कॉलेज जीवन

कॉलेजातील मित्र आमचे , आहेत मध्यमवर्गी
५० टक्के सायकलवर , ५० टक्के पायीच देतात वर्दी


काही मात्र भाव मारायला , घेउन येतात कार
त्यातले ९० टक्के , नंतर फिरतात बेकार

बापाच्या पैश्यावर , टाकतात छानसा धंदा
भोळ्या गरीब जनतेला लुटून , खूप कमावतात चंदा

अपुरे शिक्षण सोडून , कोणी ओढतो रंधा
कुणी खचून जावून , टाकतो फाशीचा फंदा

नुसत्या पदवीला भाव नाही यंदा
ओळख ज्याक शिवाय होतो , चांगल्या चांगल्याचा वांदा

वह्या गणवेशाची , कॉलेजात नसते सक्ती
त्यामुळे नट नट्यांची, करता येते भक्ती

अयोग्य ठिकाणी वापरली जाते युवाशक्ती
आई बापाच्या पैश्यावर , मुले भोगतात मुक्ती

मित्राकरवी प्रोक्सी लावण्याची , असते आमची युक्ती
लेक्चर बंक मारून , काही नगीने पांढरी अगरबत्ती फुक्ती


कॉलेज कॅन्टीन वाले वस्तूंचा दाबून घेती भाव
गरीब विद्यार्थी अश्या ठिकाणी  कसा बसेन राव ?


विविध फंड उकळण्यासाठी कॉलेज करते घाई
सर्व परिस्थितीला तोंड देत विद्यार्थ्याला आठवते आई


पांचट विनोद करणारा येथे बनतो लीडर
चांगुलपणा दाखव्णार्याची येथे उडवतात टर

"फंडा" नाही कळला , तरी म्हणावे लागते एस सर
वर्गात शंका विचारणाऱ्याला सांगतात एकस्पेरीमेंट पुन्हा कर !

सचोटीने वाग्णार्याची येथे नाही कदर
वेळ निभावून नेणार्याला , नसतो येथे डर
घरून पालक सांगतात ,"आभ्यास कर ,नाहीतर मर "  !

कॉलेजातील जीवन आमचे आहे विविधरंगी
सुख दुखः आपले वाटून आम्ही एन्जॉय करतो जंगी !!!!
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ओ पियापिया, तुने क्यों गोविंद भुला दिया ?

ज्यांची अज्ञातपणे, अज्ञानवशात, किंवा अजाणतेपणे, किंवा हतबलतेमुळे, किंवा कर्मवशात, सुशुमनासरस्वती नाडी ब्लॉक झाली आहे. अशा लोकांना नामजपाचा व...

एकूण पृष्ठदृश्ये :