हा जन्म तुझ्याचसाठी , सर्वस्वी तुझाच होतो
येवू तुज कड़े कसा मी ? , माझे पंख छाट्लेले.......
मनात तुझीच प्रतिमा , शरीरात तुझीच आस
विमुक्त होवू न शकलो , नयनी अश्रू दाटलेले ........
अणु रेणूत तूच होता , सर्वत्र तुझीच सत्ता
मग का सोडून गेलास ? , आभाळ फाटलेले........
केली तुझीच पूजा , केवळ तुझ्याच साठी
हे बन्ध तोडले मी , जमवून सर्व शक्ति
परी तुजकडे न येवू शकलो , माझे रक्त पेटलेले .......
धावू किती तुझसवे मी , विसरुनी क्षीण सारा
तू पवन वेगी .... , माझे पाय काटलेले........
दे तुझसम मजला , विस्तीर्ण दीर्घ पंख
विनवू तुला किती मी , अवसान आटलेले...........

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा