आभामंडळाचे आरोग्य

आभामंडळाचे आरोग्य संरक्षण आणि दुरुस्ती

एक्झरसाईज करून शरीरातील अवयव संस्थेतील हारमोन्स, रक्त यासारखे द्रव पदार्थ तसेच प्राणवायूचे संपुर्णशरीरात संचलन होणे आवश्यक असते. मसल्स् व इतर पेशी संस्था कार्यान्वीत होतात. विचारांनी शरीरात विषारी द्रव्य तयार होतात त्यांना क्लीन करण्यासाठी खूप श्रम पडतात.

आसन/ योगा/ प्राणायाम करून शरीराची मेडिटेशनची तयारी होते.
गुरुदेव सानिध्यात मेडीटेशन करून ज्ञान प्राप्त होते.
ते ज्ञान अमलात आणण्याची प्रक्रिया म्हणजे रेकी हिलींग.
पेशींना ३ गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते १) फुड २) प्राणवायू ३) हिलींग.
पेशींची निरोगी वाढ, संगोपन व कार्यक्षमता या गोष्टींवर अवलंबून असते. 
हिलींग पेशींना पोझिटीव्ह एनर्जी प्रदान करते. हिलींग पॉझीटीव्ह मानसिक शक्तीने, प्रेमळ दयाळू दृष्टीने, प्रत्यक्ष सानिध्य किंवा स्पर्शाने तसेच आठवण काढून पण करतात.
शरीरातील पेशींना जर हिलींग केले नाही तर त्या शरीरात बंड /क्रांति /उठाव करून शरीर रोगाने ग्रासून टाकतात आणि त्याची परिणीती शरीराच्या मृत्यू मध्ये होते.आंतरीक गोष्टी समजायला कठीण किंवा काही वेळेस गमतीदार वाटतात पण जो अनुभवतो त्याला ते सर्व माहित असते. 
नैराश्य तसेच चिडचिडेपणा असलेला स्वभाव हा आपल्या शरीराभोवती असलेल्या आभा मंडळामध्ये छिद्र झाल्याने किंवा तडा गेल्याने होतो. यामुळे आपल्यावर मानसिक आक्रमणाच्या  भयंकर लहरी आपल्या आभामंडळामध्ये प्रवेश करतात. यालाच सायकीक ॲटॅक म्हणतात. सायकीक ॲटॅकमुळे लोक आयुष्यातून उठू शकतात. योग्य आहारविहार व्यवहार , स्वच्छ हवा, पवित्र संगत यामुळे आभामंडळ सुरक्षीत व सक्षम बनते!
जीवनशक्ती (लाईफ फोर्स एनर्जी) ह्या आभामंडळाला पडलेल्या तड्यातून किंवा छोट्याश्या छिद्रयातून बाहेर ओढून घेण्यासाठी काही तत्वे (ज्यांना एनर्जी व्ही-ॲम्पीअर म्हणतात.) प्रयत्नशील असतात. 

ताणतणाव जास्त घेणे, वेळेची मर्यादा, मानसिक शाब्दीक शारीरीक आघात, ताजा स्वच्छ गरम आहार न करता कमी व्हाईटॅलीटी असलेला शीळा आहार, प्रदुषीत हवा, नकारात्मक वातावरणात राहणे, दुःखात राहण्याची पूर्वजांची मानसीकता, दुःखी लोकांचे दुःखी पर्यावरण इ.
अशी ही कारणे आभामंडळाच्या छिद्राला व त्यासोबत सायकिक ॲटॅक ला कारणीभूत होतात. हे सर्व अनर्थ टाळायचे असेल तर हे नक्की का होते? कोणत्या वातावरणामुळे होते? हे घरातील प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे. व त्यानुसार सर्वांना अवेरनेस व योग्य प्रशिक्षण देणे. आभामंडळ जास्तीत जास्त सक्षम संरक्षक बनवणे व घरातील व समाजातील इतरांनाही तसे बनवण्यास मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

रेकी हिलींग, प्राणिक हिलींग, डिटॉक्सीफिकेशन प्रोसेसेस, डाएट कॉन्शिअसनेस, योगा ध्यान प्राणायाम, पर्यावरण स्वच्छता, पर्यावरणाचे हिलींग करणे, हिलिंग करणाऱ्या संस्कृत श्लोकांचे जप इ. सर्व गोष्टी घरातल्या सगळ्यांना येणे अगत्याचे आहे. 

जिथे आपली प्रॉपर्टी , जमिन , मालकी हक्क असलेले निवासस्थान, कॉलनी, गल्ली, सोसायटी इ. असते तिथे आपल्या ओरा मधील एनर्जी शक्ती ही व्हायब्रेशन, वस्तु आणि व्यक्ति या तिनही रुपात अस्तीत्वात असते. त्यामुळे त्यांच्याशी आपल्याला प्रेमाने आणि काळजीपूर्वक वागावे लागते. घर हे शक्ती संचयन संरक्षण , संजिवनी पुर्नजीवन , हिलींग विश्रांती ध्यान , दया क्षमा शांति , संमृद्धी लक्ष्मी संघटन , ओरा क्रॅक गॅप फिलींग, हेक्सेस रिमुव्हल , ब्लेसिंगस्अर्निंग , नैसर्गिक वातावरणात सामुहीक प्रार्थना आणि सणवार उत्सव साजरा करण्यासाठी असते.

याच कारणाने क्षत्रीय लोक आपले कार्यालय आणि निवास स्थान वेगवेगळे ठिकाणी ठेवतात. कार्यालय किंवा कार्यक्षेत्र किंवा कुरुक्षेत्र या ठिकाणी व्यवहारात प्रचलित असलेले हिंसक शब्द किंवा शक्तींचा वापर धर्मयुद्धासाठी करण्याची मुभा क्षत्रियांना असते. धर्मयुद्धानंतर सर्व मृतआत्म्यांना श्राद्ध तर्पण करून सद्गति देण्याची जशी पूर्वीच्या काळी प्रथा होती त्याचप्रमाणे शरीराची आणि मनाची ' तृष्णा आणि अस्वस्थतता ' दूर करण्याची तजवीज त्यांच्याकडे असते. दुष्ट फ्रिक्वेन्सींना रॅमींग आणि शॉमिंग करून नलीफाय करून ग्राऊंडिंग करण्यात येते. व्यायामासाठी वेगळा आखाडा असतो.

कमकुवत ओरा कमकुवत होणे हे सायकीक अॅटॅक येण्याचे मुख्य कारण आहे ।

सायकीक अॅटॅक हे अॅक्सीडेटल मिसटेकचे मुख्य कारण असते ।

ह्या मिसटेकच पुढे अकाली मृत्युचे कारण बनतात । रोगराईचे कारण बनतात ।

नियमित मेडीटेशन करणाऱ्या विसडम असणाऱ्या
लोकांची संगती ठेवल्याने ओरा कालानुसार कमकुवत होण्याचे प्रमाण घटते ।
त्यामुळे सायकीक अॅटॅकचा त्रास कमी होतो ।
कर्म सुधारायला संधी मिळते ।

साधनासेवा सत्संग केल्याने धर्म पुण्य केल्याने मिळणारा आशीर्वाद ओरा सुधारण्यास मदत करतो ।

नियमित मेडीटेशन करणे व संगतीत येणाऱ्या प्रत्येकाला करायला सांगणे हे फार कल्याणकारी असते ।

रोज दात घासणे आंघोळ करणे जसे आवश्यक आहे तसेच
नियमित मेडीटेशन आवश्यक आहे । 

नियमित मेडीटेशन न केल्यास ओरा फाटायला लागतो व निगेटीव्ह फ्रिक्वेन्सीचे जीव जंतू रॉकेट सॅटेलाईट कण इ.इ. आपल्या ओराच्या लेयरला भेदून अन्नमय प्राणमय मनोमय आदि कोषांच्या जवळजवळ येऊ लागतात ।

महीना दोन महीन्यातून केस कापायला जसे आपण जातो किंवा गाडी सर्व्हिसिंग करायला जातो तसे कोणत्याही मेडीटेशन प्रोग्रामला जाण्याची सवय फार चांगली असते ।

घरातला जो प्रमुख जबाबदार व्यक्ती आहे त्याला ही सवय असणे अत्यावश्यक आहे व त्याने ही सवय सर्वांना लावावी. शहाण्या माणसाने इंधन आणि अन्न याचा वापर कमीत कमी करावा. गरजे ईतकाच करावा. घरात दुध फळे डाळी कडधान्ये ही लोकल आणि हर्बल वापरावीत. नैसर्गिक वस्तुंचा वापर जास्त करावा. कृत्रीम वस्तु विशेषकरून प्लास्टीक पुर्णपणे त्याग करावा. शोभेच्या वस्तु किंवा खेळणी जमा करू नये. पर्जन्यसुक्त वाचन करावे. पंचमहायज्ञ चालू ठेवावे.पाणी गरम करून प्यावे. निसर्गाला अनुकूल सवयी बळजबरीने स्वतःस लावून घ्याव्यात. कारण यामूळे आपला ओरा म्हणजे आभामंडळ ( जो आपला खरा शृंगार आहे ) ते नैसर्गिक रित्या बळकट बनते.
मालकी हक्काच्या जमीनीचा गेलेला कस, अंगावरील त्वचारोग, कमकुवत झालेली नजर ही सगळी तुमच्या ओरा फिल्डची झालेली क्षती दर्शवते.
विठ्ठल जप करत आषाढ महिन्यात पंढरपुरची पायी वारी केल्याने भूमितील व त्वचेवरील इथरचे प्रमाण वाढते जे आभामंडळाच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते.
विठ्ठल जप केल्याने भूमीवरील व त्वचेवरील आभामंडळातील परग्रह परजीव नष्ट होतात. आरोग्याची पुष्टी होते. त्याचप्रमाणे राम कृष्ण हरि जप केल्याने पर्याप्त मात्रेमध्ये धन प्राप्त होते. 

 Note:
To keep our aura in body star clean and healthy, we have to avoid conflicts with others completely . This can be achieved by developing mercedes star by everyone in family. As the area of influence and responsive action has been increased with maturity.

Rajyoga regular knowledge listening, kriyayoga may help in daily sin cleansing of mind and subtle body. Chakra healing, Pranayam Breath techniques are very useful in cleansing the aura field.






1 टिप्पणी:

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

कंसचाणूर मर्दनम् !

राक्षस म्हणजे काय ? रा म्हणजे, बाह्यजीवनशक्ती ! क्ष म्हणजे, आरोग्य ! स म्हणजे, अमर परमेश्वर ! याचा अर्थ, ज्यांच्याकडे बाह्यजीवनशक्तीय...

एकूण पृष्ठदृश्ये :