महाअवतार बाबाजी आणि इतर गुरूंमध्ये काय विशेष फरक आहे?


स्पीरिच्युअलीटीमध्ये आधुनिकता !

नव्या काळामध्ये स्पीरिच्युअलीटीमध्ये सुद्धा आधुनिकता आलेली आहे. ओपनसोर्स मेडीयामुळे सर्वांना घरबसल्या स्पीरिच्युअल नॉलेज मिळाले. नॉलेज मिळाल्यामुळे लोक त्रिकालज्ञ झाले व लोक स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागलेत. आजकाल मरणाची वेळ आली की, रावण स्वतः येऊन, पैसे देऊन, रामाला सांगतो की, आता तू मला मार. आपली वेळ आली की, कंस स्वतःहून कृष्णाजवळ येऊन, त्याला पैसे देऊन सांगतो की, आता तू मला मार ! आणि, आपली वेळ झाली की, माऊली स्वतःहून माधवाजवळ येऊन पैसे देऊन सांगते की, आता मला ध्यानाला बसव. अशाप्रकारे, आजकाल लोक स्वतःहून ईनिशिएटीव्ह घेतात.

नव्या काळामध्ये गुरु, टिचर, मेंटर यांचे देखील पेड प्रकार आहेत. संघटना आहेत. सेवा आहेत. आणि त्यानुसार त्यांच्या फिज् किंवा तोडीपाणी ठरलेल्या आहेत. लोकांनी त्यांचे फस्टक्लासगुरु, सेकंडक्लासगुरु, थर्डक्लासगुरु आणि बॅकवर्डक्लास गुरू असे वर्गीकरण, स्पेशलाईजेशन, आणि कॅटेगराईझेशन करून ठेवलेले आहे. बायकांचे गुरु, पुरुषांचे गुरु, तसेच, अधल्यामधल्यांचे गुरु असे प्रकार देखील बनलेले अढळतात.

ह्या गुरूंच्या संघटनांमध्ये देखील विचारांचे टोळी युद्ध चालू असते. तसेच, एकमेकांचे खिलाडी फुस लावून, ट्रॅप लावून, सामदामदंडभेद लावून, डायरेक्ट पकडून किंवा उचलून आणण्याचे काम देखील चालू असते. एकमेकांची नसनाडी दाबणे, एकमेकांवर लक्ष ठेवून एकमेकांची टेक्निक चोरणे देखील चालू असते. सर्वांच्या कंपन्या स्थापित असल्याने वैयक्तिक दोष कोणाचा हेच कळत नाही.



इतिहासातील मृत, गायब किंवा समाधीस्थ झालेल्या ज्ञात-ज्ञात गुरुंची लौकीक जिवनातील हतबलता आणि सध्याच्या लौकीक गुरुंची देहासक्ती ! 

प्रसिद्ध गुरुंच्या फोटोत, मुर्तीत, किंवा चित्रात, ते एका विशिष्ट भौतिक शरीराचे किंवा झाडाचे प्रतीके आहेत.

अनेक ध्यानसमाधी करणाऱ्या प्रसिद्ध गुरू आणि देवतांनाही गर्भधारणेची समस्या, वेदनांची समस्या, खाज सुटण्याची समस्या, कुऱ्हाडीने मारण्याची समस्या, बाह्य प्राण्यांच्या शरीरातून ओरखडे येण्याची समस्या असते. म्हणून, त्यांना त्यांच्या शरीराच्या संरक्षणासाठी वाघ, सिंह, चित्ते, कोल्हे, कुत्रे, मांजरी, गाय, बैल, किडे, मकोडे, भुंगे, मुंग्या, पंडे, हिजडे, भिकारी, हेर किंवा स्त्रिया यांचे सुरक्षा कवच, सेवा सुरक्षेसाठी शिष्य समुह, सुरक्षा दल, शस्त्रे, वाहने, मशीने आणि विविध बुद्धिमत्तेच्या युक्त्यांची आवश्यकता असते. 

पण, तसे महाअवतारबाबाजींचे प्रकरण नाही. जर तुम्ही महाअवतार बाबाजींचे चित्र पाहिले तर, झाड कापले गेलेले आहे. प्राणी मारला गेलेला आहे. आणि प्राण्यांच्या कातडीचा ​​वापर आसन म्हणून केला आहे.

याचा अर्थ, वृक्षजीवन आणि प्राण्यांचे जीवन दोन्हीही संपवले गेले आहे. जेणेकरून, कोणीही त्यांना ओरखडू शकत नाही, कोणीही त्यांना कुऱ्हाडीने मारू शकत नाही, कोणीही त्यांना दुखवू शकत नाही, कोणीही त्यांच्या समाधीवर बॉम्ब टाकू शकत नाही, त्यांच्यावर बुलेट गोळी, अस्त्र शस्त्र, तंत्र मंत्र मारून त्यांना त्रास देवू शकत नाही. कोणीही त्यांना कोणत्याही प्रकारच्या जेलमध्ये किंवा बंधनामध्ये अडकवू शकत नाही.

सामान्य जनतेला ज्ञात असलेले गुरु आणि महाअवतार बाबाजींमध्ये हा फरक आहे. म्हणूनच, महाअवतार बाबाजींना, सर्व गुरुंचे गुरु म्हटले जाते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

महाअवतार बाबाजी आणि इतर गुरूंमध्ये काय विशेष फरक आहे?

स्पीरिच्युअलीटीमध्ये आधुनिकता ! नव्या काळामध्ये स्पीरिच्युअलीटीमध्ये सुद्धा आधुनिकता आलेली आहे.  ओपनसोर्स मेडीयामुळे सर्वांना घरबसल्या स्पी...

एकूण पृष्ठदृश्ये :