मला वाटते वारा होवून गिरी शिखरातून मुक्त फिरावे ।।
सरितेला देवून वेग , मेघ फुला कडे घ्यावी झेप
कुसुमातील सुगंध चुंबून आसमंतात गिरगीरावे ।।
घेवून प्रचंड वादळ वेग , लोटत न्यावा श्यामल मेघ
नंतर होवून शीतल गार , ओढावी मेघ स्तनाची धार ।।
आनंदून मग धरणी मातेला , घालावा जलबिंदूंचा हार
मृगाचा संदेश देवून , बळी राजाचे दुखः हरावे ।।
प्राण कुपीचा देवून मेवा , करावी चराचर सृष्टीची सेवा
जीवन गाण्याची छेडीत तार , करावा आसमंतात मुक्त विहार ।।
फुलराणीची काढून छेड , लावावे बाल रविचे वेड
तुळशी मातेचा घेवून धूप , नटवावे संध्याचे रूप ।।
शांत सौम्य घेवून स्वरूप , सुगंधासाठी खूप झुरावे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा