जीवशास्त्रीय असमतोल, भौतिक यंत्र साधने आणि महामारी
जीवशास्त्रीय असमतोल, भौतिक यंत्र साधने आणि महामारी यांचा संबंध असतो.
ह्या असमतोलाची किंमत आपल्याला आपल्या सखे सोयरे व संपूर्ण मानवजातीला कोणत्या तरी रुपात चुकवावी लागते.
प्रत्येक यंत्र गॅजेट हे निसर्गाची कोणती नी कोणती पवित्र शक्तीला पोल्युट करून चालत असते. कोणतीच गोष्ट फ्री नसते . हवा सुद्धा नाही . त्यामुळे सदर यंत्रसामग्री, गॅजेट इ. वापरतांना शंभर वेळा हा विचार करावा की आपण याचा खेळ करून पर्यावरण प्रदुषीत तर करित नाही आहोत ना?
आपले आरोग्यमय शरीर मन बुद्धी शाबूत आहे का ? की आपण त्याला केमीकल भूल देवून वेगळ्या विश्वात रमायचा प्रयत्न करतोय? याचा परीणाम काय होईल? आपले शरीर कधीच खोटे बोलत नाही , त्याला भूल देण्याऐवजी त्याचे ऐकायला शिका. आपल्या शरीराशी आपल्या पेशींशी संवाद साधा. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. त्यांचा उत्साह शक्ती वाढवा त्यांना आपलेसे वाटायला हवे म्हणजे ते तुम्हाला साथ देतील.
संदर्भ ग्रंथ:
शरिराशी संवाद: मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा