सध्याच्या परिस्थिति मध्ये ज्याला ज्याला नारकीय जिवन टाळायचे आहे त्याने खालील गोष्टी केल्या पाहिजेत
१) जास्तीत जास्त आदी सनातन शास्त्र ग्रंथांचे वाचन आणि अध्ययन
२) आदी सनातन शास्त्र आभ्यास करणाऱ्या सात्वीक लोकांशी जाणीवपूर्वक संपर्क आणि शंकानिवारण हेतू विचारविनिमय
३) सात्वीक जीवनपद्धतीचा सराव
४) दिवसातून किमान ३ तास ३५ मिनीटे "हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्णकृष्ण हरेहरे हरेराम हरेराम रामराम हरेहरे" या महमंत्राचा मानसिक जप
किंवा
२१ माळा महामंत्राचा जप .
५) कुटुंबातील जे लोक शिकण्याचा प्रयत्न करित आहेत त्यांना सहानुभुती पुर्वक सात्वीक मार्गदर्शन व दयाभाव ठेवणे
६) एकमेकांचा आदर करत मुळ संस्कृतीकडे घेवून जाणे
७) कुटुंबातील सदस्यांचा आदर करत त्यांना शुद्ध सात्वीक आदी सनातन संस्कृती विषयी ओळख करून देणे. त्यांना त्यांच्या अडचणी, विचार मांडू देणे व त्या प्रश्नांची शास्त्रसंमत उत्तरे शोधून काढणे
८) आपल्या कुटुंबाचे जे गुरू आहेत. त्यांना आपल्या योगक्षेमाची आपल्यापेक्षा जास्त काळजी असते .
त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेणे.
९) रोज श्रीमत भगवतगीतेचा किमान १ संस्कृत श्लोक मनातल्या मनात वाचावा, त्याच्या अर्थावर दिवसभर मनातल्या मनात चिंतन करावे. आणि त्याचे संस्कृत कडवे परत परत आठवत रहावे.
१०) भगवान श्रीकृष्ण हे सर्वात बुद्धीमान ,आदिपुरुष , सत्यम, शिवम, सुंदरम असे परब्रम्ह असून त्यांनी सत्चिदानंद दिव्य शुभमंगल देह धारण केला आहे. भगवान श्रीकृष्णांचे चिंतन हे भक्तीपूर्वक प्रेमभावानेच केले पाहिजे. त्यासाठी घरातील देवमंदीरात नमस्कारासाठी जाणे. सदैव सात्वीक, दैवीगुण धारण करून कृष्णभावनेमध्ये राहून परब्रम्ह, परमात्मा, पुरुषोत्तम, योगेश्वराचे सतत प्रेमाने ध्यान करणे याला राजविद्या राजगुह्ययोगाचे पालन करणे असे म्हणतात. हा योग कायमस्वरूपी टिकावा त्यासाठी रोज श्रीमत् भगवत् गीतेतील संस्कृत श्लोकांचा पाठ करत त्यातील अर्थरूपी ब्रम्हरसाचे सतत पान केले पाहिजे. श्रीकृष्णांचे इतर तामसिक अथवा राजसिक स्वरूपांचे कधीही ध्यान करू नये. पवित्रता, सात्वीक ,दैवीवृत्ती धारण करून तसेच प्रकाशप्रार्थना आणि ध्यान करून अनुग्रह पदरी पाडून घ्यावा. शांत, स्थिर, संयमी, दैवी वृत्ती धारण करून ज्ञानामृताचे पान करून ब्रम्हवृत्तीत प्रतिष्ठीत होऊन उच्च चरित्राचा आदर्श प्रस्थापित करावा.
११) आर्थिक मानसिक शारीरीक व्याधी ज्या घरात आहे त्या घरातील व्यक्तिंनी रामचरितमानस वाचायचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे सातवा सोपान वाचणे. सातवा सोपान म्हणजे उत्तरकांड जो सोपानदेवसारखे नियमितपणे वाचतो तो रोगराई पासून वाचतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा