औद्योगिक क्रांति, कृषी क्रांति नंतर सध्याचे माहिती तंत्रज्ञान क्रांतिचे युग चालू असून देशात सायबर सिक्युरिटीची प्रचंड प्रमाणात गरज निर्माण झाली आहे त्यासाठी सायबर सिक्युरिटी हा एक तंत्रज्ञान पदवी चा एक स्पेशलिटी विषय होवू शकतो. सध्याच्या काळात आपल्या कड़े सायबर सिक्युरिटी ही फक्त मोठ्या जमिनदार उद्योगपती तसेच राजकारणी मंडळींना तसेच बॅकिंग व अर्थ क्षेत्राशी निगडीत संस्थांना आहे. मोबाईल जरी प्रत्येक सामान्य देशवासियांकडे आलेला असला तरी त्याला संपूर्ण सायबर सिक्युरिटी उपलब्ध नाही. माहिती तंत्रज्ञान क्रांतिसाठी सायबर सिक्युरिटी मध्येपण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात क्रांति होणे ही काळाची गरज आहे. देशाची माहिती तंत्रज्ञान क्रांति वेगवान वद्धतीने व्हावी म्हणून प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे. फन गेमस, रिकहाँक, फ्लीप फ्लॉप मध्ये वेळ वाया घालवून देशाने स्वतःची नासाडी करून घेवू नये. त्या उलट माहिती तंत्रज्ञानाची देशांतर्गत मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण करून देशाला सफल संपूर्ण बनवणे. जागतिक अवेरनेस वाढवणे. स्लिपर सेल ला अवेकन सेल बनवणे, जागृत ज्ञानअवस्थेत आणणे. शारिरिक, मानसिक प्रॉब्लेम्स देशातून कायमस्वरूपी कसे नष्ट होतील, देश आरोग्य संपन्न कसा होईल याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे.
वटवृक्षाच्या पारंबीच्या वाढीपेक्षा फंगसच्या वाढीचा वेग प्रचंड असतो त्यामुळे आपल्या देशात माहीतीचा ऑक्सीजन आणि ज्ञानाची लस देणारे डिजिटल वटवृक्ष आवश्यक आहेत. गेमाडपंथी, फन-गस प्रेमी उपयोगाचे नाहीत. ते स्लीपर सेल पेक्षा बेकार.
माहीती तंत्रज्ञानाच्या जाळ्याने जग आपण सारे एक आहोत आपले साद पडसाद , आपले आरोग्य आणि जीवन हे कसे परस्परांवर अवलंबून आहे. हे सारे आज आपण अनुभवत आहोत.
नवीन पीढी त्यांच्या जागतिक नागरिकत्वाविषयी जागरूक झालेली आहे. राजकीय नेतेमंडळीही राजकारण करत असतांना जागतिक आरोग्य आणि सुव्यवस्थेची काळजी घेतील व संपूर्ण विश्व हे या माहीती तंत्रज्ञानाचा आरोग्यमय वापर करील अशी आपण सर्वजण आशा करूयात.
ॐ शांतिः||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा