' आत्म्याचा योग ' वाटण्याचा योग एजंट अमीतचा धंदा !


आत्मा, विश्वशरीरातून आपल्या प्रकाशमय आणि आनंदमय स्वरूपात प्रकट होतो. त्यावेळी विश्व शरीरातील सर्व एजंट त्याच्याजवळ जमा होतात. आणि पटापट आपले शक्तीयुक्तीबुद्धीचे बँक अकाउंट भरू लागतात. परंतु ज्यावेळी आत्मा, ' ओम शांती ' म्हणून, परत आपल्या विश्वशरीरात विलीन होऊन जातो. तेव्हा एजंट अमितची भूक कायम राहून जाते. 

एजंट अमितने आत्म्याने सांगितलेल्या गोष्टी आणि क्रिया लिहून ठेवलेल्या असतात. आत्मा निघून गेल्यावर एजंट अमित, आत्म्याने सांगितलेल्या गोष्टी व क्रिया यांचे भांडवल बनवून, इतर सगळ्या माशांना, आत्म्याने सांगितलेल्या कथा आणि क्रिया ऐकवून आपले मोठे बँकेचे खळगे भरण्याची यात्रा सुरू करतो. चतुर लोकांचा संघ करून, भोळ्या जनतेचा छळ करा. असे त्याचे घोषवाक्य म्हणजे, ध्येय असते. आणि जेव्हा जनता, अशा थर्डपार्टी एजंटचे बँक अकाउंट भरून देऊ लागतात. तेव्हा ते आत्मनिर्भर होण्याच्याऐवजी एजंट निर्भर होत जातात. अधिकाधिक परावलंबी होत जातात. डोनेशन दिल्याशिवाय त्यांना हागमुतसुद्धा होत नाही. त्यांना जेवणसुद्धा जात नाही. अशी जनतेची कंडिशन होऊन जाते. 
मग ही काही आत्मनिर्भरता आहे का ?
नाही !

कनेक्शन करायचे असेल, तर डायरेक्ट आत्म्याशी कनेक्शन करता आले पाहिजे. थर्ड पार्टी एजंट अमितचा क्लास करून, जर तुमचे कनेक्शन, दर वेळेला सोल्डरिंग करून द्यावे लागत असेल, तर तुम्ही एक जडतत्त्व असलेले जड मशीनच आहात. हा त्याचा सरळ अर्थ आहे. 

एजंट लोकांना ' रेडीमेड दक्षिणा ' मिळवायची सवय लागल्याने, लोक जर त्यांच्या क्लासला आले नाही, तर ते आपले ' कली संदेश आणि रोग लावणारे किडे ' जनतेत पाठवतात. जेणेकरून, लोक परत परत त्यांच्या क्लासला दक्षिणा द्यायला येतच राहतील. 
याला म्हणतात, आत्म्याचा योग वाटण्याचा, चतुर चोरांचे जागतीक दणकट नेटवर्क असलेला, एजंट अमीतचा बिनभांडवली धंदा !

आत्म्याचे एजंट म्हणण्याच्या देखील हे लायकीचे नाहीत. सकाळी, योगासनाचा धंदा, दुपारी, औषध गोळ्यांचा धंदा, आणि संध्याकाळी, इंजेक्शन देण्याचा धंदा करणारे हे कलीयुगी जीवडे किंवा ब्रम्हराक्षस आहेत. त्यांना कोणीतरी ह्या गोष्टी उघडपणे समजावून देणारा भेटला पाहिजे की, तुम्ही आत्मनिर्भर झालेले नाही. केवळ एक रेडिओवाले पीके तुम्ही आहात. जे ऐकलं ते पुढे सांगतात. बाकी तुमच्या अंगात, ना आत्म्याचा प्रकाश आहे, ना आत्म्याची आत्मनिर्भरता आहे. केवळ तुम्ही एक लोकांच्या मनावर, लोकांच्या बुद्धीवर, बलात्कार करणारे, लोकांच्या बँक खात्यावर लक्ष ठेवून असलेले, लोकांच्या पैश्यातून लोकांचेच भंडारे करणारे, लोकांचे कुळ मुळ गाव आणि सातबारा स्वतःकडे नोंद करून ठेवणारे, गोड बोलणारे मासेमार बगळे सगळे एजंट आहात. लोकांच्या भज्या आणि वडे खाणारे उंदर आहात. लोकांचे नलवडे खाणारे वटवाघळे तुम्ही आहात. तुमच्याजवळ पवित्र आत्म्याचे गुण नाहीत. तुमच्याकडे पावित्र्य नाही. तुमच्याकडे दया क्षमा शांती नाही, तरीही स्वतःचे संबोधक आडनाव तुम्ही देव असे लावतात. चंदनाच्या झाडावर डेरा लावून, स्वतःची तब्येत पहिले सांभाळणारे नंगेनाग, आंगावर स्वच्छ कपडे गुंडाळून, जगभर ठगगिरी करतात. लोकांना विरक्ती निवृत्ती शिकविणारे, जनतेचे कामधंदे बिघडवून, जनतेचे पोरं तोडून, स्वतःच्या फॉलोअरच्या सेना, स्वतःच्या शिष्यांच्या सेना बनवतात. स्वतःला संतमहंत म्हणवून घेणारे, दक्षिणेच्या पैश्यातून इंधन भरून स्वतः हेलीकॉप्टर प्रायव्हेट जेट  राजवाड्यासारख्या सुखसुविधा वापरून टापटीप स्वच्छ राहतात. मोठमोठ्या किल्ल्यासारख्या मठआश्रममध्ये सेफ राहतात. 

बारचे, बाबाचे किंवा बाबरचे आणि बाबाजीचे असे तीन प्रकारचे ' चेले ' असतात.
चेल्याची ' बॉडी, बायकोपोरेबाळे, संस्था आणि प्रॉपर्टी ' ह्यांना, त्यांची परसनल ' शाबरीदेवी ' म्हणतात.
जितका मोठा संन्यासी बाबा, तितकी मोठी, त्याची ' दृश्य / अदृश्य बॉडी आणि दृश्य / अदृश्य प्रॉपर्टी ' असते.
जितकी मोठी बॉडी आणि प्रॉपर्टी, तितकी मोठी तिला ' भुक ' असते.
त्यामुळे, 
' बारचे चेले ' आपल्या बाच्या शाबरीला, खाण्यासाठी ' बोरे ' उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. 
बाबाचे चेले ' आपल्या बाबाच्या शाबरीला, खेळण्यासाठी ' पार्टनरपोरे ' उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असतात.
बाबाजीचे चेले ' आपल्या बाबाजीच्या शाबरीला, प्रजननासाठी ' आत्मे ' उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असतात.
तुमचे लाईक मिळविण्यासाठी, फॅन फोलोईंग मिळविण्यासाठी, वोट मिळविण्यासाठी, नोट / गोटदक्षिणा मिळविण्यासाठी, तुम्ही त्यांना सहमती देण्यासाठी, हे चेले कोणत्याही सोफेस्टिकेटेड माध्यमातून, तुमच्यावर, संघटीतपणे दबाव आणू शकतात.

जो खरा पालक आहे. जो खरा पवित्र आत्मा आहे. तो, मिळेल त्या माध्यमातून, तुम्हाला काही एक चार्ज न मारता, ध्यान शिकवतो, योगा शिकवतो, प्राणायाम शिकवतो, विसडम शिकवतो, जिवन जगण्याची कला शिकवतो. सुर्यासारखा, मिळेल त्या माध्यमातून, आशीर्वाद आणि ज्ञान देतो. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

' एक ' म्हणजे नक्की काय ?

साईबाबांनी ' सबका मालिक एक ' असे म्हटले आहे. तर हा ' एक ' म्हणजे नक्की काय ? याबाबत आपण विचार करायला हवा. ' एक ' ह...

एकूण पृष्ठदृश्ये :