दुसऱ्याचे दुखवू नये मन ।
आपल्या अज्ञानाचे करू नये प्रदर्शन ।
आत्मक्लेशाचे जनन ।
करू नये ।।
अतृप्त , अशांत , चंचल मन ।
अपमान होण्याची होत लक्षण ।
असावे सावध प्रत्येक क्षण ।
अखंडित ।।
स्वस्थ , शांत , प्रसन्न ध्यान ।
चारचौघात वाढवी मान ।
थोरामोठ्यांचा सन्मान ।
फलदायी ।।
तोलून बोलावे ।
मजबूत जेवावे ।
अभ्यासात असावे
नियमित ।।
प्रलोभांना फसू नये ।
क्षुल्लक गोष्टींनी रुसू नये ।
जोरजोराने हसू नये ।
विनाकारण ।।
करोनिया विनोद , संवादफेक अन नक्कल ।
खळखळोनी हसवावे सकल ।
स्वपर ज्ञान होते द्विगुणि ।
करोनिया विज्ञान , तंत्र , शास्त्राची उकल ।।
गीत संगीत कविता अन गजल ।
मैफिली पर्यंत मारावी मजल ।
आपला छंद , आवड अन कल ।
मनोमन ओळखावा सकल ।।
काव्य शास्र विनोदात ।
आनंदे घालवावा काळ ।
आळस, निद्रा, अन कलहात ।
होतात मूर्ख लोकांचे हाल ।।
आपल्या अज्ञानाचे करू नये प्रदर्शन ।
आत्मक्लेशाचे जनन ।
करू नये ।।
अतृप्त , अशांत , चंचल मन ।
अपमान होण्याची होत लक्षण ।
असावे सावध प्रत्येक क्षण ।
अखंडित ।।
स्वस्थ , शांत , प्रसन्न ध्यान ।
चारचौघात वाढवी मान ।
थोरामोठ्यांचा सन्मान ।
फलदायी ।।
तोलून बोलावे ।
मजबूत जेवावे ।
अभ्यासात असावे
नियमित ।।
प्रलोभांना फसू नये ।
क्षुल्लक गोष्टींनी रुसू नये ।
जोरजोराने हसू नये ।
विनाकारण ।।
करोनिया विनोद , संवादफेक अन नक्कल ।
खळखळोनी हसवावे सकल ।
स्वपर ज्ञान होते द्विगुणि ।
करोनिया विज्ञान , तंत्र , शास्त्राची उकल ।।
गीत संगीत कविता अन गजल ।
मैफिली पर्यंत मारावी मजल ।
आपला छंद , आवड अन कल ।
मनोमन ओळखावा सकल ।।
काव्य शास्र विनोदात ।
आनंदे घालवावा काळ ।
आळस, निद्रा, अन कलहात ।
होतात मूर्ख लोकांचे हाल ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा