राक्षस म्हणजे काय ?
रा म्हणजे, बाह्यजीवनशक्ती !
क्ष म्हणजे, आरोग्य !
स म्हणजे, अमर परमेश्वर !
याचा अर्थ, ज्यांच्याकडे बाह्यजीवनशक्तीयुक्त अमर परमेश्वरासारखे आरोग्य आहे, ते राक्षस आहेत.
कंस म्हणजे काय ?
क म्हणजे, आंतरिक सृष्टी !
कं म्हणजे, शरीरदेहसहीत असलेली आंतरिक सृष्टी !
स म्हणजे, अमर परमेश्वर !
थोडक्यात, शरीरदेहसहीत असलेली, आंतरिक सृष्टी असलेला, अमर परमेश्वर !
परम म्हणजे, सतत ध्यान करणे.
खरा परमेश्वर देहरहीत ध्यानस्वरूप आहे.
मात्र, कंस म्हणजे, देहसहीत अमरपरमेश्वर असा अर्थ होतो.
देहसहीत कोणीही अमर होवू शकत नाही. स्वतःची बॉडी शक्तीशाली आणि अमर करण्यासाठी, तुम्हाला इतरांवर अन्याय करावा लागतो. ते आत्म्याच्या ईश्वरी कायदयाच्या विरुद्ध आहे.
म्हणजे, कंस ! जो जेलर आहे ! जेलर कॅटेगरीचा, किंवा टोपी घालणाऱ्या कॅटेगरीचा, स्वतःची बॉडी शक्तीशाली आणि अमर करण्यासाठी, इतरांवर निर्बंध आणणारा, स्वातंत्र्यावर गदा आणणारा, किंवा अशीच सायकॉलॉजी असलेला, जर राजा असेल. तर त्याला तर श्रीकृष्ण ठार मारतो. त्यामुळे, श्रीकृष्णाने म्हणजे, आत्म्याने कंसाला ठार मारले.
मधु, मुर, चाणुर म्हणजे काय ?
उ म्हणजे, असोसिएट !
ध म्हणजे, धरून ठेवणे.
जो आपल्या असोशिएटला धरून ठेवतो, तो मधु !
जर ती असोसिएट आपली पत्नी असेल, तर तिला फर्टीलायझ करणे. म्हणजे, मु !
आणि, जो आपल्या असोसिएटला फर्टीलाइज करतो तो, मूर !
मधु आणि मूर या राक्षसांना कृष्णाने ठार मारले !
का मारले ?
कारण की, पूर्णपुरुष केवळ, श्रीकृष्ण म्हणजे, देहरहीत परमात्मा आहे.
आणि आपल्या असोसिएटला धरून ठेवण्याचा अधिकार, केवळ श्रीकृष्णाचा आहे.
जे देहसहीतलोक शक्तिशाली आरोग्यवान म्हणजे, राक्षस आहेत. त्यांना तो अधिकार नाही. असा याचा अर्थ होतो.
कंस ! जो जेलर आहे ! जेलर कॅटेगरीचा किंवा टोपी घालणाऱ्या कॅटेगरीचा, निर्बंध आणणारा, स्वातंत्र्यावर गदा आणणारा, किंवा अशीच सायकॉलॉजी असलेला, जर राजा असेल. तर त्याला तर श्रीकृष्ण मारतोच. पण त्याच्यासोबत मधु आणि मूर ह्या राक्षसांना देखील तो मारतो. आणि त्यातल्या त्यात, जर, ते राक्षस कंसाला रिपोर्टिंग करत असतील, तर सर्वांत पहिले मारतो.
आता हा विषय थोडा समजण्यासाठी कठीण जात आहे ! म्हणून, आपण एक कोंबडा कोंबडीचे उदाहरण घेऊ ! की जर समजा, कोंबडीला फर्टीलायझ करणारा कोंबडा आहे. तर तो झाला मूर ! आणि त्या कोंबडीवर टोपली घालणारा शेतकऱ्याचा मुलगा आहे, कंस ! आणि, त्या कंसाला टोपली घालण्यात सपोर्ट करणारा, त्याचा मित्रमैत्रिण आहे मधु !
चाण म्हणजे, वर्तमानकाळातील बाह्यचतुरता ! आणि,
जो असोशिएट, ह्या वर्तमानकाळातील बाह्यचतुरतेला सपोर्ट करत आहे, तो चाणुर !
श्रीकृष्णाने, ह्या कंसाचा मंत्री असलेल्या चाणुरला देखील ठार केले.
अशाप्रकारे, ह्या तिन्हीचारी टाईपच्या लोकांना श्रीकृष्ण ठार मारतो. कारण की, ज्या ज्या गोष्टीने माणसाच्या आत्म्यावर निर्बंध येतात, त्याच्या आत्मस्वातंत्र्यावर गदा येते, किंवा आत्म्याच्या मुक्तीला अडचण निर्माण होते, अशा सगळ्यांना श्रीकृष्ण ठार करत असतो. हा पॉझिटिव्ह अर्थ आपण घेऊ शकतो.
एक साधा व्यावहारिक निष्कर्ष जर काढायचा झाला. तर, आपल्या बायकोविषयी, किंवा आपल्या बहिणीविषयी, किंवा आपल्या कोणत्याही नातेवाईकाविषयी अतिशय पझेसिव्ह असणे. हे आपल्या दुःखद मरणाचे कारण ठरू शकते. त्यामुळे, पझेसिव्हनेस वाईट असतो. जरी तो लीगल असला तरीदेखील ! कारण तो मोह या विकारांमध्ये मोडतो.
एक साधा व्यावहारिक निष्कर्ष जर काढायचा झाला. तर, आपल्या बायकोविषयी, किंवा आपल्या बहिणीविषयी, किंवा आपल्या कोणत्याही नातेवाईकाविषयी अतिशय पझेसिव्ह असणे. हे आपल्या दुःखद मरणाचे कारण ठरू शकते. त्यामुळे, पझेसिव्हनेस वाईट असतो. जरी तो लीगल असला तरीदेखील ! कारण तो मोह या विकारांमध्ये मोडतो.
गुरुने आपल्या शिष्यांविषयी मोह ठेवणे, किंवा आपल्या पत्नीविषयी, तसेच, मुलांविषयी मोह ठेवणे, हे देखील त्याच्या दुःखद मरणाचे कारण ठरते. हे महाभारत युद्धामध्ये श्रीकृष्णाने दाखवून दिलेले आहे !
यावरून, आपण सामाजिकदृष्ट्या जर विचार करायचा झाला, तर अशी समाज सिस्टीम बनवणे आवश्यक आहे की, ज्यामध्ये बॉसने आपल्या एम्लॉईविषयी, एम्लॉईने आपल्या बॉसविषयी, इनव्हेस्टरने आणि एम्लॉईने आपल्या कंपनीविषयी, मोह न ठेवता, त्याला किंवा तिला पैसा कमाविण्याचा सेटअप आणि कामे करण्याची सिस्टीम बनवता आली पाहिजे.
घरादाराचे लहान मुलं असतील, किंवा बायका, बहिणी, मुली, कोणीही जरी असतील, तर त्या, त्यांच्या त्यांच्या अभ्यास करून आत्मनिर्भर होतील. आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. पैसा कमाविण्याचा सेटअप उभा करण्यासाठी, त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे हात पसरावा लागणार नाही. आणि जीवन जगतांना, मोह आणि मद या विकारांचा, कोणालाही आसरा घेण्याची गरज पडणार नाही. यादृष्टीने जीवन जगण्याची सिस्टीम, देशात बनवणे आवश्यक झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा