

ज्या गोष्टी बॅलन्स करता येत नाहीत, त्या गोष्टींना हार्मोनाईझ आणि चॅनलाईज कराव्या लागतात.

ऊर्जेचा स्थिर उर्जा म्हणजे, पोटेन्शिअल ऊर्जा, किंवा साठविलेली उर्जा हा जो प्रकार आहे. त्याला संरक्षण जास्त लागते. स्टोरेज करण्यासाठी विशेष क्षमता लागते. अन्यथा त्याचा विस्फोट होतो.

मरायला तसेच ध्यानसमाधीला तयार नसलेल्या, जुन्या शक्तीशाली असलेल्या हरामी लोकांना, जर या देवींच्या शक्तीची ताकद उपलब्ध झाली असती, तर आध्यात्मिक क्षेत्रात क्रांतीकारी लोक, अतिरेकी लोक आणि वेश्या लोक वाढले असते. विश्वदेहाचा बट्याबोळ झाला असता. असे होऊ नये म्हणून अशा हरामी झालेल्या, अश्लील झालेल्या, अपवित्र झालेल्या लोकांना केवळ पवित्र आत्म्याच्या शकतीनेच शुद्ध करणे शक्य होते. शरीर धारणेसाठी आवश्यक असलेल्या देवींना वगळून, ताकदवान शरीरबुद्धी असलेल्या लोकांना, आत्म्याच्या महात्म्याकडे नेणे गरजेचे होते. म्हणून त्याकाळी, मुळ बायबलमधील, ट्रिनिटी म्हणजे, दत्त तसेच, इतर महत्त्वाच्या, तीनशक्ती असलेल्या, देवींचा जो उल्लेख होता, तो सगळ्या जगांपासून लपवून ठेवलेला आढळून येतो. त्या तीन देव्या म्हणजे, लिली, मेरी आणि मेंडेलीना !

ज्याप्रमाणे, राम - कृष्ण - हरी किंवा श्री - स्वामी - समर्थ या तीन, मुक्तऊर्जा सर्वत्र उपलब्ध आहेत. तसेच हरि, हर आणि दिगंबर या तीन ऊर्जा ज्याप्रमाणे सर्वत्र उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे जगातील लोकांनी तीन मुक्तऊर्जा डिफाइन केल्या होत्या. राणी रुक्मिणीबाई, मातासीता आणि ललीता किंवा दुर्गा किंवा पार्वती या शक्तींना, प्रत्येक धर्माने, आपापल्या पद्धतीने, वेगवेगळे नाव देऊन ठेवलेले आहेत.
थोडक्यात, दिमाख की देवी, दिल की देवी और च्युत-कुल्ले-बुल्ले की देवी !

मूळतः शरीर स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, त्याचप्रमाणे, आर्थिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी, मूळतः देवींचाच उपयोग होतो. त्यापैकी, आपला शरीराचा महत्त्वाचा भाग जो डोके आहे, बुद्धी आहे, ती व्यवस्थित टिकून राहावी, यासाठी रामजप, गोविंदजप आणि सोहम हा श्वासाचा जप महत्त्वाचा सांगितला जातो. त्याला वस्तुरूपाने तेल, तूप आणि सोमरस किंवा अमृतरस किंवा संजीवनी रस असे देखील म्हणत असतात. तर हे आपण स्वतः बनवायचे औषध आहे. ज्यामुळे आपला वरचा भाग व्यवस्थित काम करेन, आणि आपल्या शक्तीला आवश्यक असलेला पोषक आहार मिळेल.

त्यानंतर शरीराच्या हृदयस्थानी म्हणजे, मध्यभागामध्ये अल्लाइलाही किंवा हरी ही शक्ती काम करत असते. जी मुख्यतः संपूर्ण शरीर आणि मन, निरोगी ठेवण्यासाठी व सर्व प्रकारचे ब्लॉकेज नष्ट करण्यासाठी, ऍसिडचा मारा आणि इलेक्ट्रिक करंटचा मारा करत असते. व त्यासाठी आवश्यक असलेले व्रतवैकल्य, तपसाधने, उपास-तापास मेंटेन करावे लागतात. म्हणजे, ॲसिडने क्लीन करण्याची शक्ती, तसेच इलेक्ट्रिक करंटचा मारा करून, अडथळे नष्ट करण्याची, तसेच संकटे नष्ट करण्याची शक्ती निर्माण होते. शारीरिक स्वास्थ्यासाठी, जीवन जिवंत राहण्यासाठी, अत्यंत आवश्यक असलेली, ही शरीरशक्ती आहे. जी मनबुद्धीने ऑपरेट होत असते.

त्यानंतर, जे कमरेचे केंद्र आहे. प्रजनन आणि फर्टिलिटीचे केंद्र आहे. तेथील शक्तीला सतत कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक असलेली चार्जिंग करण्यासाठी, अँकरिंग करण्यासाठी, आवश्यक असलेली पावर, शंकर जपाने आणि सहजध्यान साधनेने कमवावे लागते.

दत्ताच्या तीनशक्ती, आपण सुयोग्यरीत्या वापरून, आपल्या जीवनाचा स्वर्ग बनवू शकतो. व प्रसन्न देखील राहून, स्वस्थ राहून, विस्डम डेव्हलप करून, विकारांवर विजय मिळवून, उच्च कोटीचे जीवन जगू शकतो.

प्रत्येकाचे शरीर जसे देवी आहे, तसे विश्वदेह देखील देवी आहे. विश्वदेह डेव्हलप करतांना, आतापर्यंत ऐकमेकांवर चढाचढी झाल्या, खुनाखुनी झाल्या, बाचाबाची झाल्या, युद्ध झाले, भांडणे झाली आणि होतच राहतील. कारण, विश्वदेह सतत डेव्हलप किंवा रिडेव्हलप होणारी गोष्ट आहे.

चिखलाला जेवढे चिवडू, तेवढी जास्तवेळा आंघोळ करावी लागते. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आंघोळीची सोय हवी. जगातल्या सगळ्या मोऱ्याच खराब झाल्या तर आंघोळ कशी करणार ? पवित्र कसे होणार ? ॲटोमॅटीक स्वतःला स्वच्छ करणारे टॉयलेट किंवा ॲटोमॅटीक स्वतःला स्वच्छ करणारी मोरी असते का ? आपली मोरी आणि आपले टॉयलेट, आपल्या स्वतःला स्व,च्छ तरी करता येते का ? बांधता तरी येते का ? त्याची स्वच्छता, मेंटेन तरी करता येते का ? हा प्रश्न, जरी साधा सोपा असला, समजदार माणसाला विचार करायला लावणारा आहे. छोटा असला, तरी महत्वाचा आहे.  

रोज, सेम टु सेम असणारे, दिसणारे, नवनवीन किट, पतंग, भृंग, पशु पक्षी, यक्ष, गंधर्व, देवी-देवता, झाडे-झुडपे, बाया-माणसे, नातेवाईक-मित्र असे माणसाचा देह असलेले, बुद्धी आणि वासना असलेले, शरीरे सृष्टीत उत्पन्न होतच राहतील. तुमचा डुप्लीकेट, तुमच्या समोर येऊन, तुम्हाला, तुमच्या उत्पन्नाला, तुमच्या अस्तीत्वाला चॅलेंज करेल. तेव्हा तुम्ही काय कराल ? 

देहाचे मरण हा अटळ सोहळा आहे. त्याला आनंदाने स्विकारावे. देह अमर नसतो. आत्माच केवळ अमर होवू शकतो. हे जेव्हा, सर्व जुने लोक, सहजासहजी प्रेमपूर्वक आनंदाने मान्य करतील. तेव्हाच देहधारणेची वासना संपुष्टात येऊन मोह संपुष्टात येईल, विरक्ती तयार होईल, परिवाराच्या मोहवासनेसोबत जमा केलेले, ईर्ष्या, व्देष, पश्चाताप, तळतळाट, अहंकार स्वतःहून नष्ट करावे लागतील. स्वतःहून, स्वतःच्या आत्म्याचा प्रकाश उत्पन्न करावा लागेल. स्वतःहून, स्वतःच्याच आत्म्याला पवित्रता आणि शांती द्यावी लागेल. स्वतःहून स्वतःच्या तोंडावर, नाकावर आणि डोळ्यावर पूर्ण कंट्रोल करावा लागेल. 

स्वतःच्या बाह्यदृष्टीला, बाह्य वासनेला विराम लागून, शांतीसह आत्मनिर्भरता उपलब्ध होईल. व  पवित्र आत्म्याचा स्विकार करून देहत्याग सुखाने होईल. 

सृष्टी, आपल्याला फर्टाईल करणाऱ्या, आपल्या स्वतःच्या पतीला, स्वतःहून सांगते की, " हे माझ्या वरा ! तुझ्या देहाचे मरण अटळ आहे. 
त्यामुळे, तु जेव्हा देहत्याग करशील. म्हणजे, मरशील, तेव्हा, ' स ' अंगाने म्हणजे, पवित्र अंगाने, हरी म्हणत म्हणत मर ! "
( ' स ' अंग + मर + वर )

' संगमरवर ' हे सृष्टीने, आपल्या पतीच्या कानात सांगितलेले ' गुहयज्ञान ' आहे.

आपल्यापेक्षा सर्वप्रकारे मोठ्या असणाऱ्या देहाने, किंवा आपल्यापेक्षा सर्वप्रकारे छोट्या असणाऱ्या देहाने, तसेच आपल्या बरोबरच्या असणाऱ्या देहाने, किती ' एनर्जी ऑरबीटस ' पार केलेले आहेत ? हे सतत जज करणे, आणि त्यानुसार, त्यांच्याशी त्यांच्या मनाला आणि आत्म्याला दुःख होईल, असे डिस्क्रिमिनेट करून वागणे, महागात पडते. आपण जरी सर्वसमर्थ असलो, आत्मनिर्भर असलो तरी, हे असे जज करून जगणे, आपल्या स्वतःच्या आत्मउत्थानामध्ये आणि फायनल परिनिर्वाणामध्ये बाधा निर्माण करू शकते. देहत्याग या शेवटच्या श्वासाची आठवण ठेवून, विरक्तीने सर्व प्रपंचाच्या राणीखेत त्याग करून पवित्र आत्म्याकडे प्रयाण करण्याची हिंमत आणि जीवात्म्याचे विसडम डेव्हलप करायला हवे.

' अंत भला, तो सब भला ! '
सगळं व्यवस्थित झाले, पण शेवटच व्यवस्थित झाला नाही, तर आत्म्याला पूर्णत्व प्राप्त होत नाही. शांती प्राप्त होत नाही. त्यामुळे, तुलसीदास देखील म्हणतात, " अंतकाल रघुबरपुर जाई ! जहाँ हरिभक्त कहाई "  

' सुरुवातच अंत लक्षात घेऊन केली पाहिजे. ' कारण,
परिवर्तन अटळ असते. ते शुभ घडविणारे, मनाच्या पावित्र्याकडे वाटचाल करणारे असावे. कारण, पवित्र मनाने, पवित्र कर्म करत, पवित्र भाव धरून मरशील तर आपल्या पवित्र आत्म्यापर्यंत जरूर पोहोचशील. 

आपला देहत्याग सुखरूप, प्रसन्न चित्ताने आणि आरोग्यमय पद्धतीने व्हावा, यासाठी अनेक लोक, जाणता अजाणता, तुमच्या शरीरपेशींचे पालन पोषण, संरक्षण संगोपन करीत आहेत. याची जाण ठेवून, आपण नियमितपणे श्रद्धा-सबुरी म्हणजेच, श्राद्धकर्म करणे, शांती पावित्र्याची प्रार्थना करणे आणि ध्यानमेडीटेशन करणे. ही साधना प्रत्येकाने इतरांचे व्देष बदले, अहंकार वासना, आणि आपल्यांचे विकार सहन करत, आपल्या देहत्यागापर्यंत चालू ठेवणे, प्रत्येक मानवाला अत्यंत आवश्यक आहे. जो हे साधन आपापल्या परीने घरच्याघरी नियमितपणे करत नाही, तो इतरांवर लक्ष ठेवून बसलेला शिकारी असतो किंवा इतरांचे आणि आपले पोरंबाळं, नातवंड, कुरतडून खाणारा, परजीवी बांडगुळ असलेला ययाती किंवा चिडखोर चांगदेव असतो. आजवर इतिहासात चांग्याव्यक्ती ' ईलाही ' ने, बांग्याव्यक्ती ' अल्लाह ' ने आणि वांग्याव्यक्ती ' साई ' ने बॅलन्स करण्याचा प्रयत्न झालेला आहे. उर्जेला ' उर्जे ' नेच न्युटरलाईज करून, शांत करण्याचा प्रयत्न झालेला आहे.

' अनंत ' नागासारखी, सृष्टीची ' सृजनात्मक वासना ' अनंत राहील. 
अमरनाथासारखी, सृष्टीकर्त्याची ' सृष्टी सफाई ' चालूच राहील. 
आपणपण, आपल्या देहाचा ' अंत ' आणि आपले मनाचे ' मरण ', गोड करण्याची ' तयारी ' चालूच ठेवावी. 












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

किर्तन Vs वर्तन !

जेव्हा अंगात अंधार असतो, तेव्हा बाह्य जगात  प्रकाश असतो ! ( विठ्ठल स्थिती ) आणि, जेव्हा अंगात प्रकाश असतो, तेव्हा जगात अंधार असतो ! (दत्त स्...

एकूण पृष्ठदृश्ये :