ना ईस्ट, ना वेस्ट, इंडिपेन्डंट ग्लोबल वर्ल्ड इज बेस्ट !


विवेकानंदांनी, तसेच योगानंदांनी, जो ईस्ट आणि वेस्ट यांच्यामध्ये गोल्डनमिन म्हणजे, सुवर्णमध्य तयार करण्याचा अनेकदा प्रयास केलेला आहे. ज्यात भारताचे आध्यात्मिक ज्ञान, वेस्टर्न कंट्रीजला, भारताने उपलब्ध करून द्यावे. आणि त्या बदल्यात वेस्टर्न कंट्रीजने, भारताला आधुनिक साधन सामग्री उपलब्ध करून द्यावी. अशाप्रकारचा तो एक अलिखित, सामंजस्याचा आणि सहकार्याचा करार होता. पण आजच्या परिस्थितीमध्ये त्याची काय स्थिती आहे? ते जर तुम्ही चेक केले, किंवा प्रत्यक्ष अनुभवले ! तेव्हा तुम्हाला लक्षात येते की, ती थेरी आता लागू पडत नाही, आणि पुढेही पडणार नाही असा निष्कर्ष समोर येईल. 

वेस्टर्न कंट्रीजने, भारतातले गुरुंनी दिलेले आध्यात्मिक ज्ञान, तसेच ऐतिहासीक वस्तु, वास्तु आणि आध्यात्मिक विरासत, काही बदल न करता, ओरिजनल स्वरूपात नीट जतन करून ठेवलेले आहे. 

आज भारतातले लोक जर्मनीला जाऊन वेद आणतात. आज भारतातले लोक शिवाजी महाराजांचे, राणाप्रतापचे टिपू सुलतानचे सिंहासन बघायला वेस्टर्न कंट्रीजमध्ये जातात. याचा अर्थ, वेस्टर्न कंट्रीजने वस्तू असो अथवा ज्ञान असो, ओरिजनल स्वरूपात सांभाळून ठेवले आहे. कारण त्यांच्याकडे सांभाळून ठेवण्याची कॅपॅसिटी आहे. 

जसे थंड फ्रिजमध्ये, भाज्या जास्त काळ टिकून राहतात. अन्न जास्त काळ टिकून राहतं, त्याप्रमाणे, थंड प्रदेशातील वेस्टन कंट्रीजमध्ये ज्ञान आणि वस्तू त्यांनी जतन करून ठेवल्या आहेत. त्याउलट, भारतात जेव्हा आधुनिक विज्ञानाची साधनसामग्री आणली गेली, तेव्हा भारतातील लोकांनी त्याचा योगरहीत भोग घेतला. त्याच्यापासून पोल्युशन वाढवून ठेवले. वापरता येत नसतांना देखील अनेक गोष्टी ट्राय केल्या. प्रणाली नसतांना उपकरणे कार्यान्वित केली. आणि कार्बन कंटेंट वाढवून ठेवले. आणि त्या वाढलेल्या कार्बन कंटेंटमुळे, उरलीसुरली आध्यात्मिकतेचा देखील बट्ट्याबोळ झाला. 

समजा, तुमच्या किचनमधील फ्रीजमध्ये, गढूळ पाणी ठेवलेले आहे.

आणि, बाल्कनीतील उन्हामध्ये, स्वच्छ पाणी ठेवलेले आहे. 

आता, तुम्ही बाल्कनीतल्या उन्हातील, स्वच्छ पाणी, हॉलमधील, एका रिकाम्या ग्लासमध्ये, ग्लास अर्धा भरेपर्यंत ओता. 

त्यानंतर, फ्रिजमधले गढूळ पाण्याने, त्या हॉलमधील ग्लास उरलेला अर्धा भाग भरा. 

आता त्या हॉलमधील ग्लासचे निरिक्षण करा. आणि मला सांगा की, ते पाणी गढूळ आहे, की स्वच्छ निर्मळ आहे ?  

ह्या दोन टाईपच्या पाण्याचा आपण सुवर्णमध्य साधू शकतो का ? 

नाही ! पाणी मिक्स करून खराबच झाले आहे.

अशाप्रकारे, ईस्ट आणि वेस्ट एकत्र करून, केवळ वेस्टेज उरलं आहे. हे तुम्ही जोपर्यंततुम्ही मान्य करणार नाही, तोपर्यंत तुम्ही पुढची ॲक्शन घेऊ शकत नाही. 

तुम्हाला प्रत्येकाला, मग तुम्ही ईस्टर्न असो, वा वेस्टरन असो, ईस्ट-वेस्ट सोडून, तुम्ही एक ग्लोबल एन्टिटी आहात. आणि तुम्हाला कोणाशीच काही सहकार्य करायची गरज नाही, ते आपोआप होईल ! केवळ तुम्ही, आहे त्या परिस्थितीमध्ये, स्वतःहून, आपापले पाणी, आणि आपापला परिसर, आणि आपापला परिवार, स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ! आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

पहिले आपल्या शरीराचे ईस्ट आणि वेस्ट साफ केले पाहिजे. कारण, अज्ञान-वासनाविकाराच्या रात्रीत दोन्हीही घाण झाले आहे. सकाळी आंघोळ करतांना आपण सगळे भाग धुतो. त्याप्रमाणे, पहिले स्वतःचीच मोरी बांधा ! स्वतःचेच गॅरेज बांधा ! आणि मग ह्या मोरी आणि गॅरेजमध्ये, स्वतःलाच रिपेअर करा ! काही कोणाशी कोलाब्रेट करण्याची आणि भाषण देण्याची गरज नाही ! कोलाब्रेशन आपोआप होत आहे. कारण हे ग्लोबल वर्ल्ड आहे. आणि एकमेकांना ज्ञानदेखील आपोआप ट्रान्सफर होत आहे ! कारण हे ग्लोबल वर्ल्डच राहणार आहे.

आत्मनिर्भरता केवळ सोलर पॅनलनेच होईल, असे एकाच गोष्टीवर अटकून राहून चालणार नाही. आज तुम्ही सोलर पॅनल इम्पोर्ट होत नाहीत, पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी मिळत नाही, याच्यासाठी परदेशातील कंपन्यांशी युक्तिवाद किंवा भांडण करत असाल, तर त्यापेक्षा, आपल्याला इंडिव्हिजन लेव्हलवर करता येण्यासारखे जे आहे, त्याकडे आपण अधिक भर द्यावा. श्रीकृष्णाने आपल्या गोकुळाला सक्षम बनवण्यासाठी, गोवर्धनाचा विकास केला.  त्याप्रमाणे, अन्न, पाणी, दूधदुभते, शारीरिक रोगप्रतिकारक क्षमता, जेव्हा आपल्या राष्ट्रात पुरेपूर उपलब्ध असेल, तेव्हाच आपले राष्ट्र ज्ञानाला रिटेन करू शकेल. कोलॅबोरेशन आपोआप होईल. 

निसर्गदेवांशी कोलाब्रेशन तेव्हाच होतं, जेव्हा तुमच्याकडे यज्ञसंमिधा पुरेपूर उपलब्ध असते. आणि जेव्हा तुम्ही यज्ञाचे पावित्र्य टिकवून यज्ञ करतात, निसर्गदेव तुष्ट करतात. तेव्हाच निसर्गदेव पण, तुम्हाला साधनसामग्री देऊन तुष्ट करतात. ही सूर्यपृथ्वीची वैदिक थेरी आहे.

मुजरा मारून गल्ला भरायचा काळ आता राहिला आहे का ? लौकीक मालकाकडेच द्यायला पैसा नसेल, तर हुजरेगिरी करून उपयोग आहे का ? जागतीक क्वालिटीचे भारतीय उत्पादनच नसेल, जागतिक बाजारपेठ उपलब्ध नसेल, आणि ग्लोबल लेव्हलवर विक्रीच नसेल. भारतीय भांडवलदारांकडे प्रॉफिट नसेल तर, महाराष्ट्रात, लोकल खंडणी वसूल करणाऱ्या गुंडांचा, वर्गणी गोळा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा, चित्रपट आणि खोट्या बातम्यांद्वारे भांडणे लावणाऱ्या राजकारण्यांचा धंदा तरी कसा चालेल ? केवळ फुकट अन्नदान आणि हॉटेल व्यवसाय चालू ठेवता येईल. बँकँना स्वतःचा मुळा-मुठा मारून पैसा खेळवावा लागेल. कॉमनसेन्स वापरा. चिखलातल्या कमळासारखा विकास करून घेता येत नसेल तर, चिखलातल्या बेडकासारखे सहा महीने जमिनीखाली भुमिगत होवून समाधीस्थ व्हावे लागेल.

सर्वांगीण विकास करण्यासाठी, हात-पाय-डोके-आपले सर्व अवयव वापरावे लागतात. त्याचप्रमाणे, एकाच रिसोर्सवर भर देतांना दगडावर डोकं आपटत राहणं योग्य नाही. ही जाणीव देशातील प्रत्येक नागरिकाला झाल्याशिवाय, आणि ती जबाबदारी, स्वतःहून पेलण्याची आंतरिक इच्छा झाल्याशिवाय, बाहेरून ज्ञान देऊन उपयोग नाही. जशी चुल तुम्ही वेगवेगळी मांडलेली आहे, तशी मोरी देखील वेगळी बनवा ! अशी काहीतरी काबिलीयत बनवा ! स्वतःचे अन्न-वस्त्र-निवारा, इंधन आणि वाहन ह्या गोष्टी लोकल टेक्नॉलॉजी व लोकल रिसोर्सेस वापरून बनवायला शिका ! स्वतःचे तेल आणि स्वतःचा साबण बनवायला शिका ! स्वतःच्या साबणाने स्वतः आंघोळ करायला शिका ! जशी गाडी तुम्ही वेगळी घेतली आहे, तसे गॅरेज देखील वेगळे बनवा ! स्वतःच्या कौशल्याने त्या गाडीचे रिपेरी मेंटेनन्स करायला शिका ! गांड धुवायची अक्कल नाही. टॉयलेट बांधायची अक्कल नाही. आणि नुसतेच खाऊपिऊ राहीलेत. चहा पिवून हागू राहीलेत. जोक करून जगाला आपले नंगे दर्शन करवू राहीलेत. तर प्रत्यक्षात देशाचा विकास कसा होईल ? गाईचे गोबर एकवेळ एक्सपोर्ट होईल, तुमचे गोबर होईल का ? स्किल, काबिलियत आणि समज नसलेले बाळ आपल्याच गोबरशी खेळत बसते. त्याला चिवडत बसते. तसे हे आहे. लहान नंग्या बाळाने, आलेल्या आजूबाजूच्या सगळ्या पाहुण्यांकडे बघून गोड स्माईल केले, की सगळे पाहुणे त्याला कुरवाळून देतात. याचा अर्थ बाळाचा गौरव वाढला. असे आपण म्हणू का? केवळ नग्न प्रदर्शन करून आणि स्माईल देऊन आपण जगाचा गुरु होवू का ? हा प्रश्न आहे. 




# अपनी अपनी मोरीज् गॅरेज ! 
# ईस्ट ना वेस्ट, ग्लोबल वर्ल्ड इज बेस्ट !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ना ईस्ट, ना वेस्ट, इंडिपेन्डंट ग्लोबल वर्ल्ड इज बेस्ट !

विवेकानंदांनी, तसेच योगा नंदांनी,  जो ईस्ट आणि वेस्ट यांच्यामध्ये गोल्डनमिन म्हणजे, सुवर्णमध्य तयार करण्याचा अनेकदा प्रयास केलेला आहे. ज्यात...

एकूण पृष्ठदृश्ये :