भारतातील गुरुचेला लोकांची मोनोपॉली !


कॉमनसेन्सच्या व्यवहारी भाषेनुसार, गुरू म्हणजे मोठा ! अधिकाराने, सत्तेने, ताकदीने आणि टेकनिकने आपल्यापेक्षा मोठा असणारा म्हणजे, गुरु !  

भारतात आणि जगभर शाखा असलेले, बरेच गुरु लोक असे सांगतात की, तुमचा जो मंत्र काम करत आहे, त्याला मी आशीर्वाद दिला असल्यामुळे काम करत आहे ! जर मी तो आशीर्वाद काढून घेतला, तर तो तुमचा मंत्र काम करणार नाही. तुमच्यामध्ये असलेले गुडनेस, तुमचे सदगुण हे आमच्यामुळे आहेत. 

काही वेळेला गुरु लोक असे देखील सांगतात की, तुम्ही पहिले आमचे काम करा. आम्ही सांगतो ते ऐका. जेव्हा तुम्ही आम्ही सांगितलेले ऐकाल, तेव्हाच तुमचे अडलेले काम होतील. त्यामुळे आम्ही सांगितलेले काम तुम्ही पहिले करायला हवेत. आम्हाला खोडी करण्याचा हक्क आहे. लीला करण्याचा हक्क आहे. तुम्हाला नाही. आम्ही तुम्हाला आणि तुमच्या खानदानाला खोटे आरोप किंवा ड्रामा रचून जेलमध्ये टाकून सडवू शकतो. कारण सर्व संस्थाचालक आमचे ऐकतात. कारण आम्ही स्वतः पैसा छापतो. मुद्रा बनवतो. वेळ आली तर आम्ही देशाला देखील सोने किंवा पैसा पुरवतो. त्यामुळे संपूर्ण देश आमच्याकडे गहाण आहे. तुम्ही निर्धोक, निरोगी आणि सुखी राहण्यासाठी आम्हाला अधुनमधुन सलाम्या मारायला नियमित येत रहा. 

काही ठिकाणी असे म्हटले जाते की, तू एकापेक्षा जास्त गुरु करू नकोस. एकापेक्षा जास्त गुरु लोकांकडे जाऊ नकोस. आणि ह्या वक्तव्याला हे लौकीक देहधारी गुरु लोक देखील समर्थन करतांना आढळून येतात. 

स्वतः गुरु लोक एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी राहतात. एकमेकांना कॉम्प्लिमेंट्स देतात. एकमेकांना भेटी देतात. एकमेकांशी विचारविनिमय करतात. मग शिष्य लोकांनी अनेक गुरूंकडे जाऊन शिकण्यामध्ये काय अडचण आहे ? त्याच्या शिक्षणामध्ये आणि संसारामध्येपण जर भ्रम आणि अडथळा निर्माण करत असतील, तर हे जणू काही माझी कंपनी सोडून जाऊ नकोस. असे सांगणाऱ्या बॉस सारखेच झाले.

खरा गुरू ' देहरहीत आत्मा ' असतो. किंवा झोळी घेतलेला, जेवायपुरताच भिक मागणारा नंगा राहणारा ' दिगंबर दत्त ' असतो. लौकीक जगातील डिटेक्ट झालेला, खरा गुरु, आपल्या चमच्याचेल्यांना पैसे देवून देवून, स्वतः ' भिकारी ' झालेला असतो. आणि त्याचा चतुर चमचा, ' श्रीमंत ' झालेला असतो. चतुर चमचा श्रीमंत होवून, तो खऱ्या गुरुकडून आपले ईप्सीत साध्य करून, त्याला लाथाडून स्वतः ' गुरू ' बनतो, आणि आपल्या चमच्यांची लंबी फौज बनवतो. जी आर्मीपेक्षा चतुर आणि बेकार ताकदवान असते. स्वआत्मअभिमानी, स्वश्रम अभिमानी असलेल्या, स्वपावित्र्य जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या मेहनती कर्मचाऱ्यांचा छळ करून, त्यांच्या नोकऱ्या घालवून, त्यांना अशा गुरुच्या कार्यक्रमाला बसायला, व तेचतेच किर्तन प्रवचन ऐकायला भाग पाडतात. 

लौकिक देहधारी गुरू आणि त्यांच्या चेल्या लोकांचे असे म्हणणे असते की, दत्तगुरुंना अनेक गुरु होते. परंतु दत्तगुरु हे देहरहित आहेत, आणि इच्छा वासना रहीत आहेत. मात्र तुम्ही मनुष्यप्राणी आहात. तुम्हाला इच्छा वासना आहेत, किंवा त्या तुमच्यावर पूर्ण शक्तीनिशी टाकल्या जातात, चतुराईने तुमच्यावर सतत बिंबवल्या जातात ! आणि मग तुम्ही अस्वस्थ होतात. तुमच्या इच्छा वासना पूर्ण करण्यासाठी, आम्ही गुरू लोक बसलेले आहोत. त्यामुळे, कोणत्यातरी एका गुरूला पकडून राहाल, तरच तुमच्या इच्छा वासना पूर्ण होतील आणि तुमचे अडकलेले काम पूर्ण होईल आणि तुमच्या संसारीक चिटकवलेल्या परिवारात शांती राहील. कारण हे सर्व होणे हे आम्हा गुरु लोकांच्या हातात आहे. कारण आमच्यापुढे तुम्ही नंगे आहात. तुमच्या नसनाड्या, तुमच्या कुंडल्या, तुमचे बॅक अकाऊँट, तुमचा सातबारा हे सर्व काही आमच्याकडे आहे. ते जर आम्ही काढून घेतले तर तुमची घरची बाई देखील तुम्हाला आपले म्हणणार नाही. आम्ही जर तुम्हाला येडे म्हणून डिक्लेर केले तर तुम्हाला तुमचे घरचेच लोक येडयांच्या ईस्पितळात भरती करतील. कारण, आमचे सारे ऐकतात. तुम्हाला बायका, पोरी, आई, आजी, आम्ही दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या तुमच्यापेक्षा आमचे जास्त ऐकतात. आम्ही, आमच्या चेल्यांना, चेल्यांच्या पोरांना, आणि चेल्यांच्या जावाईंनाच, बायका आणि नोकऱ्या देतो. कारण, त्यांच्या नसनाड्या आम्हाला, पाहीजे तेव्हा दाबता येतात. 

लौकिक देहधारी गुरू आणि त्यांच्या चेल्या लोकांचे असे म्हणणे असते की, वास्तवात आम्ही लौकीक देहधारी दिसत असून देखील, आम्हाला आत्मे माना आणि आमचा सर्वत्र उदो उदो करा. तुम्ही आम्हाला आमची फजिती होईल, असे जास्त प्रश्न विचारू नका. तुम्ही कामे करतांना चीडू नका. निष्कामपणे आमची कामे करा. मात्र, आम्ही जर चिडलो तर शाप देतो. जर तुम्ही, आम्हाला रिपोर्ट करणार नाहीत. आणि वेळोवेळी डोनेशन करणार नाहीत. किंवा आम्ही सांगितलेले कामे ऐकणार नाहीत, तर आम्ही तुमच्या संसारामध्ये फूट पाडू आणि तुमचे काम अडवून ठेवू ! आमचे हेर सर्वत्र आहेत. आमचे शिष्य सर्वत्र आहेत. आमचे सर्वांवर लक्ष आहे. आम्ही आम्हाला सोडून जाणाऱ्याचे बाल आणि बल कमी करून ठेवतो. 

लौकिक देहधारी गुरू आणि त्यांच्या चेल्या लोकांचे असे म्हणणे असते की, कामातील ' ईनोव्हेशन आणि क्रिएटीव्हीटी ' ही ब्रेनच्या फर्टीलीटीवर अवलंबून असते. ' ब्रेनची फर्टीलीटी ' ही विशिष्ट कालावधीपर्यंतच टिकते. मात्र, हेरगिरीच्या कामाला ' लिमिटलेस ' अनंत काळ उपलब्ध असतो. त्यामुळे ईनोव्हेशन करणाऱ्या, सुधारणा करणाऱ्या आणि क्रिएटीव्ह असणाऱ्या, तसेच कामात मेहनत करणाऱ्या लोकांपेक्षा, त्यांच्यावर हेरगिरी करणाऱ्या मॅनेजरला आम्ही जास्त जवळचे मानतो. आम्ही आमच्या हेर लोकांना जास्त पगार देतो. 

भारतातील राजकीय नेत्यांना देखील या गुरुलोकांचा दबाव असतो. कारण राजकीय नेत्यांचे करीयर देखील भारतात गुरुलोक आणि त्यांचे चेलेलोक ठरवतात. भारतातील इंजिनियरींग आणि मेडीकल सायन्समधील निर्णय देखील, त्या क्षेत्रातील ऑफिशियल डिग्री आणि कामाचा अनुभव नसलेले देहधारी राष्ट्रीय गुरुलोक घेतात.

काही भारतीयांमध्ये असा देखील समज आहे की, गुरु हा आपला परमनंट स्पाऊस आहे. त्याला सोडून दुसऱ्या स्पाऊस कडे जाऊ नये. असा जर हेका, सर्व भारतीय गुरुंच्या चेल्यांनी, संन्यास्यांनी, आणि सर्व गुरु लोकांनी ठेवला, तर भारतात लग्न करायची देखील कोणी हिंमत करणार नाही.

रावणाला मेहनत करून जी रियल इस्टेट लाभ देऊ शकली नाही, ती रियल इस्टेट, बिभिषणाला विनम्र राहून फुकट प्राप्त होते. गुरु लोकांची चेलेगिरी करून सहज प्राप्त होते. तर मेहनत कशाला करायची ? त्यापेक्षा चाटुचेला बनावे. कशाला मेहनत करण्याचा आभ्यास करण्याचा आणि शहाणपणा शिकवायचा ? कशाला लिड घ्यायची ? त्यापेक्षा अपलिंकन चतुर उंदरासारखे याला त्याला कुरुडून, आपापल्या कळपात सुखी रहावे. अशी मानसिकताच नाही, तर येथील नियमित अनुभवांनी आलेली यांची निर बुद्ध बुद्धी भारतात वाढिस लागलेली आहे.

रितसर शिक्षण घेणाऱ्या, आभ्यास करणाऱ्या सामान्य माणसाच्या तरुण पोरांना नाडणाऱ्या छक्के, भिकारी, बहुरूपी, देवाच्या नावाने विविध सोंगे घेऊन, पैसे गोळा करणारी मंडळी, ज्योतिष सांगणारे पंडे, कर्मकांड करणारे पंडे, विविध गंडेदोरे तोडगे करणारे पंडे, उतारा धुपारा करणारे पंडे,  पहिले लग्न आणि नंतर भांडणतंटे लावणारे पंडे आणि त्यांना पाळणारे आणि कुरवाळणारे लोक यांचे आधार कार्ड चेक करण्याची मोहीम देशभरात राबवली गेली पाहिजे. जर यांचे आधार कार्ड उपलब्ध नसतील. तर यांना जेलमध्ये काम करण्यासाठी पाठवण्यात यावे. आणि जेलमध्ये देखील जर काम करित नसतील. काम करून हे काही स्वतःचा स्किल डेव्हलप करू शकत नसतील. तर यांना देशाबाहेर हद्दपार करण्यात यावे. जेणेकरून ही भीक मागण्याची प्रवृत्ती देशभरातून नष्ट होईल. आणि देशाचे ' भिकारी देश ' असे म्हणून जे जगभरात नाव झालेले आहे, ती बदनामी होणार नाही. आणि देशातील जनतेला कष्ट मेहनत करून, उत्पन्न मिळविण्याची सवय लागेल. जबरदस्तीने अडवून भीक मागणे, सही मागणे, वोट मागणे, वर्गणी मागणे, हा कायदयाने गुन्हा आहे. असे पोस्टर्स मंदिराच्या रस्तोरस्ती आणि सार्वजनिक ठिकाणी लावावेत. 

मांस-मटन-मदयविक्रीचे परवाने, पान-तंबाखु गुटका विक्रीचे परवाने जसे असतात. तसे मांस-मटन-चिकन खाण्याचे परवाने, मदय पिण्याचे परवाने, पान-तंबाखु-गुटका खाण्याचे परवाने असावेत. व ते नियमितपणे रिन्यु करण्याची सक्ती असावी. वॉशरूम क्लिनिंगची व्यवस्था नसलेल्या धार्मिक स्थळांना सिल करण्यात यावे.

कुत्रे मांजरी पाळण्याचे परवाने असावेत. त्याशिवाय, घरात आणि सोसायटीत कुत्रे मांजरी पाळणे, अलाऊड करू नये. सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर अश्लील पोस्ट टाकून, मुलांना भरकटवणारे तसेच, नंगे चित्रपट दाखविणारे, नंगे बॅनर दाखविणारे, तसेच नंगे देव दाखवणारे, संस्था चालकांना, अभयारण्यातील हिंस्त्र जनावरांना जसा ट्रॅकिंग टॅग लावतात तसा ट्रॅकिंग टॅग यांच्या आधारकार्डवर लावावा. 

शाळेमधल्या, ऑफिसमधल्या, संस्थेमधल्या बाईला बघून, स्माईल करण्याचे कंपलशन नसावे. कामावरून उठवून, बेरोजगार करून, जनतेला आत्मनिर्भर न बनवता, आपली बकचोदी बळजबरी ऐकवणारे गुरुचेले लोक, कथा करून, मास मॅनेजमेंट करणारे लोक, पैसे घेवून लग्न लावणारे गुरुजी लोक, पैसे घेवून कर्मकांड करणारे लोक यांना, त्यांच्या त्या धंद्याचे रितसर परवाने देण्याची व ते रिन्यु करण्याची सवय लावली पाहिजे. यामुळे, आळशीपणा, चतुरपणा, बकचोदी आणि दीड शहाणपणा करून, फुकटात पैसे कमावण्याची जी वृत्ती, देशामध्ये बळावली आहे, ती नष्ट होईल.

 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

' एक ' म्हणजे नक्की काय ?

साईबाबांनी ' सबका मालिक एक ' असे म्हटले आहे. तर हा ' एक ' म्हणजे नक्की काय ? याबाबत आपण विचार करायला हवा. ' एक ' ह...

एकूण पृष्ठदृश्ये :