कांदा हे कामनेचे दमन करणाऱ्या रामभक्त बाणाईच्या गुणांचे प्रतिक म्हणजे आठवण आहे. ( मानसिक स्वस्थता तंदुरुस्ती )
लसून हे सृजनात्मक व रोगप्रतिकारक लस निर्माण करणाऱ्या कृष्णभक्त म्हाळसा मातेच्या गुणांचे प्रतिक म्हणजे आठवण आहे. ( शारीरीक स्वस्थता तंदुरुस्ती )
वांगे म्हणजे बाह्य मनाला रोध घालून ते आंतर दृष्टीकडे वळविण्याचे प्रतिकात्मक आठवण करून देणारे श्रीहरि विठ्ठलाच्या गुणांचे प्रतिक आहे. ( बौद्धिक स्वस्थता तंदुरुस्ती )
अशाप्रकारे राम कृष्ण हरि यांच्या गुणांच्या तिन शक्ती शीवाने स्वतःमध्ये धारण कराव्यात हा संदेश हा नैवेद्य देतो. जेणेकरून पुरुष संपूर्ण स्वस्थ आरोग्य संपन्न राहील व परिवाराचे नेतृत्व करू शकेल.
मार्गशिर्ष महिना हा मलहारी कुळपुरुषाचा महिना आहे कारण मलहारि कुळाचा शिर्ष म्हणजे मुख्य आहे. अशाप्रकारे आध्यात्मिक आणि भौतिक गोष्टीची सांगड घालून ऋषी मुनींनी सणवार व्रत वैकल्ये बनविली.
' उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' असे ऋषीमुनींनी सांगून ठेवलेले आहे. त्यामुळे अन्न ग्रहण हे आठवणीचा नैवेद्य दाखवून 'यज्ञकर्म' म्हणजे भगवंताला शोधण्याचे साधन म्हणून ग्रहण करायचे असते.
यज्ञ असो वा योग असो ! शारीरीक मानसिक आणि बौद्धीक स्वास्थ सर्वप्रथम उत्कृष्ट बनविणे आवश्यक आहे.
विकाररूपी राक्षसांशी लढण्यासाठी भगवंताचे गुण आपल्यामध्ये यावेत, भगवंताच्या गुणांची आठवण आपल्याला यावी हा गुप्त संदेश देण्याचा उद्देश्य त्यामागे असावा.
महाराष्ट्र हे उत्तर आणि दक्षिण भारताच्या मध्यभागी पठारी भागात येत असल्या कारणाने सदर लोकल फुड सामान्य जनतेस पचनी पडते परंतु इतरांनी वाण घेण्यापेक्षा ' गर्भितार्थ व गुण घेणे ' महत्वाचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा